Gandhi Jayanti 2023 esakal
लाइफस्टाइल

Gandhi Jayanti 2023 : मीठ आणि डाळीऐवजी या पद्धतीचा आहार घ्यायचे गांधीजी

गांधीजींना जास्त तेल, मसाले आणि मीठाचे पदार्थ आवडत नसे.

साक्षी राऊत

Gandhi Jayanti 2023 : महात्मा गांधीच्या कार्याची प्रचिती सर्वत्र होत असते. त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचे आजही जगभरातून कौतुक होताना दिसते. मात्र गांधीजींच्या आहाराविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. गांधीजींचा आहार फार साधा होता. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींची कडक शिस्त होती. गांधीजींना जास्त तेल, मसाले आणि मीठाचे पदार्थ आवडत नसे.

गांधीजींचा जन्म गुतराती कुटुंबात झाला होता. त्यांचा मांसाहारास विरोध होता. विदेशात असतानासुद्धा गांधीजी मांसाहार करत नव्हते. इंग्लंडमध्ये शिकण्यासाठी जाताना गांधीजींनी कधीही मांसाहार करणार नाही असे वचन दिले होते. यासाठी अनेकदा ते विदेशात साधे जेवण न मिळाल्यास उपाशीसुद्धा राहायचे.

मीठ आणि डाळीचे सेवन अगदी कमी करायचे

गांधीजींच्या जेवणात मीठ आणि डाळीचे प्रमाण अगदी कमी म्हणजे नसल्यासारखेच होते. याशिवाय त्यांच्या मते, कमकुवत शरीर असलेल्या लोकांनी डाळीचे सेवन करू नये. याबाबत त्यांनी त्यांच्या आत्मकथेतसुद्धा सांगितले आहे. त्यांच्या आत्मकथेत असा देखील उल्लेख आहे की जेव्हा कस्तुरबा यांची प्रकृती बिघडली होती तेव्हा त्यांनी मीठ आणि डाळीचा त्याग करण्याचा आग्रह केला होता.

भाज्या आणि फळांचे सेवन

गांधीजींना फळे खायला फार आवडायचे. ते प्रत्येक फळांची चव घ्यायचे.

गांधीजी ड्राय फ्रूट्ससुद्धा खायचे

गांधीजींना ड्राय फ्रूट्सपण फार आवडायचे. ड्राय फ्रूट्स फक्त कोरडेच नाही तर त्यांना भात किंवा बिर्याणीसोबतही खायला आवडायचे.

दूधाचे सेवन टाळायचे

महात्मा गांधी यांच्या मते, 'मनुष्य केवळ आईचे दूध हक्काने पिऊ शकतो. तेव्हा त्याने फक्त आईच्याच दूधाचे सेवन करावे आणि प्राण्यांच्या दूधाचे सेवन टाळावे. ज्याप्रमाणे मांसाचे सेवन टाळावे त्याचप्रमाणे दूधाचे सेवनही टाळावे.' (Mahatma Gandhi)

गांधीजी या कच्च्या पदार्थांचे सेवन करायचे

अकुरलेले गहू ८० ग्राम

कुटलेले बदाम ४० ग्राम

सगळे बदाम १० ग्राम

हिरव्या भाज्या (काकडी १६० ग्राम)

लिंबू २० ग्राम

मध ४० ग्राम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Latest Marathi News Live Update: डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी बोगद्यामध्ये सुरक्षा दलांनी संयुक्त 'मॉक ड्रिल' (सराव) आयोजित केला

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

१९ चौकार, ६ षटकार... Vaibhav Sooryavanshi चा भाऊही घालतोय धुमाकूळ! दीडशतक ठोकल्यानंतर भावाची स्पेशल पोस्ट

Mumbai AC Local : खुशखबर! 'मरे'वर आणखी १२ एसी लोकल फेऱ्या; एकूण संख्या १२० वर

SCROLL FOR NEXT