Lip Care tips esakal
लाइफस्टाइल

Lip Care Tips : ओठांवरची चमक आणि सॉफ्टनेस कायम ठेवायची असेल तर घरीच करा हा उपाय

आज आपण ओठांच्या या समस्येवरील उपाय जाणून घेऊया

सकाळ डिजिटल टीम

Lip Care Tips : अनेक महिलांना ओठ ड्राय होण्याच्या समस्या असतात. तर काही लोकांचे ओठ डल होतात. तुम्हालाही ओठांच्या अशाच काहीशा समस्या असतील तर आज आपण ओठांच्या या समस्येवरील उपाय जाणून घेऊया.

घरीच बनवा बीट स्क्रबरूट

ओठांच्या समस्येसाठी तुम्ही घरच्या घरी बीटरूट स्क्रब बनवू शकता. हा ओठांवर अप्लाय केल्यानंतर अगदी काही काळानंतर तुम्हाला याचा फरक जाणवेल. बीट तुमच्या ओठांवर जमा झालेली डेड आणि ड्राय स्कीन काढून टाकते. याशिवाय ओठांची टॅनिंग दूर व्हायलाही मदत होते.

जाणून घ्या बीटरूट स्क्रब बनवण्याची पद्धत

सामग्री

अर्ध कापलेलं बीटरूट

१ टेबलस्पून साखर

२ टेबलस्पून बदामचं तेल

Lip Care Tips

बीटरूट स्क्रब कसं बनवायचं?

बीटरूट स्क्रब बनवण्यासाठी सगळ्यात आधी बीटरूट घ्या. नंतर तुम्ही बीटरूट चांगलं धुवून त्याला अर्ध कापून घ्या. त्यानंतर तुम्ही एका बाउलमधे बादामाचं तेल आणि साखर मिक्स करा. नंतर तुम्ही कापलेले बीटरूट यात मिक्स करा. तुमचा बीटरूट स्क्रब बनून तयार आहे.

बीटरूट लिप स्क्रब कसा अप्लाय करायचा?

बीटरूट स्क्रब तुम्ही तुमच्या ओठांवर अप्लाय करा. आता दोन मिनिटांपर्यंत याला ओठांवर स्क्रब करा. त्यानंतर ओठांना कॉटन किंवा पाण्याने धुवून घ्या. (Beauty)

हा उपाय केल्याने तुमच्या ओठांची (Skin Care) चमकही वापस येईल आणि तुमच्या ओठांचा ड्रायनेसही जाईल. हा उपाय तुम्ही रिकाम्या वेळेत कधीही करू शकता. बीटरूटचा हा उपाय फारच नॅचरल असल्याने कुठल्याही आर्टिफिशियल ट्रीटमेंटशिवाय तुम्ही तुमच्या ओठांना मऊदार आणि चमकदार बनवू शकता.

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून हा उपाय करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT