korean skin care routine tips sakal
लाइफस्टाइल

Skin Care Tips कोरियन तरुणींसारखी हवीय सुंदर त्वचा? मग आठवडाभर करा हा उपाय

कोरियन तरुणी चेहरा आणि केसांचे सौंदर्य खुलवण्यासाठी नैसर्गिक उपचाराची मदत घेतात. काय आहे हा उपाय? जाणून घेऊया सविस्तर...

Harshada Shirsekar

हल्लीच्या तरुणांमध्ये कोरियन ब्युटी प्रोडक्ट्सची क्रेझ खूप वाढल्याचं दिसत आहे. कोरियन तरुणींचे स्किन केअर टिप्स जगभरातील तरुणी मोठ्या प्रमाणात फॉलो करताहेत. कारण कोरियन तरुणींची त्वचा सुंदर व काचेसारखी चमकदार असते. 

यामुळे कोरियन ब्युटी प्रोडक्ट्सची मागणी वाढत आहे. पण कोरियन तरुणी आपल्या ब्युटी केअर रूटीनमध्ये नैसर्गिक उपचाराची मदत घेतात, हे तुम्हाला माहिती आहे का? त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी या तरुणी तांदळाचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करतात. जाणून घेऊया या बद्दल सविस्तर माहिती..

शिजवलेल्या तांदळाचे फेस पॅक

सामग्री : 

  • शिजवलेले तांदुळ - दोन चमचे

  • कच्चे दूध - दोन चमचे

  • मध - एक चमचा

वरील सर्व सामग्री एका वाटीमध्ये एकत्रित घ्या व पेस्ट तयार करा. तयार झालेली पेस्ट चेहरा व मानेवर लावा. १० मिनिटे पॅक चेहऱ्यावर लावून ठेवावा. यानंतर थंड पाण्याने चेहरा व मानेचा भाग स्वच्छ करून घ्यावा. हलक्या हाताने नॅपकिनने त्वचा पुसून घ्या व यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चराइझर लावावे.

  • आठवड्यातून एकदा हा उपाय करावा.

  • चेहऱ्यावरील डाग, मुरुम, सुरकुत्यांची समस्या कमी होण्यास मदत मिळेल.

  • सनबर्न, टॅनिंगची समस्याही दूर होईल. 

  • त्वचेवर नॅचरल ग्लो देखील येईल.

फेस पॅकचे फायदे

त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी तांदुळ अतिशय लाभदायक मानला जातो. कारण यामध्ये अमिनो अॅसिड, अँटी-ऑक्सिडंट्स आणि खनिजे यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे. ज्यामुळे त्वचेचं आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. तर कच्च्या दुधामध्ये त्वचेवरील मृत पेशींची समस्या दूर होण्यास मदत मिळते.  

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : स्कूलबसचालकाने भर रस्त्यात केली टेम्पोची तोडफोड, पुणे पोलिसांनी शिकवला कायमचा धडा; गुडघ्यावर बसवत काढली धिंड, पाहा VIDEO

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी १०० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेताच भडकला चीन, जागतिक मंदीची शक्यता

Ladki Bahin Yojana: ‘ई-केवायसी’साठी लाडक्या बहिणींची डोकेदुखी; संकेतस्थळ चालेना, केवायसी न केल्यास लाभ होणार बंद

Multigrain Vs Wheat Flour: मल्टीग्रेन कि गव्हाचे पीठ? आरोग्यासाठी काय आहे, उत्तम वाचा एक्सपर्टचे मत

Sangli Fake Currency Racket : पोलिस हवालदारानेच चहाच्या दुकानात छापल्या १ कोटींच्या बनावट नोटा; सांगली, कोल्हापूरमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT