Lips Care Tips esakal
लाइफस्टाइल

Lips Care Tips: ओठ झालेत काळे; हा बदल करून मिळवा गुलाबासारखे Soft Pink Lips

कोणीतरी तुमच्याही ओठांसाठी म्हणावं, 'होठ है गुलाबी तेरे' वाटत असेल तर टीप्स नक्की वाचा

Pooja Karande-Kadam

Lips Care Tips: स्वत:च्या काळवंडलेल्या ओठांकडे पाहवतच नाहीय? किती क्रिम, औषध झाली तरी जैसे थे परिस्थिती, अशी रड प्रत्येकाची आहे. पुरूषांमध्ये तर ही समस्या कॉमन बनली आहे. महिला यासाठी काही ट्रिटमेंटही करून घेतात. पण, त्या जास्त खर्चिक असल्याने प्रत्येकाला ते परवडणारं नसतं.

जर तुमच्या ओठांचा रंग काळा असेल तर तुमच्या आहारात काही बदल करूम तुम्ही तो परत मिळवू शकता. कारण, ओठ काळे पडणे हे तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असल्याचे लक्षण आहे. याशिवाय हायड्रेशनच्या कमतरतेमुळेही हा त्रास वाढू शकतो.

आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास तुमच्या ओठांचा काळेपणा दूर होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांच्या सेवनाने तुमच्या काळ्या ओठांचा रंग वाढू शकतो.

डाळिंब

डाळिंब खा दररोज एक डाळिंब खाल्ल्याने तुमच्या शरीरातील अशक्तपणा दूर होऊ शकतो. याशिवाय तुम्ही डाळिंबाचा रस देखील पिऊ शकता. डाळिंब सोलून त्याचे बी काढून घ्या. ते मिक्सरमधून काढून त्याचा रस तयार करा आणि नंतर सेवन करा. याशिवाय डाळिंबाचा स्क्रब बनवून तुम्ही तुमचे ओठ स्वच्छ करू शकता आणि तुमचे ओठ गुलाबी करू शकता.

टोमॅटोचा रस प्या

टोमॅटोचा रस पिल्याने तुमचे काळे ओठ गुलाबी होण्यास मदत होते. टोमॅटोचा रस तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवून तुमचे ओठ गुलाबी करू शकतो. याशिवाय तुम्ही त्याचा स्क्रब बनवूनही ओठ स्वच्छ करू शकता.

जर तुम्हाला त्याचा ज्यूस प्यायचा नसेल तर तुम्ही या सॅलडमध्येही खाऊ शकता.त्यामुळे या सर्व कारणांसाठी तुम्ही या पदार्थांचा आहारात समावेश करा. हे तुमच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत, तसेच तुमचे सौंदर्य वाढवू शकतात.

Fruits for Lips care

लाईफस्टाईलमध्ये हे बदल करा

धूम्रपान सोडा
धूम्रपान केल्याने ओठ काळे होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे, कारण सिगारेट आणि तंबाखूच्या धुरामध्ये निकोटीन आणि बेंझोपायरिन आढळतात, ज्यामुळे शरीरात मेलेनिनचे प्रमाण वाढते आणि ओठ काळे होतात.

 

पुरेसे पाणी प्या
जर तुम्ही कमी पाणी पीत असाल तर त्याचा परिणाम ओठांच्या रंगावर दिसतो, कारण त्वचेमध्ये 70 टक्के पाणी असते. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे, ओठ काळे होतात, अशा स्थितीत एखाद्या व्यक्तीने नियमितपणे 8-10 ग्लास पाण्याचे सेवन करावे.

स्क्रब

बहुतेक लोक ओठ घासत नाहीत, ज्यामुळे त्यांच्यावरील मृत त्वचेच्या पेशी काढल्या जात नाहीत. ओठांवरील मृत पेशींमुळे काळे पडतात, म्हणून जर तुम्हाला गुलाबी ओठ मिळवायचे असतील तर तुमचे ओठ नियमितपणे स्क्रब करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT