Makeup Remover esakal
लाइफस्टाइल

Makeup Remover : मेकअप रिमुव्हरसाठी कशाला पैसे खर्च करताय? घरच्या घरी हे ऑप्शन्स आहेत की!

तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील मेकअप कसे काढता

Pooja Karande-Kadam

Makeup Remover : लग्नात फुल मेकअप करणाऱ्या, सजून धजून मिरवणाऱ्या तरूणी दिवसाच्या शेवटी मात्र मेकअप काढण्याचा कंटाळा करतात. त्यामुळे थेट पाणी मारून चेहऱ्याला साबण, फेसवॉश लावून मेकअप काढणाऱ्या अनेक तरूणी आहेत. पण, त्यामुळे चेहऱ्याचे नुकसानच होते.

ज्यावेळी आपण मेकअप करतो त्यावेळी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील मेकअप कसे काढता. कारण मेकअप पुसट झाला किंवा तो काढण्याची गरज काय असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकी करताय. कारण तुम्ही केलेल्या मेकअपमुळे चेहऱ्याला हानी पोहचू शकते.

रोजच्या मेकअपमुळे त्वचेत पॅराबेन्ससारखे हानिकारक रसायन प्रवेश करतात. मेकअप जास्त काळ त्वचेवर राहिल्यास त्यामुळे अॅलर्जी होऊ शकते. त्वचेनुसार मेकअप नसला तरी त्वचेचा पीएच डिस्टर्ब होतो. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर पावडरचा फाउंडेशन लावल्याने देखील पुरळ आणि खाज सुटते.

जर तुम्ही मेकअप प्रेमी असाल तर तुम्ही अनेकदा मेकअप करत असाल. अशा परिस्थितीत जर तुमचा मेकअप रिमूव्हर संपला असेल तर आज आम्ही घरीच सोप्या पद्धतीने मेकअप रिमूव्हर बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. अनेकदा डोळ्यांचा मेकअप काढण्यासाठी डोळ्यांना बराच वेळ घासावे लागते.

ज्यामुळे तुमच्या डोळ्यांनाही नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत हे घरगुती मेकअप रिमूव्हर मेकअप देखील सहज काढून टाकतात आणि तुमचे डोळे जास्त चिकट किंवा तेलकट होत नाहीत, तर चला जाणून घेऊया घरी मेकअप रिमूव्हर वाइप्स कसे बनवायचे.

रोझ वॉटर रिमूव्हर वाइप्स

यासाठी अर्धा कप गुलाब पाण्यात अर्धा चमचा बदाम तेल आणि व्हिटॅमिन ईच्या 2 कॅप्सूल मिसळा. मग हे मेकअप रिमूव्हर एका छोट्या बॉक्समध्ये भरून साठवा. यामुळे तुमच्या डोळ्यांचा मेकअप सहज स्वच्छ होतो.

कोरफड

यासाठी एक वाटी घ्या आणि त्यातील एक तृतीयांश पाणी भरा. मग तुम्ही त्यात एक चतुर्थांश कोरफड वेरा जेल टाका. यानंतर त्यात एक चमचा भाज्या ग्लिसरीन घालून मिक्स करा. त्यानंतर तुम्ही त्यात कॉटन वाइप्स किंवा कॉटन बॉल्स टाकून डोळ्यांचा मेकअप स्वच्छ करा.

जोजोबा ऑइल रिमूव्हर वाइप्स

जोजोबा तेलाला नैसर्गिक मेकअप रिमूव्हर म्हणूनही ओळखले जाते. विशेषतः डोळ्यांचा मेकअप स्वच्छ करणे चांगले. यासाठी एका बाटलीत थोडे गुलाबजल आणि जोजोबा तेल मिसळा. त्यानंतर तुम्ही डोळ्यांचा मेकअप काढा.

बेबी ऑईल

तुमच्या त्वचेसाठी बेबी ऑईल हे सगळ्यात उत्तम आहे. तुम्हाला मॉश्चरायझर लावायचे नसेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला बेबी ऑईल लावून देखील तुमचा चेहरा स्वच्छ करु शकता. बेबी ऑईल लावल्यानंतर तुम्ही चेहऱ्यावर मसाज केला तरी तुमचा मेकअप निघेल.

खोबरेल तेल

घरात अगदी सहजपणे उपलब्ध असणारी गोष्ट म्हणजे खोबरेल तेल. याचा उपयोग करुनही तुम्ही तुमचा मेकअप काढून टाकण्यासाठी करू शकता. खोबरेल तेल वापरल्यामुळे तुम्हाला कोणतेही नुकसान होत नाही. त्यामुळे तुम्ही अगदी सहज मेकअप उतरवू शकता.

आजकाल No Makeup Look फार ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे घरगुती टिप्सनेच त्वचा निरोगी ठेवा. कमीतकमी मेकअप करा. रोज मेकअप करावा लागला तरी कमीत कमी मेकअप करता येतो.

No Makeup Look साठी या टिप्स फॉलो करा

• स्किन प्रेप केल्यानंतर आपल्या पिगमेंटेड एरियात हलका कंसीलर लावा.

• तुमची आवडती लिपस्टिक लावा.

• न्यूड आय मेकअपही करता येतो.

• कोणतीही ऍलर्जी किंवा रिअॅक्शन असल्यास, ते ताबडतोब काढून टाका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT