काय घ्यायची चेहेऱ्यावर वाफ Esakal
लाइफस्टाइल

चेहेऱ्यावर Steam घेण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या Scientific Reason

स्टिम घेणं हे चेहऱ्यासाठी चांगलं आहे हे अनेकांना ठाऊक असतं. यासाठीच स्किन केअर रुटीनमध्ये अनेकजण घरीदेखील स्टिम घेतात. मात्र स्टिम घेण्यामागचं वैज्ञानिक कारणं तुम्हाला ठाऊन नसेल. तेव्हा जाणून घेऊया नेमकी स्टीम कशी घ्यावी आणि त्याचे वैज्ञानिक फायदे

Kirti Wadkar

त्वचेची काळजी घेण्यासाठी Skin Care अनेकजण वेगवेगळे प्रयत्न करताना दिसतात. चेहऱ्याला मसाज करणं, फेसपॅक Face pack लावणं, स्क्रब करणं तसचं वेगवेगळ्या क्रिम्स आणि सिरमं लावणं अशा पद्धतीने त्वचेची काळजी घेतली जाते. Know the Scientific Reason why we should take steam on Face

तर अनेकदा तुम्ही पार्लरमध्ये Beauty Parlor फेशियल करताना चेहऱ्याला स्टिम म्हणजेच वाफ घेतात. काही जण घरी देखील गरम पाण्यामध्ये लिंबू, कडुनिंब या गोष्टी टाकून स्टिम Steam घेतात.

स्टिम घेणं हे चेहऱ्यासाठी Face Care चांगलं आहे हे अनेकांना ठाऊक असतं. यासाठीच स्किन केअर रुटीनमध्ये अनेकजण घरीदेखील स्टिम घेतात. मात्र स्टिम घेण्यामागचं वैज्ञानिक कारणं तुम्हाला ठाऊन नसेल. तेव्हा जाणून घेऊया नेमकी स्टीम कशी घ्यावी आणि त्याचे वैज्ञानिक फायदे.

1. क्लिंजिंग- नियमितपणे वाफ घेतल्याने त्वचेवरील पोर्स म्हणजेच छिद्र खुली होत असल्याने त्यातील घाण तसचं डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. ज्यांच्या चेहऱ्यावर ब्लकहेड्स आणि व्हाइटहेड्सची समस्या आहे त्यांना स्टीम घेण्याचा अधिक फायदा होवू शकतो.

२. स्किन हायड्रेट होण्यास मदत- अनेकदा शरीरातील पाणी कमी झाल्याने चेहऱ्याची त्वचा डिहायड्रेट होते. स्टीम घेतल्याने त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. तसचं यामुळे त्वचेवर चमकही येते.

३. त्वचा तरुण राहण्यास मदत- चेहऱ्यावर स्टीम घेतल्याने त्वचेत कोलेजन आणि इलास्टिनचं उत्पादन वाढू लागतं. यामुळे चेहरा तरुण आणि चमकदार दिसू लागतो. यासाठी आठवड्यातून किमान दोन वेळा वाफ घ्यावी.

४. सुरकुत्या कमी होतील- स्टीम घेतल्याने गरम वाफेमुळे त्वचेतील रक्त प्रवाह वाढण्यास मदत होते. यामुळे त्वचेला ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

५. पिंपल्सची समस्या होते दूर- वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील पोअर्स उघडे झाल्याने त्यातील अतिरिक्त सीबम आणि घाण निधून जाते. यामुळे पिंपल्सची समस्या हळू हळू कमी होऊ लागते.

हे देखिल वाचा-

चेहऱ्यावर वाफ घेण्याची योग्य पद्धत

चेहऱ्यावर वाफ घेण्यासाठी तुम्ही स्टीमरचा वापर करू शकता. स्टिमर नसल्यास पातेल्यात पाणी घेऊनही तुम्ही वाफ घेऊ शकता.

- स्टीमर नसल्यास वाफ घेण्यासाठी चार पाच कप पाणी उकळवून घ्या.

- उकळलेलं पाणी एखाद्या मोठ्या पसरट वाडग्यात किंवा भांड्यात घ्या.

- त्यानंतर या भांड्यावर थोडं अंतर ठेवून चेहरा ठेवा डोक्यावरून एखादा टॉवेल किंवा कापडाच्या मदतीने चेहरा कव्हर करा.

- एकावेळी जास्त वेळ वाफ घेऊ नये.

- तसचं श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यास टॉवेल काढून टाका.

- गरम वाफ थेट नाकात जाणार नाही याची काळजी घ्या.

- आठवड्यातून फक्त २ वेळा तसंच केवळ १५ ते २० मिनिटांसाठी वाफ घ्यावी. वाफ घेतल्यानंतर लगेचच चेहऱ्यावर मॉइश्चराझर लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पुण्यात बालाजीनगरमध्ये आंदेकर टोळीचा गोळीबार, आरोपीच्या भावाची हत्या

IPL 2026, LSG vs RR: 'पराभूत झालो, तरीही आमचा संघ...', रिषभ पंतची 'F' ची भाषा, पराभवानंतर ऑन कॅमेरा दिली शिवी; VIDEO

Gold Rate Today: पेट्रोल-डिझेलनंतर आता सोनंही महागलं! काय आहे ताजा भाव?

Stock Market Today: ट्रम्पच्या धमकीने शेअर बाजार हादरला! सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स घसरले?

Nagpur News: उष्ण लाटेमुळे ७६ रुग्णांची नोंद; हीट रॅश, हीट एक्झाॅशन वाढले; आरोग्य यंत्रणा ॲलर्टवर

SCROLL FOR NEXT