Men's Winter Fashion  esakal
लाइफस्टाइल

Men's Winter Fashion : मुलांनो! वाढत्या थंडीत फॅशन सेन्स जपायचाय? मफलरच्या या स्टाईल्स करा ट्राय

वाढत्या थंडीसोबत फॅशन कमी होत चालली आहे कारण थंडी एवढी वाढली आहे

सकाळ डिजिटल टीम

Men's Winter Fashion : वाढत्या थंडीसोबत फॅशन कमी होत चालली आहे कारण थंडी एवढी वाढली आहे की स्वेटरशिवाय घराबाहेर पडणं कठीण होत आहे म्हणून छान कपडेच घालायचे नाहीत असं नाही अन् फॅशन करायची म्हणून स्वेटर घालायचं नाही असं करूनही चालणर नाही. तुम्ही याला पर्याय म्हणून मफलर वापरू शकतात.

हे कितीही खरं असलं की मुलांकडे फॅशनचे खूप कमी ऑप्शन्स असतात, तरीही जर नीट वापर केला तर मुली तुमच्यावर फिदा झाल्याचं म्हणून समजा. मफलरचे हे काही ट्रेंडी प्रकार जाणून घेऊया.

१. कश्मिरी स्टाईल मफलर

जर तूम्हाला काहीसा रॉयल लूक हवा असेल तर कश्मिरी स्टाईल मफलर बेस्ट आहेत. हे मफलर तूम्ही कोणत्याही आऊटफिटवर कॅरी करू शकतात. कश्मिरी स्टाईल फॅब्रिक आपल्याला ट्रेडिशनल लूकसोबत ट्रेंडी लूकसाठीही मदत करतं.

२. वूलन स्टाईल मफलर

पूर्णपणे लोकरीचे मफलर दिसायला सुंदर तर दिसतातच पण त्याचसोबत यांना ऊबही खूप असते. या शिवाय याने तुम्हाला तुमचं लहानपणही आठवेल. यात तुम्हाला ग्रे किंवा ऑकर येलो कलर किंवा डार्क येलो कलरचे कॉम्बिनेशन सुंदर दिसतील.

३. चेक्स प्रिंटेड मफलर

तुम्ही हॅरी पॉटर फॅन असलेल्या लोकांकडे लाल आणि पिवळ्या रंगाचं मफलर बघितलं असेलच. चेक्स प्रिंटेड मफलर असेच असतात. ऑफिसवेअर फॉर्मल शर्टवर हे मफलर खूप सुंदर दिसतात.

४.प्लेन मफलर

राउंड नेक टि शर्ट आणि प्रिंटेड टि शर्टवरती प्रिंट असलेले मफलर तेवढे खास दिसणार नाहीत; त्याऐवजी असे प्लेन मफलर परफेक्ट दिसतील. यावरती डेनिमचे जॅकेट परिधान केले तर तूम्ही अजुन छान दिसाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT