रक्तदाब नियंत्रण
रक्तदाब नियंत्रण Esakal
लाइफस्टाइल

High Blood Pressure ची समस्या आहे? तर या भाज्यांचं सेवन ठरू शकतं फायदेशीर

Kirti Wadkar

हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. हा एका प्रकारचा दीर्घकालीन आजार असून याला सायलेंट किलर असंही म्हंटलं जातं. या आजारावर वेळीच उपचार किंवा नियंत्रण केलं नाही तर हार्ट अटॅक, छातीत दुखणे, स्ट्रोक, डोकं दुखी Headacheआणि क्रोनिक किडनी डिजीज Kidney Disease सारख्या अन्य समस्यांचा सामना कराना लागू शकतो. तणाव चुकीचा आहार, आहारातील जास्त मिठाचं प्रमाण या गोष्टी उच्च रक्तदाबासाठी High Blood Pressureकारणीभूत ठरू शकतात. Marathi Health News Vegetables useful to control High Blood Pressure

120/80 mmhg ही ब्लड प्रेशरची Blood Pressure नॉर्मल रेंज आहे. जर रक्तदाबाची रेंज याहून जास्त असेल तर त्याला हाय ब्लड प्रेशर म्हंटलं जातं. ब्लड प्रेशरला नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार हा मुख्य घटक आहे. आहारात तेल, मीठ Salt आणि मसाल्यांच सेवन कमी केल्यास ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय काही भाज्या Vegetables अशा आहेत ज्याचा तुम्ही आहारात समावेश करून उच्च रक्तदाब नियंत्रणात आणू शकता.

पालक-पालेभाज्यांमध्ये पालक ही आरोग्यासाठी अनेक दृष्टीने गुणकारी आहे. पालकमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या आयरनमुळे शरीरात रक्त तयार होण्यास मदत होते. तसचं पालकमध्ये कॅल्शियमचं प्रमाणही चांगल असतं. त्यामुळे पालकचा आहारात समावेश करून हाय बीपीच्या समस्यावर मात करणं शक्य आहे. यात वेळोवेळी पालकची भाजी किंवा दाल-पालक सारखे पदार्थ तुम्हा आहारात घेऊ शकता. त्याचसोबत पालक सूप, पालक पराठे हे देखील पर्याय आहेत. Spinach control high blood pressure  

गाजर- गाजर खाल्ल्याने त्वचा आणि केसांना तर फायदा होतोच शिवाय गाजराच्या सेवनाने उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासही मदत होते. गाजरच्या सेवनाने सिस्टोलिक बीपी कंट्रोल करणं शक्य आहे. तसचं लिवरला साफ करण्यासाठी गाजर शरिरात इंजाइम तयार करतं. गाजरमध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट असल्याने हृदयासंबधीत इतर समस्या दूर करण्यासाठी देखील गाजर गुणकारी आहे. Carrot health benefits

काकडी- काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. काकडीमध्ये पोटॅशियमचं प्रमाण चांगलं असतं. पोटॅशियम सोडियमचं प्रमाण नियंत्रणात राखण्यास मदत करतं.Cucumber for high bp काकडीचा आहारात समावेश केल्याने शरीराला आवश्यक असलेलं पोटॅशियम मिळतं ज्यामुळे हाय बीपी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

दूधी-दूधीच्या ज्युसमध्ये देखील पोटॅशियम उपलब्ध असल्याने रक्तदाब नियंत्रणात आणण्यास मदत होते. नियमितपणे दूधच्या ज्युसच सेवन केल्यास हृदय विकारांच्या धोक्यापासूनही बचाव होतो. 

टोमॅटो-हाय ब्ल़ड प्रेशर असेल्या रुग्णांसाठी आहारात टोमॅटोचा समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं. केवळ रक्तदाबाची समस्या असणाऱ्यांसाठीच नव्हे तर हृद्याचं आरोग्य उत्तम राखण्यासाठीदेखील टोमॅटो उपयुक्त आहे. टोमॅटो सूप किंवा ज्युसचा आहारात समावेश करून आरोग्याची काळजी घेता येईल. Tomato soup for blood pressure 

हे देखिल वाचा-

ब्रोकोली-ब्रोकोली ही एक अशी भाजी आहे जिच्याच अनेक औषधी गुणधर्म आहेत. फ्लेवोनाइडस् आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी परिपूर्ण असलेली ब्रोकली उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. यातील गुणधर्मांमुळे शरिरातील नायट्रिक ऑक्साइडची पातळी वाढवण्यास मदत करून बीपी नियंत्रणाच ठेवण्यास फायदा होतो. तसचं ब्रोकलीमधील मॅग्नेशियम आणि कॅल्शियम बाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास फायदेशीर ठरतं. हायपरटेंशन असलेल्या व्यक्तींनी नियमित ब्रोकोलीचं सेवन करावं. Broccoli health benefits 

बटाटा-अनेकांच्या आवडीचा आणि अनेकांच्या जेवणात वापरण्यात येणारा बटाटादेखील ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करू शकतं. बटाट्याचं योग्य प्रकारे सेवन करणं रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. सालीसह उकडलेल्या बटाट्याचं सेवन रक्तदाब नियंत्रणात आणण्यास मदत करू शकतं. बटाट्यामध्ये असलेलं मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवतं.

कोबी-कोबीमुळेदेखील उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यास मदत होते. कोबीच्या सेवनामुळे शरिराला आवश्यक असलेल्या पोटॅशियमची कमतरता भरून निघण्यास मदत होते. कोशिंबीर तसच सलाड किंवा सपूच्या स्वरुपात तुम्ही कोबी आहारात समाविष्ट करू शकता.

हे देखिल वाचा-

बीट-बीट खालल्याने रक्तदाब नियंत्रणास मदत होते. बीटमध्ये असणारं नायट्रेटस् रक्त वाहिन्यांना आराम देण्याचं काम करतात ज्यामुळे जास्त असलेला रक्तदाब कमी होण्यास मदत होते. 

या भाज्यांसोबतच आहारात लसूण समाविष्ट करणंही उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी फायद्याचं आहे. लसणातही नायट्रीक ऑक्साइडचं मुबलक प्रमाण असल्याने ते रक्तदाब कमी करण्यास मदत करतं. तसचं लाल शलजम आणि रताळं आहारात समाविष्ट करणंही High Blood pressure असेल्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतं.

टीप- हा लेख सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी आपल्या वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RR vs PBKS Live Score: पंजाबचा तिखट मारा, पण परागने दिली एकाकी झुंज! राजस्थानचे पंजाबसमोर 145 धावांचे लक्ष्य

PM Modi Mumbai roadshow : ''जुने रेकॉर्ड तोडणार'' मोदींच्या मुंबईतील 'रोड शो'ला तुफान प्रतिसाद; पंतप्रधान म्हणाले...

Pune Crime News : महादेव ॲपद्वारे ऑनलाइन सट्टा चालविणाऱ्या कॉल सेंटरवर छापा

IPL 2024 Play Off : प्ले ऑफसाठी कोणाला किती संधी; हैदराबादची 87, चेन्नईची 72 टक्के शक्यता; तर आरसीबी...

Slovakia Prime Minister : स्लोवाकियाच्या पंतप्रधानांवर झाडल्या गोळ्या; जखमी अवस्थेत रुग्णालयात केलं दाखल

SCROLL FOR NEXT