Lord Hanuman Name History
Lord Hanuman Name History  esakal
लाइफस्टाइल

हनुमानाच्या नावाचा इतिहास माहिती नसेल तर 'हे' वाचा

सकाळ डिजिटल टीम

खासदार नवनीत राणा यांना एका मुलाखतीत भगवान हनुमानाचं खरं नाव काय आहे ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला राणा यांना उत्तर देता आले नाही. तर नेमकं भगवान हनुमानाचं नाव हनुमान कसं पडलं ? चला तर त्याविषयी जाणून घेऊ या...

भगवान हनुमान यांच्याशी संबंधित अनेक पुराणकथा तुम्ही वाचले किंवा ऐकले असेल. मात्र अशा काही गोष्टी आहेत, ज्या विषयी जाणून तुम्ही हैराण व्हाल. येथे आम्ही अशाच काही गोष्टींविषयी माहिती देणार आहोत. ती प्रत्येक हनुमान भक्ताला माहित असायला हवी. 'ब्रह्मांडपुराणा'त सांगितले आहे, की भगवान हनुमान (Lord Hanuman) यांचे पिता केसरी आहेत. भगवान हनुमान आपल्या भावंडांमध्ये मोठे होते. माता अंजनी यांच्या पोटातून जन्म घेणारे भगवान हनुमान पहिले पुत्ररत्न होते. (Know About Lord Hanuman Name History, Read This)

- 'हनुमान' शब्दाचा संस्कृत अर्थ म्हणजे ज्या व्यक्तीचा मुख किंवा जबडा बिघडलेला. हनुमान नावाबाबत एक कथा सांगितली जाते, की इंद्रदेवाच्या वज्र प्रहारामुळे बालक हनुमानाची हनुवटी तुटली होती. यानंतर त्यांना हनुमान नाव मिळाले. प्रचलित कथेनुसार भगवान हनुमान यांच्या जन्मानंतर एका दिवशी त्यांची आई फळ आणण्यासाठी त्यांना आश्रमात सोडून गेली. जेव्हा बाल हनुमानाला भूक लागली, तेव्हा ते उगवत्या सूर्याला फळ समजून त्याला पकडण्यासाठी आकाशात उडू लागले. त्यांच्या मदतीसाठी पवनही वेगाने वाहू लागला. दुसरीकडे भगवान सूर्य नारायणाने त्यांना नादान बालक समजून सूर्य प्रकाशाने जळू दिले नाही. ज्यावेळी हनुमान सूर्याला पकडण्यासाठी उडी घेतली, त्यावेळी राहू सूर्याला ग्रहण लावू इच्छित होता. भगवान हनुमान यांनी सूर्याच्या वरच्या भागात जेव्हा राहुला स्पर्श केले तेव्हा तो घाबरुन पळून गेला. इंद्राजवळ जाऊन त्याने तक्रार केली की देवराज तुम्ही मला भूक शमवण्यासाठी सूर्य आणि चंद्र दिले होते. आज अमावस्याच्या दिवशी जेव्हा मी सूर्य गिळण्यासाठी गेलो तेव्हा पाहिले की दुसरा राहु सूर्याला पकडण्यासाठी जात आहे. राहुची हकीकत ऐकून इंद्र देव घाबरले आणि त्याला घेऊन सूर्याकडे निघाले. राहु पाहून भगवान हनुमान सूर्याला सोडून राहुला मारण्यास सुरुवात केली. राहुने इंद्राला संरक्षणासाठी आवाहन केले. त्यांनी भगवान हनुमानावर वज्रायुधाने प्रहार केला. यात हनुमान एका पर्वतावर पडले व त्यांची डावी हनुवटी तुटली. हनुमानाची ही अवस्था पाहून वायूदेवाला राग आला. त्यांनी त्याच क्षणी वाऱ्याचा वेग थांबवला. यामुळे सर्व प्राणीमात्रांना श्वास घ्यायला त्रास सुरु झाला. तेव्हा सूर, असूर, यक्ष, किन्नर आदी ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव त्या सर्वांना घेऊन वायूदेवाकडे केले. ते हनुमानाला कुशीत घेऊन बसले होते. बह्मदेवाने त्यांना जीवित केले. त्यानंतर वायुदेवाने वायूचा संचार पुन्हा सुरु केल्याने सर्व प्राणीमात्रा पूर्ववत झाली. मग ब्रह्मदेव म्हणाले, की कोणतेही शस्त्र त्याच्या अंगाला इजा पोहोचू शकत नाही. इंद्रदेव म्हणाले, याचे शरीर वज्रापेक्षाही कठोर असेल. सूर्यदेव म्हणाले, त्याला आपला तेजाचे शतांश प्रदान करेल आणि राहस्य जाणून घेण्याचेही आशीर्वाद दिले. वरुण देव म्हणाले, पाश आणि जल आदीपासून हा बालक सदा सुरक्षित राहिल. यमदेवाने अवध्य आणि निरोगी राहण्याचे आशीर्वाद दिले. यक्षराज कुबेर, विश्वकर्मा आदी देवतांनीही वरदान दिले.

- महाभारतात पांडू पुत्र राजकुमार भीम आपल्या ताकदीसाठी ओळखला जातो. म्हटले जाते की तो भगवान हनुमानाचा भाऊ होतं.

- हनुमानाला ब्रह्मचारी म्हटले जाते. मात्र त्यांचा एक मुलगाही आहे. त्याचे नाव 'मकरध्वज' असे सांगितले जाते. मकरध्वज भगवान हनुमान यांच्या घामातून जन्माला आला होता.

- भगवान हनुमानाला पाच भावंडे होती.

- ब्रह्मांडपुराणात म्हटले आहे, की बजरंगबली यांच्या नंतर मतिमान, श्रुतिमान, केतुमान, गतिमान, धृतिमान ही त्यांच्या भावंड्यांची नावे आहेत.

- एका कथेनुसार एकदा हनुमानाने प्रभू रामाच्या आठवणीत आपल्या पूर्ण शरारीला शेंदूर लावले होते. कारण एकदा त्यांनी सीता मातेला शेंदूर लावताना पाहिले होते. जेव्हा त्यांनी शेंदूर लावण्याचे कारण सीता मातेला विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, श्रीरामाच्या प्रति प्रेम आणि सन्मानाचे प्रतिक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभेचा आज महानिकाल! NDA हॅट्रिक साधणार की INDIA सत्तेत येणार याची उत्कंठा शिगेला

Manoj Jarange: उपोषणाला आता अंतरवलीच्या नागरिकांचाच विरोध! जरांगे म्हणतात, आता मन...

SL vs RSA T20 WC 2024 : आफ्रिकेला 77 धावा करताना फुटला घाम; श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलं टेन्शन

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

SCROLL FOR NEXT