Kitchen tips esakal
लाइफस्टाइल

Kitchen tips : आता पावसाळ्यातसुद्धा तुमचे बिस्किट, कुकीज मऊ पडणार नाहीत, फ्रेश ठेवण्यासाठी हा उपाय करा

पावसाळ्यात थंडाव्यामुळे बिस्किट कूकीज मऊ व्हायला लागतात. तेव्हा यांना कुरकुरीत आणि फ्रेश ठेवण्यासाठी हा सोपा उपाय जाणून घ्या.

साक्षी राऊत

Kitchen tips : मान्सूनच्या वातावरणाची मज्जा चहा आणि बिस्किटशिवाय अनेकांना अपूर्ण वाटते. धो धो पावसात गरमा गरम चहा आणि त्यासह बिस्किट आणि कूकीज अनेकांना खावीशी वाटते. त्यामुळे या काळात बिस्किट आणि कूकीजची डिमांडही मार्केटमध्ये वाढते. मात्र पावसाळ्यात थंडाव्यामुळे बिस्किट कूकीज मऊ व्हायला लागतात. तेव्हा यांना कुरकुरीत आणि फ्रेश ठेवण्यासाठी हा सोपा उपाय जाणून घ्या.

एअर टाइट कंटेनरमध्ये ठेवा

कुकीज किंवा बिस्किट दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी त्याला हवाबंद डब्यात ठेवणे हाच एक उत्तम मार्ग आहे. पॅकेट उघडल्यानंतर ताबडतोब, ते थंड आणि कोरड्या जागी हवाबंद डब्यात ठेवल्यास ते बराच काळ कुरकुरीत राहण्यास मदत होते.

टिश्यू पेपरने कव्हर करून ठेवा

टिश्यूने कव्हर करून ठेवल्यास कुकीज लवकर खराब होत नाहीत. कारण टिश्यू कुकीज किंवा बिस्किटमधला ओलावा पूर्णपणे शोषून घेते. पावसाळ्याच्या दिवसात कुकीज बॉक्समध्ये ठेवण्यापूर्वी, त्यात टिश्यू पसरवा. तसेच, बॉक्स बंद करण्यापूर्वीसुद्धा कुकीजवर टिश्यू झाकून ठेवा.

बिस्किट,कुकीज फ्रिजमध्ये ठेवा

बिस्किटे किंवा कुकीज रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने ते दीर्घकाळ चांगले राहाते. मात्र हे बहुतेकांना माहीत नसते. यासाठी झिपलॉक पिशवीत कुकीज ठेवत ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. यामुळे कुकीजचा कुरकुरीतपणा आणि शेप दीर्घकाळ आहे तसा राहातो. (Kitchen Tips)

सॉफ्ट कुकीज कुरकुरीत कसे बनवाल?

पॅकेट जास्त वेळ उघडे ठेवल्यानंतर कुकीज मऊ झाल्या असतील तर ते पुन्हा कुरकुरीत करण्यासाठी ओव्हन किंवा एअर फ्रायरमध्ये 5-10 मिनिटे बेक करा. नंतर वर नमूद केलेल्या पद्धतीने साठवा. (lifestyle)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT