Makar Sankranti 2024 esakal
लाइफस्टाइल

Makar Sankranti 2024 :  आज आहे मकर संक्रांती, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि बरंच काही

काही ठिकाणी पतंग उडवण्याची स्पर्धा भरवून हा मकर संक्रांती साजरी केली जाते

Pooja Karande-Kadam

Makar Sankranti 2024 :

2024 वर्षाला नव्या उत्साहात सुरूवात झाली आहे. नव्या वर्षाचा आनंद द्विगुणीत करणारा नव्या वर्षाचा पहिला सण लवकरच येणार आहे. धार्मिक दृष्टिकोनातूनही नवीन वर्ष अनेक अर्थांनी खास आहे. वर्षाचा पहिला महिना जानेवारी असतो आणि या महिन्यात अनेक उपवास आणि सण असतात. यातील मकर संक्रांत हा हिंदूंचा सर्वात महत्त्वाचा सण आहे.

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसारही हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे मकर संक्रांती जल्लोषात साजरी केली जाते. गुजरातमध्ये केवळ तिळगूळ देऊन नाहीतर अनेक पारंपरिक पदार्थ आणि पतंगबाजीची स्पर्धा भरवून हा मकर संक्रांती साजरी केली जाते.  

काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्या मते, जेव्हा सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा सूर्याची मकर संक्रांती येते. वर्षाच्या सुरुवातीला मकर संक्रांत हा मोठा सण आहे. हिंदू धर्मात मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर स्नान करून दान केल्याने पुण्य प्राप्त होते, असा समज आहे.

2024 मध्ये मकर संक्रांतीचा सण कधी आहे आणि या सणावर स्नान आणि दान करण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे हे आपण ज्योतिषांकडून जाणून घेऊया.

ज्योतिषी चक्रपाणी भट्ट सांगतात की ज्योतिषशास्त्रीय मकर संक्रांतीचा सण 2024 मध्ये 15 जानेवारी रोजी साजरा केला जाईल. तो दिवस पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचवी तिथी आहे आणि तो दिवस सोमवार आहे.

कधी जाईल सूर्य मकर राशीत ?

15 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा मुहूर्त पहाटे 2:54 वाजता आहे. त्यावेळी सूर्य देव मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतर सुमारे महिनाभर सूर्यदेव मकर राशीत राहतील. याचा परिणाम जनजीवनावर होणार आहे.

यावेळी मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करून काही गोष्टींचे दान करावे. त्या दिवशीचा महापुण्यकाळ 1तास 45 मिनिटांचा असतो. शुभ काळातही मकरसंक्रांतीला स्नान करणे शुभ मानले जाते.

  • मकर संक्रांतीचा शुभ काळ सकाळी 07:15 ते 09:00 पर्यंत आहे.

  • मकर संक्रांतीचा शुभ काळ 10 तास 31 मिनिटांचा असेल. मकर संक्रांतीचा पुण्यकाल सकाळी 7.15 ते सायंकाळी 5.46 पर्यंत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar : ''...त्यावेळी आज आपणच पेरलेल्या विषाची जाणीव त्यांना होईल, पण वेळ मात्र गेलेली असेल''

ENG vs IND: टीम इंडियाने बुमराहशिवाय दोन्ही कसोटी जिंकल्या! सचिन तेंडुलकर म्हणाला, 'त्याने सुरुवात चांगली...'

Trump Tariff India Response: ट्रम्प यांच्या अतिरिक्त टॅरिफवर आता भारतानेही स्पष्ट केली भूमिका अन् दिलं सडेतोड प्रत्युत्तर!

Tutari Express: तुतारी एक्स्प्रेसमुळे प्रवाशांचा खोळंबा, वेळापत्रकात बदल करण्याची मागणी

Virar News : अर्नाळा किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी वाचवले आठ जणांचे प्राण; माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला जीवरक्षकांचा सत्कार

SCROLL FOR NEXT