Married Man Flirting 
लाइफस्टाइल

लग्नानंतरही पुरूष फ्लर्ट का करतात? 5 कारणे वाचा

काही पुरूष नैसर्गिकच मनमोकळ्या स्वभावाचे असतात

सकाळ डिजिटल टीम

लग्नानंतरही अनेक पुरूष आपल्या बरोबर वावरणाऱ्या मुलींशी मोकळेपणाने वागतात. काहीवेळा ते मुलींची गंमतही करतात. काहीवेळा जरा जास्त तारीफ करतात. पुरूषांची फ्लर्ट करण्याची ही सवय एकीकडे गमतीशीर वाटत असली तरी बायकोला मात्र असे प्रकार आवडत नाहीत. त्यामुळे त्यांच्या नात्यात समस्या येऊ शकतात.

लग्नानंतर का करतात पुरूष फ्लर्ट?

काही पुरूष नैसर्गिकच मनमोकळ्या स्वभावाचे असतात. ते महिलांशीही तसेच वागतात. अशावेळी त्यांच्याकडे संशयाने पाहिले जाते. पण चांगले वागणे आणि फ्लर्ट करणे यात सुक्ष्म फरक आहे. त्यामुळे पुरूष फ्लर्ट का करतात हे जाणून घेणे गरजेचे आहे.

ही आहेत कारणे

१) स्वतःचीच मागणी कायम ठेवण्याची इच्छा- महिलांमध्ये स्वत:ची डिमांड राहावी यासाठी अनेक पुरूष फ्लर्ट करतात. तसेच आपण अजून आकर्षक दिसतो का नाही याचीही ते यानिमित्ताने खात्री करून घेत असतात. फ्लर्ट केल्याने पुरुषांचा आत्मविश्वास खूप वाढतो.

२) बायकोशी जवळीक नसणे - पुरुषांना ज्याप्रमाणे गरज असते त्याप्रमाणे त्यांच्या लाइफ पार्टनरकडून लक्ष दिले जाऊ शकत नाही, किंवा बायको खूप जवळीक साधण्यात कमी पडते. यामागे अनेक कारणे असू शकतात. लग्नानंतर स्त्रिया घर सांभाळण्यात, मोठ्यांचे, मुलांचे करण्यात जास्त बिझी असतात. त्यामुळे नवऱ्याकडे फारसे लक्ष जात नाही.

Married Man Flirting

३) काहीतरी रोमांचकारी घडण्याची इच्छा- अनेक पुरूष आपल्या आयुष्यात थ्रील,रोमांचकार घडावे याच्या शोधात असतात. त्यामुळेच ते अनेकदा फ्लर्ट करण्यासाठी उत्सुक असतात. त्यातून स्वतःला बरे वाटण्याचा प्रयत्न असतो. पण, असे करणे कुटुंबासाठी धोकादायक असू शकते.

४) पत्नीला वेठीस धरण्याचा प्रयत्न - अनेक पुरूष आपल्या बायकोसमोरच दुसऱ्या महिलांशी फ्लर्ट करतात. त्यातून ते बायकोला चिडविण्याचा किंवा तिला जळवण्याचा प्रयत्न करतात. ही पद्धत नात्यासाठी धोक्याची असू शकते. त्यामुळे असे प्रयत्न कधीच करू नका.

५) विवाहबाह्य संबंधांची इच्छा- बहुतेक पुरुषांना लग्नानंतर दुसऱ्या स्त्रीशी शारीरिक संबंध ठेवायचे असतात. त्यासाठी ते फ्लर्ट करतात. असे करून ते बायकोची फसवणूक करतातच. पण, त्यांना खोटं बोलण्याची सवय लागते.

लग्नानंतर फ्लर्ट करू नका- लग्नानंतर फ्लर्ट करणे अनैतिक आहे. त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होतात. तसेच नातेही तुटू शकते. त्यामुळे वैवाहिक जीवन सुरळीत जावे अशी इच्छा असेल तर फक्त बायकोशी फ्लर्ट करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

Indapur Accident : इंदापूरमध्ये भरधाव कारचा थरार; झाडाखाली उभ्या तीन वाहनांना धडक

SCROLL FOR NEXT