Men’s Health esakal
लाइफस्टाइल

Men’s Health : महिलांप्रमाणे पुरुषांनीही मॅनिक्युअर अन् पेडिक्युअर करावं, पुरुषांसाठी फायद्याचं

पुरुषांनीसुद्धा त्यांच्या त्वचेची काळजी घेणे महत्वाचे आहे. आज आपण त्याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Men’s Health : बाहेर पडताच उन्हामुळे त्वचा डॅमेज होण्याची शक्यता वाढते. महिला त्वचेशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी बरेच उपाय करत असतात. मात्र बहुतांश पुरुष त्वचेची काळजी घेत नाही. त्वचेची देखभाल ही त्यांची फर्स्ट प्रायोरिटी कधीच नसते. त्यामुळे त्यांच्या हातापायांची त्वचा टॅन आणि डॅमेज होऊ लागते. तेव्हा पुरुषांनीसुद्धा त्यांच्या त्वचेची काळजी घेणे महत्वाचे आहे. आज आपण त्याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

पुरुषांनी मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करण्याचे फायदे

मॅनिक्युअर आणि पेडिक्युअरच्या मदतीने तुमच्या हाता पायांत आणि बोटांमध्ये असलेली धुळ बाहेर काढण्यास मदत होते. सोबतच हातांवर आणि पायांवर बसलेल्या बॅक्टेरियाने इंन्फेक्शनचा होण्याचा धोकाही कमी होतो. असे करण्यासाठी हात आणि पायांना कोमट पाण्यात 10-15 मिनिटे ठेवा. या पाण्यात तुम्ही लॅवेंडर ऑइलसुद्धा टाकू शकता. (Men)

Men’s Health

हातापायांच्या नखांचीही काळजी घेता येते

अनेकदा धक्का लागून किंवा जखमेमुळे नखे तुटतात. अशावेळी इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. मात्र जेव्हा तुम्ही मॅनिक्युअर किंवा पेडिक्युअर करता तेव्हा तुमची नखे ट्रिम असतात आणि ती तुटण्याची शक्यता कमी होते. मॅनिक्युअर आणि पेडिक्युअरच्या मदतीने तुम्ही नखांच्या आतील मळसु्द्धा स्वच्छ करू शकता.

पायांची दुर्गंधी दूर होते

पुरुष कायम ऑफिसमध्ये शूज आणि सॉक्स घालून जातात. त्यामुळे अनेकांच्या पायांतून घाण वास येऊ लाकतो. अधिक काळ शूज घातल्याने पायात बॅक्टेरिया वाढण्याचा धोका वाढतो. पेडिक्युअर केल्याने पुरुषांच्या पायांमधील दुर्गंधी दुर होते तसेच हायजिनही मेंटेन राहाते. (Lifestyle)

स्ट्रेस लेव्हल कमी होते

पेडिक्युअर केल्याने तुमच्या पायांना आणि पायाच्या तळव्यांना अॅक्युप्रेशर मिळतो. ज्यामुळे तुमची स्ट्रेस लेव्हल कमी होते. आणि फ्रेश वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जमीन-जागा विक्रीतील थांबणार फसवणूक! प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्याने काढावा ‘सर्च रिपोर्ट’; बॅंक कर्जाचा बोजा असलेली प्रॉपर्टी विकता येत नाही, वाचा...

दुर्दैवी योगायोग! 'चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू'; वीस दिवसांपूर्वी बँकेच्या अधिकाऱ्याचा मृत्यू अन्..

Panchang 17 November 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! लाडक्या बहिणींच्या ‘E-kyc’ला निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ? उद्या संपणार 2 महिन्यांची मुदत; 1 कोटींवर महिलांनी अजूनही केली नाही ‘ई-केवायसी’

Liquid Gold For Winters: हिवाळ्यात राहाल निरोगी, सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' हेल्दी ड्रिंक

SCROLL FOR NEXT