Mint For Face Care  esakal
लाइफस्टाइल

Mint For Face Care : चेहरा म्हणजे तेलाची खाण, पुदिना चेहऱ्यावरचं तेल पिळून-पिळून बाहेर काढेल;बसं एवढंच करा

पुदिनाच्या पानांमध्ये मिथाँल आणि अँटी बॅक्टेरियल गुण असतात

Pooja Karande-Kadam

Mint For Face Care : पुदिना तसा फार कमी वापरला जाणारा पदार्थ, कधी बिर्याणीवर हवाहवासा वाटणारा पुदिना आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. तुम्हाला पचनसंस्थेविषयी असलेल्या प्रत्येक समस्येवरर पुदिना गुणकारी ठरतो. हा पुदिना चेहऱ्यालाही लावता येतो.

हो तुम्ही बरोबर ऐकलं, चेहऱ्यावरील डाग अन् तेलकटपणा कमी करण्यासाठी पुदिना मदत करतो. औषधी गुणधर्मांनी भरलेला पुदिना अनेक प्रकारे वापरला जातो. पुदिना बाल्कनीतल्या कुंडीतही सहज पिकवता येतो. त्याची पाने फक्त चटणी आणि रस बनवण्यासाठीच वापरली जात नाहीत तर अनेक आजार बरे करतात. पुदिना त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे.

पुदिनाच्या पानांमध्ये मिथाँल आणि अँटी बॅक्टेरियल गुण असतात. त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी पुदिन्याच्या पानांचा वापर केला जातो. चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, सनबर्न, घामोळे, रॅशेस या त्वचेच्या प्रत्येक समस्येवर पुदिना गुणकारी आहे. (Mint For Face Care : Mint leaves will do wonders for oily skin and acne, know how to make a face pack)

पुदिन्यात असलेले मेन्थॉल शरीरातील वेदना दूर करून मूड फ्रेश ठेवण्यास मदत करते. एवढेच नाही तर हा पुदिन्याचे नियमित सेवन केल तर सर्दी, खोकला, ताप यासारख्या समस्यांपासूनही सहज दूर राहता येते आणि ऋतूतील संसर्गापासूनही सुटका मिळते. 

पुदिन्याचे गुणधर्म कोणते

पुदिन्यात अँटीमायक्रोबियल, अँटीव्हायरस, अँटीऑक्सिडंट आणि अँटीट्यूमर, अँटी-एलर्जिक असे गुणधर्म असतात. ते मूड स्विंग, अनिद्रा, ऍसिडिटी, मायग्रेन, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये पुदिन्याचे सेवन खूप प्रभावी आहे.

पावसाळ्यात तेलकट त्वचेच्या लोकांमध्ये पिंपल्सची समस्या वाढते, यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पुदिना वापरू शकता. येथे आम्ही तुम्हाला पुदिन्याचे असे 3 फेस पॅक सांगत आहोत, जे लावल्यानंतर तुमचा चेहरा चमकेल.

पुदिना-काकडी फेस पॅक

पुदिना आणि काकडी दोन्ही चेहऱ्यावर थंडावा आणतील. हा पॅक बनवण्यासाठी पुदिन्याची पाने काकडीसोबत मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर चांगली मसाज करत लावा. 15 ते 20 मिनिटे राहू द्या. शेवटी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. हा पॅक वापरण्याचा परिणाम तुम्हाला पहिल्यापासूनच दिसेल.

पुदिना-कडुलिंब

पुदिन्यात व्हिटॅमिन ए आणि सॅलिसिलिक अॅसिड असते, जे मुरुमांमध्ये फायदेशीर आहे. पुदिना आणि कडुलिंबाचा पॅक बनवण्यासाठी दोन्हीची पाने समान प्रमाणात बारीक करून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर कोरडे होईपर्यंत लावा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

मिंट-मुलतानी माती फेस पॅक

निर्दोष चेहरा मिळवण्यासाठी मुलतानी माती आणि पुदिन्याचा फेस पॅक चेहऱ्यावर लावा. हे करण्यासाठी, तुम्हाला पुदिन्याच्या पानांची पेस्ट आणि 1 चमचे मुलतानी माती पावडर लागेल. दोन्ही नीट मिक्स करून पॅक बनवा आणि ते कोरडे होईपर्यंत चेहऱ्याला लावा. शेवटी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. हा फेस पॅक त्वचेवरील चिकटपणा दूर करतो आणि थंडपणा देतो.

पुदिना आणि मुलतानी माती

त्वचेसाठी मुलतानी माती चांगली असते. यामुळे त्वचेच्या छिद्रांमधून निघणारे तेल नियंत्रित राहते. मुलतानी मातीसह पुदिन्याची पाने, मध आणि दही एकत्रित मिसळून पॅक तयार करा. २० मिनिटांनी हा पॅक सुकल्यावर साध्या पाण्याने चेहरा धुवा. (Face Care)

पुदिना ऍलर्जीही बरी करते

पुदिन्याचे सेवन करणे त्वचेसाठी फायदेशीर ठरते. त्वचेला झालेले संक्रमण आणि खाज ते बरे करते आणि मुरुमांच्या लक्षणांपासून आराम देते. त्यामुळेच पुदिन्यापासून बनलेला हा चहा सर्व गोष्टींशी लढण्यासाठी चांगला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT