Maharashtra Din 2024 esakal
लाइफस्टाइल

Maharashtra Din 2024 : बहु असोत सुंदर संपन्न की महा..प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.! महाराष्ट्र दिनाच्या द्या हटके शुभेच्छा

Maharashtra Din 2024 : ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या जयघोषात आज सर्वत्र महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा केला जाणार आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Maharashtra Din 2024 : ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या जयघोषात आज सर्वत्र महाराष्ट्र दिन (Maharashtra Din) उत्साहात साजरा केला जाणार आहे. १ मे हा दिवस देशभरात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची विभागणी करण्यात आली होती. त्यानंतर, महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य उदयास आले.

महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांसाठी महाराष्ट्र दिन हा गौरवाचा दिवस असतो. आजच्या दिवशी लोक एकमेकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही शुभेच्छांबद्दल सांगणार आहोत.

१. जन्मलो ज्या मातीत, ती माय मराठी

गुणगुणलो जे गीत ते गीत मराठी

मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

२. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!

३. माझा महाराष्ट्र माझा

मनोमनी वसला शिवाजी राजा

वंदितो या भगव्या ध्वजा

गर्जतो गर्जतो महाराष्ट्र माझा

१ मे महाराष्ट्र दिनाच्या

आपणास हार्दिक शुभेच्छा..!

४. आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीयन असण्याचा

आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा

आम्ही जपतो आमची संस्कृती

आमची निष्ठा आहे मातीशी

मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

५. मंगल देशा, पवित्र देशा

महाराष्ट्र देशा, प्रणाम माझा

घ्यावा हा महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

६. महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार

दिनाच्या सर्व मराठी बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा..!

७. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक घुमतो नाद

महाराष्ट्र आहे मराठी माणसांसाठी खास

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

८. महाराष्ट्राची यशोगाथा

महाराष्ट्राची शौर्यगाथा

पवित्र माती लावू कपाळी

धरणी मातेच्या चरणी माथा

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

९. 'अखंड राहो सदा हे शिवराष्ट्र

जयघोष करूया जय जय जय जय महाराष्ट्र'

१०. अभिमान आहे मराठी असल्याचा,

गर्व आहे महाराष्ट्रीयन असल्याचा

आपणास महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : ११ षटकार, ९ चौकार... पुण्यात ३९ चेंडूंत शतक ठोकणाऱ्या फलंदाजाचे SRH कडून पदार्पण, कोण आहे Salil Arora?

Balapur Crime : दारूच्या नशेत मित्रांनीच मित्राला संपवले; खुनाचा छडा उलगडला; दोन आरोपींना ठोकल्या बेड्या

Akola News : ‘ई-गव्हर्नन्स’मध्ये अकोला एसपी कार्यालयाला तृतीय क्रमांक; मुख्यमंत्र्यांच्याहस्ते एसपी अर्चित चांडक यांचा गौरव

Pune News: हॉटेल मालकांनो सावधान! गॅस टंचाईच्या नावाखाली जादा पैसे घेणं पडणार महागात; 'सीसीपीए'ने काढला कारवाईचा बडगा.

महिलेनं थेट मुख्यमंत्र्यांना आलिंगन देत गालावर KISS केलं, रॅलीतला VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT