Kitchen Tips esakal
लाइफस्टाइल

Kitchen Tips : करपलेल्या भाताचे करायचे काय? अशा पद्धतीने घालवा भाताचा करपट वास

किचनमध्ये असलेला लसूण-कांदा करेल तुम्हाला मदत

सकाळ डिजिटल टीम

Kitchen Tips :

काहीवेळा गृहिणींचे दुर्लक्ष होतं आणि शिजायला ठेवलेला भात अगदी करपून धुरळा होता. त्यामुळे करपलेला भात खावा लागतो आणि वर घरभर त्याचा वासही पसरतो. करपलेला भात वरवरचाच काढून खायला घेतला तरी त्याचा वास काही जात नाही. त्यामुळे एखाद्याच्या पटकन लक्षात येतं की भात करपलेला होता.

अशा परिस्थितीत काही सुचत नाही. तेव्हा संपूर्ण भात फेकून द्यावा लागतो. पण, असं न करता करपलेल्या भाताचा वास घालवण्याचे काही उपाय करून तुम्ही करू शकता. या उपयानी तुमच्या भाताचा करपट वास निघून जाईल.  

कांदा

करपलेल्या भाताचा वास घालवण्यासाठी एका मध्यम आकाराच्या कांद्याची गरज पडेल. यासाठी मध्यम आकाराचा कांदा सालासह चार तुकडे करून घ्या. हे तुकडे भाताच्या पातेल्यात किंवा कुकरमध्ये आत खोचून ठेवा. यानंतर कुकरचे झाकण लावा. १५ ते २० मिनिटांनी झाकण काढून पाहिलत तर भाताचा वास गेलेला असेल. भात वाढून घेताना त्यातील कांदा काढून टाका.

तूप

करपलेला भात परतून त्याचा वास घालवता येतो. त्यासाठी फोडणीच्या भांड्यात तूप गरम करून त्यात जिरे परतून घ्या. आणि ही फोडणी भातावर घाला. यामुळे तुपाचा घमघमाट भाताला लागेल अन् करपट वास निघून जाईल.

लसूण

आपण रोजच्या जेवणात लसूण वापरतो. लसणाचा फोडणीचा वास पटकन लक्षात येतो. तोच लसूण तुम्हाला या कामातही मदत करेल. तुपात लसणाच्या पाकळ्या घालून तडका द्या.   तयार तडका भातावर पसरवा. त्यानंतर त्यावर झाकण ठेवा. ५ मिनिटानंतर झाकण काढा, अशाने त्यावरील जळका वास निघून जाईल.

फोडणीचा भात

भात जास्तच करपलेला असेल आणि दुसरा भात शिजेपर्यंत भूक शांत बसणार नसेल.तर, या भातातून करपलेला भात वेगळा काढा अन् चांगल्या भाताला परता. म्हणजेच कांदा, लसूण, कढीपत्त्याची फोडणी देऊन भात खाता येऊ शकतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT