Lokmanya Tilak First Punyatithi was Ticketed  Sakal
लाइफस्टाइल

Lokmanya Tilak Death Anniversary: टिळकांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला गांधीजी होते अध्यक्ष, चक्क २५ रुपये होते तिकीट

What happened at Lokmanya Tilak's first death anniversary: लोकमान्य टिळकांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे आयोजन तिकीट लावून करण्यात आले होते.

सकाळ वृत्तसेवा

How much was the ticket for Tilak's first death anniversary: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ मध्ये झाला होता. तर मृत्यू १ ऑगस्ट १९२० मध्ये झाला होता. आज त्यांची १०५ वी पुण्यतिथी आहे. लोकमान्य हे खरोखर लोकांचे नेते होते. त्यांच्यावर सर्वांचेच प्रेम असल्याचे अनेक उदाहरणं बघायला मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे त्यांच्या शेवटच्या काळात अगदी सामान्य माणसापासून ते ज्येष्ठ नेत्यांपर्यंत सर्वच त्यांच्या प्रकृतीकडे डोळे लावून होते.

त्यांच्या तब्येतीची चौकशी करत होते. अन् त्यांची प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून सतत प्रार्थना करत होते. टिळकांच्या अंत्ययात्रेला एवढा मोठा जनसमुदाय लोटला होता की, हा देखील एक अभूतपूर्व प्रसंग होता.

महात्मा गांधी अन् टिळकांची भेट

महात्मा गांधी आणि टिळकांमधले तात्विक वाद सर्वांना माहित आहेत. पण त्यांच्यात व्यक्तीक पातळीवर मैत्रीपूर्ण संबंध होते हे अनेक उदाहरणांवरून स्पष्ट झाले आहे. टिळकांच्या शेवटच्या काळात गांधीजी त्यांना भेटायला गेले होते शिवाय त्यांच्या अंत्ययात्रेला महात्मा गांधींनी खांदाही दिला होता. या दोन्ही युगपुरुषांची भेट कशी झाली बघुया.

टिळक गांधी भेट

क्रॉफर्ड माकेर्टसमोरील सरदारगृहात झालेली टिळक गांधी भेट ही भारतीय इतिहासाल्या ' दोन युगांची भेट' होती. १६ जून १९१८ ला गांधीजी टिळकांना भेटायला सरदारगृहात गेले. त्यावेळी या दोन महान नेत्यांनी मनसोक्त वाद घातला. विषय होता महायुद्धात बिटिश सत्तेला मदत करायची की नाही!

टिळकयुगाकडून गांधीयुगाकडे नेणारी भेट

भारतातल्या जनतेने न्यायाचा विचार करत ब्रिटनला मदत करायला हवी असे गांधीजींचे मत होते. पण भारतात लोकशाही येईल याचं वचन दिल्याशिवाय सहकार्य करणार नाही, अशी भूमिका टिळकांची होती. या वादात ते गांधीजींना म्हणाले की, तुम्ही संत आहात. पण राजकारणात संत नको असतात. या ऐतिहासिक वादाची टिपणं जमनादास द्वारकादास यांनी घेतली होती. नंतर त्याची अचूकता त्यांनी गांधीजींकडून तपासूनही घेतली होती.


भारतीय स्वातंत्र्याचा लढा टिळकयुगाकडून गांधीयुगाकडे नेणारी ही भेट होती. यानंतर १९२० मध्ये पुन्हा गांधीजी सिंहगडावर टिळकांना भेटायला गेले. टिळक गांधीजीना म्हणाले होते, '' तुम्हाला जेव्हा इंग्रजांच्या कुटिलनीतीचा अनुभव येईल तेव्हा इंग्रजांचा विरोध करण्यात तुम्ही माझ्याही पुढे जाल.''

टिळकांची पहिली पुण्यतिथी

टिळकांच्या अंत्ययात्रे प्रमाणेच प्रथम पुण्यतिथीही वेगळीच होती. फोर्टमधील एक्सलसियर थिएटरमध्ये टिळकांच्या पहिल्या पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम तिकीट लावून आयोजित करण्यात आला होता.

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी होते. कार्यक्रमाच्या पहिल्या रांगेचे तिकीट २५ रुपये होते, जी त्याकाळाची मोठी रक्कम होती. पण एवढे असूनही एकही खुर्ची रिकामी नव्हती हे विशेष. जमा झालेला सर्व निधी टिळक स्वराज्य फंडाला देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 5th Test: भांडणं झाली पण तरी जो रुट - करुण नायरच्या त्या कृतींनी जिंकली लाखो चाहत्यांची मनं; पाहा नेमकं काय झालं

Neck Lump Causes: सतत मानेच्या खाली गोळा जाणवतोय? मग हे कारण आणि उपाय जाणून घ्या

Megaflash Lightning : अमेरिकेत ८२९ किमीपर्यंत विजेचा लखलखाट, सर्वांत लांब अंतरापर्यंत चमकल्याचा नवा विक्रम; २०१७ मधील वादळात नोंद

Raj Thackeray: एकदा अटक करून दाखवा, राज ठाकरेंचे सरकारला खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाले?

Nandurbar News : एका चिमुकल्याची संघर्षगाथा! चांदसैली घाटातील जीवघेणे खड्डे बुजवण्यासाठी सातवीतला विद्यार्थी भीक मागतोय

SCROLL FOR NEXT