know what happens after your cheque gets rejected cheque bounce law in india  
लाइफस्टाइल

चेक बाऊन्स झाल्यास काय होते? समजून घ्या तुमचे कायदेशीर अधिकार

सकाळ डिजिटल टीम

धनादेश (Cheque) विविध प्रकारच्या व्यवहारांसाठी वापरले जातात जसे की, कर्जाची परतफेड, पगार देणे, फी भरणे इत्यादीसाठी केला जातो. चेकवर बँकांद्वारे प्रक्रिया केली जाते आणि ते दररोज सेटल केले जाते. चेक वापरुन केले जाणारे पेमेंट विश्वसनीय माणले जाते, पेमेंट करण्याचा तो एक चांगला आणि सुरक्षित मार्ग आहे. दरम्यान चेकचा गैरवापर टाळण्यासाठी चेक क्रॉस चेक करणे नेहमीच महत्वाचे ठरते.

चेक बाऊन्स झाल्यास काय होते?

एखाद्यानं कुठल्याही व्यवहारात चेक दिल्यानंतर, तो चेक बाऊन्स (Cheque Bounce:) होण्याची प्रकरणे खूप सामान्य आहेत. काहीवेळा असे दिसून येते की, चेकची रक्कम दिली जात नाही आणि चेक बाऊन्स होतो त्यानंतर बँक तो परत करते. चेक बाऊन्स झाल्याची माहिती चेक देणाऱ्यास देणे बंधनकारक आहे. जर चेक स्विकारणाऱ्याला एका महिन्याच्या आत पेमेंट मिळाले नाही, तर अशा परिस्थितीत चेक देणाऱ्यास कायदेशीर नोटीस पाठविली जाते. नोटीस मिळाल्यानंतर, नोटीस मिळाल्याच्या दिवसापासून 15 दिवसांच्या आत त्याने पैसे भरले नाहीत, तर तो कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे. परंतु दुसरीकडे, धनादेशाची रक्कम 15 दिवसांत भरल्यास कर्जदारावर कोणताही गुन्हा केला जात नाही.

नोटीसमध्ये 15 दिवसांचा कालावधी उलटून गेल्यापासून एक महिन्याच्या आत चेक स्विकारणारा मॅजिस्ट्रेट कोर्टात तक्रार दाखल करू शकतो. त्यानंतरही चेक न मिळाल्यास किंवा रक्कम भरता आली नाही, तर चेक देणाऱ्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 च्या कलम 138 नुसार, चेक बाऊन्स होणे हा दंडनीय गुन्हा आहे आणि तो दोन वर्षांपर्यंतच्या कारावास आणि दंड किंवा दोन्ही शिक्षेस पात्र आहे. कोणत्याही चेकची मर्यादा फक्त 3 महिन्यांसाठीच राहते, त्यानंतर ही मुदत संपते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंजाब किंग्सच्या 'डिल' वर आर अश्विन खूपच प्रभावित; म्हणतोय, हा खेळाडू IPL 2026 मध्ये घुमशान घालणार

Crime News : मोफत पाणीपुरी देण्याची मागणी, नकार देताच चाकूने हल्ला; पाणीपुरी विक्रेत्याचा जागीच मृत्यू

Canada PR Without Job: कधी कॅनडात काम केले नाही? तरीही PR मिळू शकते; जाणून घ्या कसे

Education News: उच्च शिक्षणात क्रांती! परदेशी शिक्षणाचा खर्च वाचणार; भारतातच जागतिक विद्यापीठांचे वर्ग भरणार

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करणाऱ्यांना वाळू माफियांकडून धमकी

SCROLL FOR NEXT