Mother's Day Special
Mother's Day Special  esakal
लाइफस्टाइल

Mother's Day Special : आईएवढाच जिव्हाळा लावणारी ती, तिचं महत्व तरुण पिढीला कळतं का?

साक्षी राऊत

Mother's Day Special story: मला आजही आठवतं लहानपणापासून ती घरी येणार हे कळताच मी उड्या मारत आनंदी व्हायची. ती म्हणजे माझी दादी. खरं तर हा हिंदी शब्द आहे पण कोणास ठाऊक बोलायला शिकले तेव्हापासून तिला दादीच म्हणत आले.

तिचं नाव होतं 'शेवंता' आईनंतर आईएवढं हक्काने प्रेम करणारी माझी दादी. सगळ्यांना माया लावणारी, मायेची जाण ठेवणारी अन् नाती जपणारी माझी 'शेवंता दादी'. बाबांचे आई-वडील मी फार लहान असतानाच गेले. हक्कानं आणि गर्वानं सगळ्यांना सांगायला होती ती माझी एकमेव दादी. आणि तिच्यावर माझं प्रचंड प्रेम.

आज मी २३ वर्षांचे आहे माझ्या बालपणीपासून २३ वर्षांत माझ्या मेंदू आणि मनात साठलेल्या तिच्या कितीतरी आठवणी.

चार मामांना दोन दोन मुले म्हणजे माझ्या दादीला एकूण ८ अशी तिच्या मुलांची नातवंड. त्यांच्यावर तिचं प्रेम होतंच यात काही वाद नाही. मला अजूनही आठवतं दादी कुठल्याही गावाला गेली की या नातवंडांना करमायचं नाही.

ती सगळ्यात जास्त माझ्याच घरी यायची कारण इतरांच्या तुलनेत तिला आमचा सहवास मनाच्या जवळचा वाटायचा. ती जेवढे दिवस माझ्या घरी असायची तेवढे दिवस तिचे नातवंड माझ्या मोबाईलवर कॉल करून तिला विचारी,"आई कधी येतेय तू?" लवकर ये, खूप आठवण येतेय." ती विनोदाने म्हणायची आता येतच नाही."

Mother's Day Special

माझ्या २३ वर्षांच्या आयुष्यात तिला मी कुठल्याच आनंदाच्या क्षणात विसरले नव्हते. खरं तर ती येईपर्यंत तिला सांगायच्या सगळ्या गोष्टी आई आणि मी मनात साठवून ठेवायचो. तिला देखील आम्हाला खूप काही सांगायचे असत. एवढ्या सगळ्या आठवणींचा फुलारा फुलवून आमचं आनंदी असं नातं माझ्या आईच्या जन्मापासूनचं.

वयाच्या २२ व्या वर्षी मी नागपूर सोडून पुण्यात आले. तेव्हापासून तिची आणि माझी भेट कमी झाली. माझ्या राहत्या घरी तिची इच्छा होई तेव्हा ती यायची पण मी तिथे नसे. मी नसले तरी ती आली की आई मला कॉल करून तिच्याशी बोलणं करून द्यायची.

पुण्यात कामाच्या व्यापात तिची आठवण तर रोज मनात असायची मात्र फक्त रोज कॉल करता येत नव्हता. तिचे वय साधारण या वर्षात ६५ होते. मला खूप यशस्वी होताना, नोकरीवर लागताना तिला बघायचं होतं. मागल्या दिवाळीत मला नोकरी देखील लागली. हा आनंंद तिच्यासाठी फार मोठा होता.

माझी दादी कायम सगळ्यांच्या भेटी घ्यायची. कितीतरी नाते तिने जपून ठेवले होते. मला आजही दूरचे नाते कळत नाही पण तिने मात्र सगळेच जपून ठेवले होते. मामाच्या मुली, आत्याच्या मुली...ती किती प्रेमळ होती हा त्याचा पुरावा होता.

माझी हासती खेळती दादी त्याही दिवशी एका लग्नघरून हळदीचे जेवण करून घरी आली. त्याच्या चार दिवसांआधीच माझे तिच्याशी बोलणे झाले होते.

काळजी घे, वेळोवेळी औषध घे असे तिला मी सांगतच राहायचे. ते हळदीचे जेवण तिच्या आयुष्यातील शेवटचे जेवण ठरेल असा विचारही मी कधी स्वप्नात केला नव्हता.

जेवण करून ती घरी आली अगदी सगळ्यांशी हसत बोलली पण दुसऱ्या दिवशी तिचे डोळे उघडले नाहीत. हॉस्पिटलमध्ये नेले पण डॉक्टरांनीच आशा सोडा असं सांगितलं. (Women)

मला धक्का बसेल म्हणून कोणी सांगितले नाही पण बोलण्यातून घरच्यांचे हुंदके ऐकून मला घटनेचा अंदाज आला. अगदी क्षणार्ध न घालवता मी नागपूरला निघाले.

पण ती गेलीच. हे कळताच माझ्या काळजावर मोठा घाव झाला. आज ती जाऊन ८ दिवस झालेत मात्र रोज मन भरून येतं रात्री झोपताना डोळ्यातून पाणी येतं. (Lifestyle)

मात्र मला त्यात आणखी एक वाईट याचं वाटतं की मी न विसरलेली माझी दादी गेली असं मी जेव्हा इतरांना हळव्या मनाने सांगते तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया अगदी साध्या असतात. जसे आजी ही अशी व्यक्ती असते जी कुठल्याही क्षणी देवाघरी जाऊ शकते.

अर्थात आजी गेल्याचं दु:ख हे फारसं नसतं असा अनेकांचा समज असल्याचे मला जाणवले. पण आई-सारखा जिव्हाळा लावणारी आजी असेल तर दु:खाचा डोंगर कोसळतो.

मात्र त्याची जाणीव ही आईने मुलांना करून द्यायली हवी. हल्ली पालकांचे वागणे हे आजीबद्दलचे असे काहीसे असते की आजीला फार किंमत द्यायची नसते असा बोध पालकांच्या वागण्यातून स्वत:च मुले घेत असतात. (Mother's Day)

माझी दादी जाण्याबरोबरच अनेकांच्या आजीबाबतच्या भावना ऐकून मला आणखी दु:ख होतं. आपल्या आईनंतर तिच्या मुलांवर म्हणजेच तुमच्यावर जीव लावणाऱ्या आजीची किंमत अमूल्य असायला हवी असे मला वाटते. अखेर ती आईसारखाच जिव्हाळा लावणारी तुमची दुसरी आईच असते.

वय झाले म्हणून माणसाची किंमत कमी होत नसते. जिव्हाळा असावा तो मनापासून. मात्र हल्ली तरुण पिढी तिच्या वागण्यातून असेच दर्शवते की, जुन्या माणसांचं वय झालंय, त्यांनी कशातच लुडबुड करू नये, त्यांचे मत मांडू, दिले ते खावे, सगळे तरुणांचेच ऐकावे.

मात्र या सगळ्यांत वृद्धांच्या मनाचं काय, वय झाले असले तरी त्यांना तेवढ्याच सुखात आणि आनंदात जगण्यचा अधिकार आहे. अगदी आपल्याप्रमाणेच. मात्र याची जाणीव फार कमी लोकांत आज जीवंत आहे, हे दुर्दैवी दु:खच....

- साक्षी राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT