how to make curry leaves oil for hair growth Esakal
लाइफस्टाइल

Curry Leaves Oil: जेवण चविष्ट करणाऱ्या कडीपत्त्या चे केसांसाठीही आहेत हे फायदे.....

केसांसाठी कडीपत्त्याचा वापर विविध प्रकारे करता येतो. तुम्ही कडपत्त्याच्या मदतीने कडीपत्ता तेल तयार करू शकता. तसचं हेअर मास्कमध्येही तुम्ही कडपत्ता वापरू शकता

Kirti Wadkar

वरणाची फोडणी असो किंवा इडलीची चटणी स्वयंपाकाची चव वाढवणारा कडीपत्ता आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. कडीपत्त्यामध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट उपलब्ध असतात. यामुळेच कडीपत्ता केसांच्या आरोग्यासाठी देखील गुणकारी आहे. Marathi Beauty Tips Advantages of Curry Leaves for Hair Care

यातील अँटीऑक्सिडंट्समुळे केसातील ऑक्सिडेटिव स्ट्रेस कमी करण्यास मदत होते. कडीपत्त्यामुळे Curry Leaves केस गळणं कमी होवून त्यांची चांगली वाढ होते. तसचं केस काळेभोर Hair Care आणि दाट होतात. 

केसांसाठी कडीपत्त्याचा वापर विविध प्रकारे करता येतो. तुम्ही कडपत्त्याच्या मदतीने कडीपत्ता तेल तयार करू शकता. तसचं हेअर मास्कमध्येही तुम्ही कडपत्ता वापरू शकता. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी कडीपत्त्याचा वापर कसा करणं शक्य आहे. याचे काही सोपे पर्याय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

केसांसाठी कडीपत्त्याचे फायदे

केसांच्या विविध समस्या दूर करण्यासाठी कडीपत्ता फायदेशीर आहे. बदलत्या हवामानामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढतं. त्याचप्रमाणे केमिकल युक्त Hair Products वापरल्याने केस निस्तेज दिसू लागतात. यामुळे स्कॅल्पही ड्राय होतो आणि केस अधिक गळू लागतात. कडीपत्तामध्ये आढळणारी पोषक तत्व तुमचे केस आणि स्कॅल्प दोन्हीसाठी फायदेशीर आहे.

कडीपत्त्यामध्ये विटामिन ए, विटामिन बी, विटामिन सी तसचं कॅल्शियम आणि आयर्न मुबलक प्रमाणात आढळतं. या तत्वांमुळे केसांना पुरेसं पोषण मिळतं. तसचं कडीपत्त्यामध्ये अँटीफंगल, अँटी ऑक्सिडंट, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. यामुळे कडीपत्ता केसांसोबतच आपल्या त्वचेसाठी देखील उपयुक्त आहे. 

हे देखिल वाचा-

  1. कडीपत्ता आणि काळ्या तीळाचं तेल- हे तेल तयार करण्यासाठी नारळाचं गॅसवर गरम करत ठेवावं. तेल चांगलं तापल्यानंतर त्यात कडीपत्त्याची पानं आणि काळे तीळ टाकावं. त्यानंतर गॅस बंद करावा. तेल गार झाल्यानंतर ते बाटलीत भरून ठेवावं. या तेलाने आठवड्यातून दोनदा मालिश केल्यास केस गळणं कमी होईल. तसचं पांढरे केस काळे होण्यासाठी देखील हे तेल उपयुक्त आहे. 

  2. कडीपत्ता आणि कापूर- अनेकदा केसामध्ये कोंडा झाल्याने देखील केस गळू लागतात. केसातील हा कोंडा दूर करण्यासाठी कडीपत्ता तुमची मदत करेल. यासाठी एका वाटीत ४-५ चमचे नारळाचं तेल घ्यावं. त्यात थोडी कापूर पावडर टाकावी. यात कडीपत्त्याच्या ७-८ पानांची पेस्ट तयार करून मिसळावी. 

हे मिश्रण केसांना आणि केसांच्या मुळांना लावून थोड मसाज करावं. अर्धा तासाने एखाद्या सौम्य शॅम्पूने केस धुवावेत. हा केअर मास्क तुम्ही १५ दिवसातून एकदा लावू शकता. कापूर आणि कडीपत्त्यामध्ये अँटीफंगल गुणधर्म असल्यामुळे तुमच्या केसातील कोंडा दूर होण्यास मदत होईल.  

  1. कडीपत्ता आणि कॉफी हेअर पॅक- कॉफी देखील तुमच्या केसांसाठी फायदेशीर आहे. त्यात जर कडीपत्तादेखील समाविष्ट केला जर त्याचे फायदे अधिकच वाढतील. हा पॅक तयार करण्यासाठी नारळाच्या तेलामध्ये कडीपत्ता आणि कॉफी पावडर टाका. त्यानंतर हे एकत्रित वाटून एक लेप तयार करा. 

हा पॅक केसांना आणि केसांच्या मुळांना लावा. त्यांनतर अर्धा तासाने केस स्वच्छ धुवा. या पॅकमुळे केसांमधील कोलेजन बूस्ट होण्यास मदत होईल त्यामुळे केस काळे होण्यास मदत होईल. 

  1. कडीपत्ता आणि दही- कडीपत्ता आणि दह्याच्या पेस्टमुळे देखील तुमच्या केसांच्या समस्या दूर होवू शकता. यासाठी दह्यासोबत कडीपत्त्याची काही पानं मिक्सरच्या मदतीने चांगली वाटून घ्यावी. हा हेअर मास्क केस आणि स्कॅल्पला लावावा. अर्धा तासानंतर केस स्वच्छ धुवावे. 

कडीपत्ता आणि दह्याचा हेअर पॅक लावल्याने केसांना पुरेसं पोषण आणि प्रोटीन मिळतं. यामुळे केस मुळांपासून मजबूत होतात. दह्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात. तसचं कोंड्याची समस्या दूर होते. 

हे देखिल वाचा-

  1. कडीपत्ता आणि आवळा पावडर- कमी वयातच पांढरे केस होण्याच्या समस्येने अलिकडे अनेकजण त्रस्त आहेत. यासाठीच कडीपत्ता आणि आवळा उपयुक्त ठरु शकतो. यासाठी तुम्ही एक मिश्रण तयार करून ठेवू शकता. सगळ्यात आधी कडीपत्त्याची पानं सावलीत वाळवून त्याची पावडर तयार करा. त्यानंतर कडीपत्ता पावडर सोबत आवळा पावडर आणि मेथी पावडर एकत्र करून हे पावडरचं मिश्रण एका डब्ब्यात भरून ठेवा.

केसासाठी हेअर पॅक तयार करण्यासाठी तयार पावडरचं मिश्रण १-२ चमचे घ्या. यात एलोवेरा जेल आणि नारळाचं तेल मिसळून पॅक तयार करा. हा हेअर पॅक केसांना आणि केसांच्या मुळांना लावा. साधारण ३०-४५ मिनिटांनी केस सौम्य शॅम्पूने धुवा. आठवड्यातून एकदा या हेअर पॅकचा वापर केल्याने पांढऱ्या केसांची समस्या दूर होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wakad Hinjewadi News : वाकड, हिंजवडीत अनधिकृत पार्किंगमुळे कोंडी; वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष; नागरिकांकडून कारवाईची मागणी!

Mutual Fund : काय आहे Active आणि Passive म्युच्युअल फंड? जाणून घ्या म्युच्युअल फंडमधील रिस्क आणि रिटर्न!

IND vs SA: शुभमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी प्रवास करणार की नाही? अखेर BCCI नेच दिले अपडेट

Viral News : ऑफिसमध्ये मॅनेजर बनायचा हिटलर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार

Latest Marathi Breaking News Live Update : 26 तारखेच्या बैठकीत युवा स्वाभिमान पार्टीची भूमिका स्पष्ट करू - नवनीत राणा

SCROLL FOR NEXT