bottle gourd juice for Weight loss
bottle gourd juice for Weight loss Esakal
लाइफस्टाइल

Weight loss Juice: वजन कमी करायचं आहे मग ‘या’ पद्धतीने करा दुधी भोपळ्याचा आहारात समावेश

Kirti Wadkar

Weight loss Juice: दूधी भोपळ्याची भाजी ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. खास करून उन्हाळ्यामध्ये Summer दुधीच्या भाजीचं सेवन केलं जातं. दुधीच्या भाजीत पाण्याचं आणि फायबरचं प्रमाण जास्त असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ती पचनासाठी हलकी असते.

दुधीच्या सेवनाने वाढतं वजन, पचन आणि बुद्धकोष्ठतेसारख्या Constipation अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. Marathi Weight Loss Tips Bottle Gourd for Health 

खास करून वजन कमी करण्यासाठी Weight Loss दूधी भोपळ्याचा आहारात समावेश करणं उपयुक्त छरू शकतं. या भाजीच्या सेवनाने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. तसचं शरीर डिटॉक्स Detox झाल्याने त्वचा देखील चांगली होते. वजन कमी करण्यासाठी दूध भोपळ्याचं वेगवेगळ्या प्रकारे सेवन करता येईल. 

दूधी भोपळ्याचं सूप Bottle Gourd Soup For Weight Loss

वाढतं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तसचं वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये दुधीच्या सूपचा समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं. हे सूप अगदी झटपट तयार होते.

सूप तयार करण्यासाठी एका कुकरमध्ये दुधीचे तुकडे घाला. यात चिरलेला कांदा, टोमॅटो, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काळीमिरी पूड आणि अर्धा ग्लास पाणी टाकून ३-४ शिट्या घेवून दुधी शिजवून घ्यावा. त्यानंतर मिक्सर किंवा ब्लेंडरच्या मदतीने  भाज्या चांगल्या ब्लेंड करून घ्याव्या. 

यानंतर एका फोडणीच्या भांड्यात अर्धा चमचा तेल घेऊन त्यात ३-४ कडिपत्त्याची पानं आणि २ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या आणि जिरं चांगल तडतडलं की ही फोडणी दूधीच्या मिश्रणात टाकावी. पुन्हा १-२ मिनिटं चांगली उकळी येऊ द्यावी. अशा प्रकारे दुधीचं सूप तयार होईल. या सूपचं नियमित सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होईल. 

हे देखिल वाचा-

दुधी भोपळ्याची स्मूदी- वजन कमी करण्यासाठी अलिकडे वेगवेगळ्या स्मूदीचं सेवन केलं जातं. स्मूदी मुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहिल्याने भूक लागत नाही. परिणामी वजन कमी होण्यास मदत होते. यासाठीच तुम्ही दूधी भोपळ्याच्या स्मूदीचा तुमच्या Weight loss diet मध्ये समावेश करू शकता. 

दूधीची स्मूदी तयार करण्यासाठी एक मध्यम आकाराचा दुधी घेऊन त्याची साल काढावी. यानंतर दुधीचे बारीक तुकडे करून ते मिक्सरच्या भांड्यात टाकावे.

यात अर्धा चमचा मीठ, अर्धा टी स्पून जीरं पूड,  पुदीन्याची काही पानं आणि अर्धा लिंबाचा रस घालावं. आवडीनुसार तुम्ही यात काळीमिरी देखील टाकू शकता. यानंतर मिक्सर सूरू करून दुधीची स्मूदी तयार करावी. 

या स्मूदीमध्ये तुम्ही बर्फाचे काही तुकडे टाकू शकता. नियमितपणे या स्मूदीचं सेवन केल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होईल. तसचं पोटाची चरबी देखील कमी होण्यात मदक होईल. 

दुधी भोपळ्याचा ज्यूस- वजन कमी करण्यासाठी दुधी भोपळ्याचा ज्यूस हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. यामुळे शरीर डिटॉक्स होण्यासही मदत होते. यासाठी दुधी भोपळा किसणीवर बारीक किसून घ्यावा. त्यानंतर एका सुती कापडाच्या मदतीने किसलेल्या दुधीचा रस काढून घ्यायचा आहे. तसचं मिक्सरमध्ये देखील तुम्ही दुधीचा रस काढू शकता. 

दुधीच्या रसात तुम्ही चवीपुरतं काळ मीठ घालून सकाळी सेवन केल्यास शरीरातील फॅट्स कमी होण्यासाठी मदत होईल. 

दुधीची भाजी- वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारामध्ये दुधीच्या भाजीचा देखील समावेश करू शकता. ही भाजी बनवताना मात्र अत्यंत कमी तेलाचा वापर करायचा आहे. अगदी साध्या पद्दतीने तयार केलेली दुधीचा भाजी देखील चविष्ट लागते. 

एका कढईल १ टेबलस्पून तेल तापवत ठेवावं. तेल तापल्यावर त्यात जीरं, मोहरी, कडीपत्ता, हिरवी मिरची, हिंग आणि हळद टाकावी. त्यानंतर यात बारीक  कापलेले दुधीचे तुकडे टाकावे.

चवीपुरतं मीठ टाकून झाकणं ठेवून १०-१५ मिनिटं दुधी शिजू द्यावा. यानंतर थोडी कोथिंबीर टाकून तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत ही भाजी खावू शकता. 

दुधीचे आरोग्यासाठी फायेद

दुधी भोपळ्याच्या नियमित सेवनामुळे वजन कमी होण्यासोबतच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राखण्यास मदत होते. तसचं दुधीमधेये विटामिन सी, विटामिन बी, विटामिन ए, विटामिन के हे शरिरासाठी आवश्यक विटामिन्स असतात.

तसचं यात फॉलेट, आयरन, मॅग्नेशिय आणि पोटॅशियम ही पोषक तत्व असल्याने त्याचा शरीराला फायदा होतो. दुधीमध्ये अत्यंत कमी कॅलरी असल्याने वजन कमी होण्यास मदत होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एमआयडीसी मध्ये जागा बघितली होती पण... दाभोलकर खुनाप्रकरणी जन्मठेप झालेल्या शरदच्या घरी शोकाकुल वातावरण

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना दिलासा! ऐन निवडणुकीत न्यायालयाने मंजूर केला अंतरिम जामीन

Latest Marathi News Live Update : भाजपला यावेळी सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागेल- राहुल गांधी

Hardik Pandya: हार्दिकला कसा मिळाला BCCI चा 'अ' श्रेणीचा करार? जय शाहांनी सांगितलं काय होती अट..

Narendra Dabholkar Case Live Updates: निकालाला इतकी वर्षे लागल्याने आम्ही अस्वस्थ होतो: पवार

SCROLL FOR NEXT