Lisa Haydon natural beauty secret esakal
लाइफस्टाइल

Beauty Tips : लिजा हेडनच्या नॅचरल ब्युटीचे टॉप सिक्रेट; वाचाल तर नक्की ट्राय कराल !

चमकदार स्कीन पण नो केमिकल, वाचा लिजाचं ब्यूटी सिक्रेट

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवुडमध्ये काम म्हणजे सतत मेकअप करावा लागतो. त्यामुळे मुळ चेहरा खराब होण्याची शक्यता जास्त असते. पण, तीन बाळांना जन्म दिल्यानंतरही बॉलिवूडची अभिनेत्री लिजा हेडनचे ग्लॅमरस सौंदर्य तसूभरही कमी झालेले नाही. चमकदार त्वचेसाठी ती कोणत्याही कॉस्मेटीकचा वापर करत नाही. त्यासाठी ती घरगुती उपाय करते. तिचे सौंदर्य टिकवण्यासाठी ती काय नुख्सा वापरते. तिचे सिक्रेट काय आहे हे पाहुयात. (Lisa Haydon natural beauty secret)

नारळाचे तेल नैसर्गिक मॉश्चरायझर म्हणून काम करते. नारळ तेलाच्या गुणधर्मांमुळे ते केवळ केसांसाठीच नाही तर सौंदर्य प्रसाधने आणि DIY रेसिपीमध्ये देखील वापरले जाते. नारळाचे तेल मॉइश्चरायझर तर आहेच पण त्याचसोबत ते केसाचे डॅंड्रफपासून बचाव करून केसांना भरपूर पोषण देते. नारळ तेल हे व्हायरल आजारांपासून रक्षण करते.

कोरडे फाटलेले ओठ

तूमचे ओठ फाटलेत आणि तूम्ही त्यावर सतत लिप बाम लावत आहात. तरीही काही फरक पडत नसेल. तर, लीजा हेडनकडे एक उपाय आहे. तो असा की, १ चमचा खोबरेल तेल, अर्धा चमचा साखर आणि चिमूटभर कोको पावडर घ्या. याची पेस्ट करा. आणि आपल्या ओठांवर लावा. हलक्या हाताने गोलाकार फिरवत स्क्रब करा. 10 मिनिटे ठेवा आणि धुवून टाका. ओठ कोरडे करून कोणताही लिप बाम लावा. याने ओठावरील मृत त्वचा काढण्यास मदत होईल.

चेहऱ्यासाठी फेसपॅक

पार्लरमध्ये जाऊन तासंतास बसून चेहऱ्यावर ग्लो आणणं तस खर्चिक आणि वेळखाऊ आहे. यासाठीच नारळ तेल आणि एवोकॅडो पासून बनवलेला फेस मास्क तुम्हाला झटपट चमक देईल. हा मास्क बनवण्यासाठी 1 चमचे मॅश केलेला एवोकॅडो, 1 चमचे खोबरेल तेल आणि गुलाब पाण्याचे काही थेंब मिक्स करा. हा पॅक तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेच्या भागावर लावा. 15-20 मिनिटे तसाच ठेवा. कोमट पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर हलके मॉइश्चरायझर लावा.

कोरडे रूक्ष केस

भारतीय मातांच्या केसांना तेल लावण्यामध्ये नारळाचे तेल महत्त्वाची भुमिका बजावते. केसांना पोषण मिळण्यासाठी नारळ तेल हे असे आहे ज्यावर आपण पुर्ण विसंबून राहू शकतो. तुम्ही ऑलिव्ह ऑईल, खोबरेल तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल एकत्र करून केसांना लावा. तुमच्या हेअरकेअर रुटीनमध्ये हे तेल ऍड करा. यामुळे केसांना योग्य ते पोषण मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd ODI Live : आकिब नबीने विश्वास सार्थ ठरवला... किवींना ११ धावांत २ धक्के; KL Rahul चा अविश्वसनीय झेल Video Viral

Bala Nandgaonkar: विकसकाच्या बाऊन्सर्सचा बंदोबस्त करा; बाळा नांदगावकर; पिंगुळी पाझर तलाव, सासोली जमीन घोटाळाप्रश्‍नी आक्रमक

Pune Markets: दिवाळीनिमित्त व्यापारी पेठा गजबजल्या ;नवीन खतावण्यांची खरेदी; विविध दुकानांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई

Latest Marathi News Live Update : शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज; सकाळी १० वाजता ब्रीच कँडी रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार

Amba Ghat Tunnel Project : आंबा घाटाला मिळणार बोगद्याचा पर्याय! कागल ते रत्नागिरी प्रवास आता अवघ्या एका तासात; प्रकल्प अहवाल तयार करण्याची मंत्री गडकरींकडून सूचना

SCROLL FOR NEXT