लाइफस्टाइल

Kuramaghar Tradition : गडचिरोलीतील महिलाचे मासिक पाळीतील कुरमाघर, ही प्रथा नक्की काय आहे?

पाळी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला तर लोकांनी अंत्यविधीही केला नाही

सकाळ डिजिटल टीम

Kuramaghar Tradition :

महिलांना घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना, दुखणं आजारपण सहन करताना एक गोष्ट सहन करावी लागते. ती म्हणजे मासिक पाळी. या गोष्टीची महिलांना सवय झालेली असते, त्यामुळे घरातलं कोणतंही काम करताना कधी अडचण येत नाही. त्यांना त्याची सवय झालेली असते. पाळीशी त्यांची घट्ट मैत्री झालेली असते. 

पाळीच्या काळात महिलांना शारीरिक दुखण्याचा त्रास सहन करावा लागतो. पण आजही अनेक महिलांना या शारीरिक व्याधींशिवाय मानसिक आजाराचाही सामना करावा लागतो. गडचिरोली सारख्या दुर्गम भागात आजही पाळीला विटाळ समजून महिलांना कुरमाघर सारखी प्रथा पाळली जाते. त्याबद्दलच आज आपण जाणून घेऊयात.

एआय, स्मार्टफोन्सच्या जमान्यात जग चंद्रावर पोहोचलं तरी देखील काही लोक त्यांच्या प्रथांनाच महत्त्व देतात. अलिकडच्या काळापर्यंत किंवा आजही अनेक घरात महिलांना बाजूच्या खोलीत जागा दिली जायची. महिन्यातले चार दिवस त्या महिला बाजूच्या खोलीत राहून पडेल ती ज्यादाची कामे करायच्या. पण इथं केवळ घरातील खोली नाही तर गावापासून दूर असलेली झोपडी महिलांना दिली जाते. ही प्रथा नक्की काय आहे याबद्दल बोलूयात.

कुरमाघराची झोपडी

गडचिरोलीतील माडिया आदिवासी समाजातील मासिक पाळी झालेल्या महिला गावाबाहेर असलेल्या झोपडीत राहतात. ती एक अशी झोपडी असते जिथे साप, मुंग्या, विषारी किटक कधीही येऊ शकतात. त्याला ना धड दरवाजे असतात ना मोकळ्या खिडक्या. अशा खोलीत त्या महिला राहतात. त्यांच झोपडीत आडोसा करून अंघोळीची सोय केलेली असते. (Gadchiroli)

गावातील प्रत्येक महिला महिन्यातले चार दिवस त्या खोलीत घालवते. काहीवेळा तर एकाहुन अधिक महिला एकत्र राहत असतात. त्यांचे जेवण, पाणी सगळ्याची सोय तिथे केली जाते.

या घरांची आजही गरज का आहे?

स्थानिक महिलांच्या मते, पाळी हा विटाळ आहे, ‘तशा’ बाईचा स्पर्श घरातील इतर वस्तूंना होऊ नये यासाठी त्या महिलांना बाहेर ठेवले जाते. याउलट, असंही सांगितलं जातं की, पाळीच्या काळात बाईने कुठलीही कामे करू नयेत, आराम करावा म्हणून तिला वेगळं ठेवलं जातं.

कुरमाघर म्हणजे शिक्षाच

कुरमाघरात झोपण्यासाठी अपुरा बिछाना, वीजेचा बल्ब, पंखा, इत्यादी उपकरणांचा अभाव, सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका अशा वातावरणात इतके दिवस काढणे, म्हणजे एकप्रकारची शिक्षाच ठरते. पावसाळ्यात जंगलात चिखल असतो. अस्वच्छतेमुळे अनेक रोग होतात. आदिवासी महिलांना सोयी सुविधांचा अभावी अनेक आजारांना बळी पडावे लागते.

नक्षलवाद्यांनी केला अंत्यविधी

काही वर्षांपूर्वी असं घडलं होतं की, एका महिलेला कुरमाघरात असताना सर्पदंशाने मृत्यू झाला. तर विटाळ असलेल्या महिलेचा अंत्यविधी या लोकांनी केला नाही. त्यामुळे त्या बाईचा अंत्यविधी जंगलात असणाऱ्या नक्षलवाद्यांनी केला. मध्यंतरीच्या काळात नक्षलवाद्यांनी या प्रथेला बंद करण्यासाठी पाऊले उचलली होती. पण नंतर त्यांचेही कोणी ऐकणा. कारण लोकांना जीवापेक्षा प्रथा जपणं महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे नक्षलवाद्यांनी हे प्रयत्न बंद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT