Monsoon Men Fashion Tips Sakal
लाइफस्टाइल

Monsoon Men Fashion Tips : पावसाळ्यात स्टायलिश दिसायचंय तर 'हे' नक्की ट्राय करा

या पावसाळ्यात तुमचा फॅशन गेम जिंकण्यासाठी या गाेष्टी लक्षात ठेवा.

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

Monsoon Men Fashion Tips : प्रत्येक ऋतूत वेगवेगळी फॅशन (Fashion) फाॅलो करतात. आता पावसाळा म्हटलं तर कधीही कोसळणारा पाऊस, आपण तयार होऊन बाहेर पडतो तेव्हा अचानक पाऊस पडतो. त्यामुळे घराबाहेर पडताना पावसानुसार कपडे घालावे लागतात. जेणेकरून आपल्याला कुठेही इम्बॅरेसिंग वाटणार नाही. कॉलेज किंवा ऑफिसला जाणाऱ्यांनी विशिष्ट प्रकारचे कपडे आणि शूजपासून दूर राहावे.

लेदर फूटवेअर टाळा

पावसाळ्यात शूजची जास्तीत जास्त काळजी घ्या. पाणी शोषून घेणारे व चमड्याचे शूज घालणे टाळा. पाण्यात पाय भिजल्यानंतर इनफेक्शन होऊ शकते. त्यामुळे या ऋतूत पाय मोकळे राहतील असे वॉटरप्रूफ शूज ,सँडल घाला. (Waterproof Shoes )

पावसाळ्यात पांढरा रंग टाळा

पांढरा रंग सगळ्यांवर अगदी खूलुन दिसतो पण पावसाळ्याच्या तो टाळणे चांगले आहे. कारण पांढऱ्या कपड्यांवर चिखल उडाले तर त्याचे डाग निघत नाही आणि ते अजिबात चांगले दिसत नाही. यामुळे तुम्हाला इम्बॅरेसिंग वाटू शकते.

पावसाळ्यात गडद शेड्स वापरा

पावसाळ्यात (Monsoon Fashion) ओलावा आणि चिखल असल्यानं कपड्यांवर कोणत्याही प्रकारचे डाग पडू नयेत म्हणून गडद रंगाचे शेड्स वापरा. जसे की-ब्राउन, नेवी ब्लू, ग्रीन, ग्रे हे रंग तुम्हाला चांगला लुक देऊ शकतात.

कापडाची निवड करताना

इतर ऋतूंप्रमाणेच पावसाळ्यात देखील तुमच्या व्यक्तिमत्वाची इतरांवर छाप पाडण्यासाठी कपडे खरेदी करताना काही ठरावीक बाबी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पावसाळ्यातील दमट हवामान (Humid Climate )आणि ओलाव्यामुळे अॅलर्जीला आमंत्रण मिळतं,

त्यामुळे डेनिम शर्ट-पॅट, लोकरीचे कपडे, सिल्क या वस्त्रांचा वापर कमी करावा. लिननचे चीनो, ट्राउजर, शिफॉन, पॉलिस्टरचे कपडे घालणं चांगला पर्याय ठरू शकतो. यामध्ये रेनकोट तर असणारचं, वेगवेगळ्या प्रकारचे रेनकोट घालून तुम्ही आपली इतरांवर छाप पाडू शकता.

बॅग-शूज व इतर अॅक्सेसरीज

पावसाळ्यात कपड्यांसोबतच शूज, बॅग, छत्री, रेनकाेट आणि इतर अॅक्सेसरीज तुमच्या लूकला आणखी उठावदार बनवतात, या ऋतूत तुम्ही पावसाळी चपलांचा म्हणजेच क्रा्ॅक, शूज, सँडल, छत्री, रेनकाेट, बॅग कवर, शूज कवर, कॉटनचे बरमोडा आणि शर्ट यांचा वापर करा. कॅनव्हास किंवा कापडी शूज वापरा कारण हे धुवून स्वच्छ करता येतात. आजूबाजूला ओलावा आणि चिखल असल्यानं चपलांसाठी कवरचा वापर करा. पेहरावाला साजेशी बॅग वापरल्यानं तुमचा लूक देखील उठावदार दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

Rupali Chakankar: तर लैंगिक छळाची घटना टळली असती; रूपाली चाकणकर, २०२३ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीची दखल का घेतली नाही?

SCROLL FOR NEXT