Matrimonial Sites esakal
लाइफस्टाइल

Matrimonial Sites वर सर्रास माहिती लपवली जाते, तेव्हा या 5 प्रकारच्या लोकांपासून रहा सावध

तुमच्या एका चुकीमुळे तुमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. या साइट्सवर सावध कसे राहावे जाणून घेऊया सविस्तर.

साक्षी राऊत

Matrimonial Sites : हल्ली काळाच्या बदलानुसार बऱ्याच पारंपारिक पद्धतींत बदल झालेले आहेत. तसेच आता पार्टनर निवडण्यासाठी बघण्याचा कार्यक्रम, निरोप या सगळ्यांमध्ये मॉर्डनायझेशन झाल्याचं दिसून येतं. वेळेअभावी हातातली कामं सोडून मुलीला किंवा मुलाला एका शहरातून दुसऱ्या शहरात निव्वळ बघण्यासाठी किंवा भेटण्यासाठी जाणेही शक्य नाही. त्यासाठी बरेच लोक मॅट्रोमोनियल साइट्सचा वापर करतात. मात्र जरा जपूनच.

मॅट्रोमोनियल साइट्सवर पार्टनर शोधताना फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. हल्ली या साइट्सवर फ्रॉड्सचे प्रमाण वाढतच चालले आहे. तुमच्या एका चुकीमुळे तुमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. या साइट्सवर सावध कसे राहावे जाणून घेऊया सविस्तर.

स्वत:च्या मूळ रंगबाबत खोटे बोलणे

त्वचेच्या रंगावरून कित्येक लग्न जुळतात आणि तुटतातही. समाजात अजूनही या विषयावर भेदभाव दिसून येतो. मॅट्रोमोनियल साइट्सवर रंगाबाबत खोटं बोलणारे बरेच लोक आहेत. तेव्हा योग्य चौकशी करूनच होकार द्यावा.

वयाची खोटी माहिती देणारे

विशिष्ट वयानंतर पार्टनर शोधणे फार कठीण होऊन बसते. मुलींच्या बाबतीत तर ही बाब अवघड असते. या साइट्सवर लोक वयाबाबत सर्रास खोटं बोलतात. प्रोफाइलवर वयाचा वाढता आकडा टाकला तर प्रोफाइलचा प्रभाव फारसा लोकांवर पडत नाही असेही अनेकांचे मत असते. त्यामुळे लोक खोटे बोलत संवाद साधतात. तेव्हा अशा लोकांपासून सावध राहीले पाहिजे.

प्रोफेशनबाबत खोटे बोलणे

मॅट्रिमोनिअल साइट्सची अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये मुले त्यांच्या व्यवसायाबद्दल चुकीची माहिती लिहितात. जेणेकरून अधिकाधिक लोक त्यांच्या प्रोफाइलला रिस्पाँस देतील. अनेकवेळा हे खोटे बोलून मुलीच्या कुटुंबीयांकडून अधिक हुंडा मिळविण्याचा प्रयत्नही केला जातो. अशा परिस्थितीत लग्नाचे प्रकरण पुढे नेण्यापूर्वी अधिकृत कागदपत्रे नीट तपासणे आवश्यक आहे.

फॅमिली बॅकग्राउंडबाबत चुकीची माहिती

प्रत्येक व्यक्ती सुशिक्षित आणि समजदार कुटुंबात नातं जोडू पाहातो. जेणेकरून समाजात त्यांची प्रतिष्ठा वाढेल. त्यामुळे बरेच लोक मॅट्रिमोनियल साइट्सवर संपत्ती आणि प्रोफेशनबाबत खोटी माहिती देत हाय प्रोफाइल कुटुंबातील असल्याचं प्रदर्शन करतात. आणि या चुकीच्या माहितीच्या आधारावर लग्न करणारे लोक फसतात. (marriage)

पास्ट रिलेशनबाबत खोटे बोलणे

मॅट्रिमोनियल साइट्सवर परफेक्ट पार्टनर शोधणं फार कठीण असतं. कारण बरेच लोक येथे त्यांच्या पास्ट लव्ह रिलेशनबाबत खोटे बोलतात. काही लोक तर त्यांच्या लग्नाबाबतही खोटं बोलतात. तेव्हा सोशल साइट्सवर मुलं शोधणे खरंच फार कठीण काम आहे. तेव्हा संपूर्ण माहिती आणि योग्य चौकशी करूनच जोडीदार योग्य असल्याची खात्री पटवून घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT