Mobile Charging Tips  esakal
लाइफस्टाइल

Mobile Charging Tips: मोबाईल फास्ट चार्जिंग करायला या टिप्स करतील मदत!

जर तुमचा फोन लवकर चार्ज करायचा असल्यास मोबाईलची स्क्रीन लॉक ठेवा

सकाळ डिजिटल टीम

आजच्या काळात स्मार्टफोन ही प्रत्येकाची गरज बनली आहे. आज फोन हे फक्त बोलण्याचे साधन राहिलेले नाही तर ते खूप स्मार्ट झाले आहे. त्यामुळे महिला त्यांचे बहुतांश काम स्मार्टफोनच्या माध्यमातून पूर्ण करतात. जास्त वापरामुळे फोनची बॅटरी लवकर संपते.

अनेकवेळा असे देखील घडते की, तुम्ही तुमचा फोन बराच वेळ चार्ज केला तरी तो खूप हळू चार्ज होतो किंवा पूर्ण चार्ज झाल्यानंतरही फोनची बॅटरी खूप लवकर संपते आणि तुम्हाला तो पुन्हा पुन्हा चार्ज करावा लागतो. चार्ज करण्यासाठी वेळोवेळी जाणवते. असे घडते कारण फोनची बॅटरी आता पाहिजे तसे काम करत नाही. तर, आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत, जे तुमच्या फोनच्या बॅटरीची काळजी घेण्यास मदत करतील. 

शेवटपर्यंत फोन वापरू नका

काही लोकांना ही सवय असते की, फोन बंद होईपर्यंत चार्जिंग करत नाहीत. तुम्हीही असेच करत असाल तर ते तुमच्यासाठी योग्य नाही. वास्तविक, एकदा फोन पूर्णपणे बंद झाला की, फोनच्या बॅटरीवर अतिरिक्त दबाव पडतो. त्यामुळे बॅटरी खराब होते.

एअरप्लेन मोड

खरंतर जेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल फ्लाईट मोडवर टाकता तेव्हा मोबाईलमधील कॉल करणे, इंटरनेट ब्राऊंजिग किंवा जीपीएससारखे फिचर्स बंद होतात. त्यामूळे फोन हा अधिक स्पीडने चार्ज होतो.

स्क्रीन लॉक

जर तुमचा फोन लवकर चार्ज करायचा असल्यास मोबाईलची स्क्रीन लॉक ठेवा आणि फोनचा वापर करू नका. मोबाईल स्विच ऑफ केल्यासही तो कमी वेळात फुल चार्ज होतो.

ओरिजनल चार्जर

आजकाल मोबाईल चार्जिंगसाठी सर्रास युनिव्हर्सल किंवा मल्टीटाईप चार्जर वापरल्याचं चित्र दिसतं. पण लक्षात ठेवा की, इमर्जन्सी सोडल्यास कधीही तुमचा फोन फक्त आणि फक्त फोनसोबत मिळालेल्या ओरिजनल चार्जरनेच चार्ज करा.

फीचर्स किंवा ऍप्स बंद करा

मोबाईल लवकर चार्ज करण्याच्या ट्रीकमध्ये अजून महत्त्वाची ट्रीक म्हणजे सर्व अॅप बंद करा. तसंच हेही लक्षात घ्या की, मोबाईलमधील वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि गुगल प्लेसारखे फीचर्स किंवा ऑटोमॅटीक अपडेट चालू असेल तर तेही बंद करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT