Men more likely to die as temperatures rise at night  
लाइफस्टाइल

रात्री तापमान वाढल्यास पुरुषांच्या जीवाला धोका? काय सांगते संशोधन

सकाळ डिजिटल टीम

1 अंश सेल्सिअसने तापमान वाढल्याने मृत्यूचा धोका 4% जास्त

इंग्लंड, वेल्स आणि युनायटेड स्टेट्स सारख्या देशांमध्ये अभ्यास

उन्हाळ्यामध्ये रात्री तापमान वाढल्याने पुरुषांच्या मृत्यूची शक्यता वाढते असे एका नव्या अभ्यासातून हे समोर आले आहे. अभ्यासानुसार, सामान्य उष्णतेपेक्षा फक्त 1 अंश सेल्सिअस वाढल्यास हृदय संबधीत आजारांमुळे मृत्यूचा धोका सुमारे 4 टक्क्यांनी वाढतो. बीएमजे ओपनमध्ये प्रकाशित झालेल्या या नवीन संशोधनानुसार, रात्रीच्या वाढत्या तापमानामुळे मृत्यूचा धोका फक्त पुरुषांमध्येच दिसून आला आहे. मात्र, याचा महिलांवर कोणताही परिणाम होत नाही.

मागील अभ्यासात असे आढळून आले आहे की, उष्ण हवामानामुळे मृत्यू आणि हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वाढते. पण या संदर्भात कोणत्याही विशिष्ट वयाच्या लोकांचा उल्लेख नव्हता. त्यासाठी टोरंटो विद्यापीठाच्या एका टीमने ६०-६९ वयोगटातील लोकांच्या मृत्यूच्या प्रकरणांमध्ये हे दिसून आले. या अभ्यासासाठी, संशोधकांनी ऑफिस फॉर नेशनल स्टॅटिक्सकडून 2001 ते 2015 दरम्यान जून-जुलैमध्ये हृदयविकारामुळे झालेल्या मृत्यूंबाबत डेटा गोळा केला.

Men more likely to die as temperatures rise at night

अभ्यासासाठी, संशोधकांनी इंग्लंड आणि वेल्स सारखे देश निवडले, कारण या महिन्यांत युनायटेड किंगडममध्ये उष्णता सर्वात जास्त असते. त्याने किंग काउंटी, वॉशिंग्टन येथूनही असाच डेटा गोळा केला, जिथे हवामान जवळजवळ सारखेच आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2001 ते 2015 दरम्यान, इंग्लंड आणि वेल्समध्ये एकूण 39,912 लोक हृदयविकाराने मरण पावले, तर किंग काउंटीमध्ये 488 लोकांचा मृत्यू झाला. संशोधकांना असे आढळून आले की,'' इंग्लंड आणि वेल्समध्ये तापमानात 1 अंश सेल्सिअस वाढ झाल्याने 60-64 वयोगटातील पुरुषांमध्ये हृदयविकारामुळे मृत्यूचा धोका 3.1 टक्क्यांनी वाढला आहे. या वर्गात वृद्ध आणि महिलांचा समावेश नव्हता.

तसेच, किंग काउंटीमध्ये, तापमानात 1 अंश सेल्सिअस वाढ झाल्याने 65 किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या पुरुषांमध्ये हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका 4.8 टक्के होता. संशोधकांनी इंग्लंड आणि वेल्ससारख्या देशांबद्दल चिंता व्यक्त केली आहे, कारण अलीकडे रात्रीचे तापमान वाढले आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की हा डेटा पाहता, मध्य-अक्षांश ते उच्च-अक्षांश प्रदेशांमध्ये राहणाऱ्या लोकसंख्येसाठी धोक्याची पातळी समानपणे तपासली पाहिजे.

या लक्षणांवर लक्ष ठेवा

हृदयविकारामुळे हृदयविकाराच्या झटक्यासारख्या घटना घडू शकतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की रात्री घाम येणे, छातीवर ताण येणे किंवा अस्वस्थ होणे ही हृदयविकाराची लक्षणे असू शकतात. एका अहवालानुसार, इंग्लंडमध्ये दरवर्षी सुमारे 80,000 लोक हृदयविकाराच्या झटक्यासाठी रुग्णालयात जातात. त्यामुळे त्याच्या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Pune: 'आर्टी'च्यावतीने शनिवारी पुण्यात अभियंता उद्योजक कार्यशाळा

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Pachod News : गुन्हा दाखल केलेल्या इसमांवर पोलिसांनी कारवाई न केल्याने एकाने व्हिडीओ बनवून केले विष प्राशन; घाटी रुग्णालयात उपचार सुरू

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

SCROLL FOR NEXT