May Born Babies esakal
लाइफस्टाइल

May Born People : मे मध्ये जन्मलेली मुले असतात फार खास, त्यांचे हे गुण प्रत्येकाला हवे असतात

मे मध्ये जन्मलेली मुले या कारणाने असतात खास

सकाळ डिजिटल टीम

May Born Babies : मे महिना हा वर्षाचा पाचवा महिना असून या महिन्यात जन्मलेली मुले या कारणाने फार खास असतात. गुरु रवींद्रनाथ टागोर, राणी व्हिक्टोरिया, बॉब डिलन आणि अभिनेता जॉन वेन यांचाही जन्म मे महिन्यात झाला होता. या ताऱ्यांप्रमाणेच मे महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये काही खास गोष्टी आणि गुण असतात. मे महिन्यात जन्मलेल्या लोकांची राशी म्हणजे वृषभ आणि मिथुन. ज्या लोकांचा वाढदिवस 20 मे पर्यंत येतो ते वृषभ राशीत येतात आणि 21 मे नंतर जन्मलेले लोक मिथुन राशीत येतात.

चला तर जाणून घेऊया मे महिन्यातील लोकांमध्ये असे काय खास गुण असतात जे इतरांनाही हवे हवेसे वाटतात.

हे लोक यशस्वी असतात

यश कोणाला नको असते आणि मे महिन्यात जन्मलेल्या लोकांना ते जन्मापासूनच मिळते. हे लोक खूप भाग्यवान मानले जातात आणि त्यांना यशाचे वरदान मिळते. ते नेहमी जीवनाबद्दल सकारात्मक असतात आणि अपयशाला घाबरत नाहीत. यामुळेच त्यांना त्यांच्या कामात आणि आयुष्यात सहज यश मिळते.

सिस्टिमॅटिक काम करण्यात निपूण असतात

मे महिन्यात जन्मलेल्या लोकांची एक खास गोष्ट म्हणजे ते त्यांचे काम अगदी परफेक्ट करतात. तुम्ही त्यांना जे काही काम द्याल ते तुम्हाला हवे तसे ते करतील. त्यांची कामं करण्याची पद्धत त्यांना इतरांपेक्षा वेगळी बनवते. हे लोक प्लॅनिंगमध्ये खूप चांगले असतात आणि त्यांना त्यांच्या कामात कसे पुढे जायचे हे चांगले माहित असते.

Summer Shopping

बोलके असतात

जर तुमचा कोणताही मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांचा जन्म मे महिन्यात झाला असेल तर तुम्हाला हे माहित असेलच की मे महिन्यात जन्मलेले लोक बोलके असतात. या लोकांचा स्वभाव चॅटरबॉक्स असतो कायम बोलण्याची सुरुवात त्यांच्यापासूनच होत असते.

त्यांच्या येण्याने चार चौघात चैतन्य निर्माण होते आणि ते नेहमीच उर्जेने भरलेले असतात. त्याच्या या गुणामुळे ते सर्वांच्या पसंतीस उतरतात आणि लोक त्याला आपला मित्र बनवू इच्छितात.

साहसी असतात

या लोकांना त्यांचे काम तर आवडतेच पण साहसाचीही आवड असते. त्यांना मजेदार आणि साहसी गोष्टी करायला आवडतात. त्यांना फिरण्याचीही आवड असते आणि त्यांना नवनवीन ठिकाणी भेट द्यायला आवडते. कोणीतरी त्यांच्यासोबत असो वा नसो, त्यांना त्यांच्या प्रवासाच्या सहलीचा आनंद कसा घ्यायचा हे चांगलेच ठाऊक आहे आणि कोणामुळे त्यांचे प्लॅन रद्द करत नाहीत. (astrology)

क्रिएटिव्ह असतात

मे महिन्यात जन्मलेले लोक कला कौशल्याने परिपूर्ण असतात. यासोबतच ते खूप हुशार आणि चांगले बोलतात. ते काहीही नवीन करण्याचा प्रयत्न करण्यास मागेपुढे पाहत नाही आणि कधीही डेडलाइन चुकवत नाही. (Lifestyle)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganesh Festival: माधुरीचं काय चुकलं? पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हायची सुमित्रा हत्तीण, काय आहे इतिहास?

शाहरुख-दीपिका विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल! कोर्टाच्या आदेशानंतर दाखल झाली एफआयआर, नक्की काय आहे प्रकरण?

Ganesh Chaturthi 2025: एकदंतासमोर राशींनुसार करा 'या' मंत्रांचा जप, अडचणींच्या फेऱ्यातून होईल सुटका

Dada Bhuse : ‘माझं गाव, माझी शाळा’ थीममध्ये शिक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानी गणेश आरास

Latest Marathi News Updates : नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कोलंबी गावात शिरलं पाणी

SCROLL FOR NEXT