Living Room Decoration Ideas :
Living Room Decoration Ideas : esakal
लाइफस्टाइल

Living Room Decoration Ideas : घरातील इंटेरिअर निवडताना काळजीपूर्वक निवडा : इंटेरिअर करतं तणाव कमी

सकाळ डिजिटल टीम

Living Room Decoration Ideas : आपलं घर सुंदर आणि नीटनेटकं असावं, असं प्रत्येकाला वाटतं. खरं तर, घर हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. त्यामुळे घराच्या सजावटीचा विचार करताना दक्षता घ्यायला हवी. घरात आल्यावर शांत, प्रसन्न वाटावं, मन प्रफ़ुल्लित व्हावं, असं वाटतं.

घर प्रत्येकासाठी महत्वाचं असतं, विशेषत: दिवसभराच्या तणावानंतर शांत आणि निवांत आनंद घ्यायला आपण आपल्या घराकडेच परत येतो. एखाद्या ठिकाणाचं इंटेरिअर आणि स्‍पेस तुमच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक किंवा मग नकारात्मक परिणाम करू शकतात असं अनेक अभ्यासांमध्ये स्पष्ट झालंय.

तुमच्या घरातील सकारात्मकता वातावरण तुमचा आत्मविश्वास वाढविण्यात मदत करू शकते. त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व आणि घरातील सकारात्मक ऊर्जा लक्षात घेऊनच इंटेरिअर तयार करायला हवं. तणाव कमी करण्यासाठी घराच्या इंटेरिअर मध्ये काय काय करता येईल ?

कुल कलर्स निवडा

TheHealthy.com ने घराचं इंटेरिअर कसं असावं याविषयी माहिती दिली आहे. घरातील शांतता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी कुल कलर्स म्हणजेच हलके पेस्टल रंग निवडता येतील. हलक्या रंगांमुळे घर मोठं आणि मोकळ दिसतं. यामुळे संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा पसरते ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.

सजावट काळजीपूर्वक निवडा

इंटेरिअर आणि मानसिक आरोग्य यांच्यात खोल असा संबंध असतो. घर सजवताना काही गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला प्रेरणा मिळेल अशा पेंटिंग आणि फोटो घरात लावा. कौटुंबिक फोटोंप्रमाणे आणि जॉमेट्रिक डिझाइनच्या फोटो फ्रेम्स चांगल्या प्रेरणा देतात. तुमच्या बेडरूममध्ये पसारा ठेवू नका, अडगळीत पडलेल्या वस्तू तणाव निर्माण करण्याचं काम करतात.

झाडं लावा

घरात इनडोअर प्लांट्स लावली तर ते सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचं काम करतात. सोबतच तुम्ही एखाद पेट म्हणजेच प्राणी पाळू शकता. पाळीव प्राण्यांची काळजी घेणं आपल्याला उपयुक्त वाटू शकतं. प्राण्यांच्या किंवा झाडांच्या काळजी घेण्याच्या कृतीमुळे आत्मविश्वास वाढू शकतो. तसेच, त्यांच्या सोबत वेळ घालवल्याने व्यक्तीचा ताण कमी होऊ शकतो. जास्त ताणतणाव असल्यास, तुम्ही त्यांच्याशी तुमच्या मनातल्या गोष्टी शेअर करू शकता, ज्यामुळे मन देखील हलके होऊ शकते.

घरात पर्सनल स्पेस बनवा

बहुतेक घरांमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती राहतात. अशा घरात स्वतःसाठी वेळ काढणे कठीण असते. अशा परिस्थितीत, घरामध्ये पर्सनल स्पेस तयार करणं आवश्यक आहे. या स्पेस मध्ये तुम्ही तुमच्या आवडीची आरामदायी खुर्ची, सॉफ्ट म्युजिक आणि तणाव कमी करणारी झाडं लावू शकता. तणाव कमी करण्यासाठी घराचं इंटेरिअर पॉजिटीव्ह आणि एनर्जेटिक असावं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT