Car Monsoon Accessories Esakal
लाइफस्टाइल

पावसाळ्यामध्ये कारने प्रवास करताय? मग तुमच्याकडे या Car Accessories हव्याच

Car Monsoon Accessories: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा व्हिजिबिलीटी कमी होते. तसचं कारमध्ये दुर्गंधी पसरते. यासाठी खास करून पावसाळ्याच्या दिवसांसाठी तुमच्याकडे काही कार अॅक्सेसरीज असणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुमचा प्रवास सोपा होईल

Kirti Wadkar

Car Monsoon Accessories: पावसाळ्यामध्ये लॉन्ग ड्राइव्हला जाण्याची एक वेगळीच मजा असते. एवढचं नव्हे तर कारने प्रवास करणं हा तसा सुरक्षित पर्याय ठरू शकतो. अर्थात यासाठी संयमाने आणि काळजीपूर्वक वाहन चालवणं गरजेचं आहे. Monsoon Tips Important accessories necessary for safe travel

पावसाळ्याच्या Monsoon दिवसांमध्ये कारमधील प्रवासात भिजण्याची किंवा वादळ-वाऱ्याची भिती नसली तरी कारमधून प्रवास Car Travel करत असाताना देखील काही अडचणी निर्माण होवू शकतात.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा व्हिजिबिलीटी कमी होते. तसचं कारमध्ये दुर्गंधी पसरते. यासाठी खास करून पावसाळ्याच्या दिवसांसाठी तुमच्याकडे काही कार अॅक्सेसरीज असणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुमचा प्रवास सोपा होईल.

विंडो वायजर- जर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला खिडकीच्या काचा थोड्या खाली घेऊन गार वाऱ्याचा आनंद घ्यायचा असेल तर विंडो वायजर बसवणं गरजेचं आहे. खिडक्यांवर वायजर असल्यास काच काहीशी उघडल्यानंतरही पावसाचं पाणी गाडीत शिरणार नाही.

यामुळे तुम्ही काचा हलक्या उघड्या ठेवू शकता. यामुळे गाडीमध्ये ताजी हवा फिरण्यास मदत होईल आणि दुर्गंधी देखील दूर होईल. तसचं काचांवर फॉग जमा होणार नाही.

मड फ्लॅप- पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा कार चालवत असताना खराब रस्त्यांमुळे गाडीच्या दारांवर किंवा इतर गाड्यांमुळे गाडीवर मोठ्या प्रमाणात चिखल उडतो. यामुळे कार अत्यंत अस्वच्छ दिसू लागते. यासाठीच गाडीला मड फ्लॅप असणं गरजेचं आहे.

मड फ्लॅप हे चाकांच्या पुढील बाजुला बसवण्यात येतात. यामुळे टायरमुळे गाडीवर उडणाऱ्या चिखलापासून गाडींचं संरक्षण होतं.

हे देखिल वाचा-

अँटी फॉग स्प्रे- पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जर तुम्ही पावसात कार चालवत असाल तर कारच्या काचांवर फॉग जमा होतो. यामुळे व्हिजिबिलीटी कमी होते. यासाठीच या दिवसांमध्ये कारमध्ये एक अँटी फॉग एजंट स्प्रे कायम ठेवा. या स्प्रेमुळे कारचे विंडस्क्रिन आणि खिडकीच्या काचांवर फॉग जमा होत नाही.

पॉलिमर कार कव्हर- पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जर तुम्ही एखाद्या ओपन पार्किंगमध्ये कार पार्क करत असाल तर तुमच्याकडे पॉलिमर कार कव्हर असणं गरजेचं आहे. सिंथेटिक कव्हरमुळे कारचं धुळीपासून संरक्षण तर होतं. मात्र हे कव्हर वॉटरप्रूफ नसल्याने ते पावसाळ्यात तुमच्या कामी येणार नाही.

यासाठीच पावसाळ्यात कारचं संरक्षण करायचं असेल तर पॉलिमर कार कव्हर तुमच्याकडे असावं. शिवाय हे कव्हर काढताना ते आतील बाजूने ओलं होणार नाही याची काळजी घ्या.

एअर फ्रेशनर- पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ओली छत्री किंवा ओल्या चपलांमुळे कार मॅट ओली होवून ओलावा निर्माण होतो. या दिवसांमध्ये कारमधून दुर्गंधी येऊ शकते. यासाठीच कारमध्ये एखादं चांगलं एअर फ्रेशनर असणं गरजेचं आहे.

अँटी फॉग स्टिकर- कारच्या रियर व्हू मिररवर अँटी फॉग स्टिकर बसवल्यास त्यावर पावसाचं पाणी साचत नाही. यामुळे तुम्हाला क्लियर व्हू मिळतो आणि कार ड्राइव्ह करणं सोप होतं.

वॉटर रिपेलंट- विंडशील्डवर वॉटर रिपेलंट लावल्यास पावसाच्या पाण्याचे थेंब काचेवर थांबत नाहीत. यामुळे विजिबिलीट चांगली मिळते.

हे देखिल वाचा-

इमरजन्सी किट- पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कारमध्ये Emergency kit ठेवायला विसरू नका. केवळ पावसाळ्याच्या दिवसांमध्येच नव्हे तर कारमध्ये कायमच इमरजन्सी किट असणं गरजेचं आहे. या किटमध्ये फर्स्ट एड किट सोबतच इतर मल्टि पर्पज टूल , पंक्चर रिपेअरिंग किट, फ्लॅश लाईट, छत्री अशा वस्तू असाव्या.

अशा प्रकारे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुमच्या कारमध्ये आवश्यक त्या सर्व Accessories असतील तर पावसातील तुमचा प्रवास आरामदायी आणि सुखकर होवू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Monthha : चक्रीवादळ ‘मोंथा’ धडकणार! ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा; लष्करी तुकड्याही 'अलर्ट मोड'वर

Bacchu Kadu: मंगळवारी नागपुरात महाएल्गार मोर्चा; मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा बच्चू कडू यांचा प्रयत्न

Daily Walking Health: रोज चालण्याने 'हे' 5 आजार होणार छूमंतर, पोषणतज्ज्ञ सोनिया नारंग यांचा खास व्हिडिओ पाहा

Latest Marathi News Live Update : परतीच्या पावसाने मनमाड जलमय! नद्यांना पूर, घरात पाणी शिरल्याने नागरिक हैराण

Pro Kabaddi 12: यू मुंबावर पटना पायरेट्सचा दणदणीत! आता एलिमिनेटर १ मध्ये जयपूर पिंक पँथर्सला भिडणार

SCROLL FOR NEXT