National Parents Day 2023 esakal
लाइफस्टाइल

National Parents Day : पालकांनो, मुलांना मोबाईलचं व्यसन लागलंय अशी भीती वाटते? मग या टिप्स फॉलो कराच

हल्ली दीड वर्षांची मुलांनाही फोन कसा वापरायचा हे माहित असते.

धनश्री भावसार-बगाडे

How To Reduce Phone Addiction In Children :

हल्लीची पिढी टेक्नोसॅव्ही आहे हे पालकही फार अभिमानाने सांगतात. आमच्या मुलाला/मुलीला एवढ्या लहान वयातही फोनवर युट्यूब लावता येतं, फोनचे फंक्शन्स कळतात वगैरे वगैरे पालक फार कौतुकाने सांगतात. पण नंतर काही काळाने तेच पालक चिंतीत असतात की, आमची मुलं फारच फोन बघतात. फोनचं त्यांना व्यसन तर लागलं नाही ना...

ही परिस्थिती बहुतेक घरांमध्ये बघायला मिळते. पण यामुळे वैतागण्याची गरज नाही. फक्त काही गोष्टींचे निश्चयाने पालन करून यातून सुटका मिळू शकते. जाणून घेऊया.

National Parents Day 2023

मोबाइलचे व्यसन मुलांच्या मेंटल आणि फिजीकल हेल्थवर परिणाम करते. त्यामुळे यावर वेळीच नियंत्रण आणणे आवश्यक आहे.

या उपयांनी सोडवा मोबाइलचं व्यसन

समजवून सांगावे - मुलाला मोबाइल फोन बघण्यापासून अडवायचे असेल तर पहिले त्याला समजावून सांगा. हे लक्षात ठेवा की, जेव्हा तो फोन बघत असेल तेव्हा सांगितलं तर तो चिडेल. त्याऐवजी नंतर सोबत बसवून समजवून सांगा.

National Parents Day 2023

स्वतःवर काम करा - मुलं बहुतांश वेळ आपल्या पालकांसोबत घालवतात. अशात ते आपल्या चांगल्या वाईट सवयी आपल्या आई-वडिलांकडून शिकतात. जर तुम्ही मुलासमोर फोन बघत असाल तर तो सुद्धा फोन बघण्याचा हट्ट करेल. त्यामुळे जर मुलांना फोन पासून लांब ठेवायचे असेल तर आधी तुम्ही त्यापासून लांब रहायला हवे.

बिझी ठेवा - मुलांना मोबाइलपासून लांब ठेवण्याची सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे मुलांना बिझी ठेवा. त्यामुळे फोन बघायला त्यांना वेळ कमी मिळेल.

निर्णयावर ठाम रहा - बरेच मुलं जेवताना फोन बघण्याचा हट्ट करतात. अशात पालकसुद्धा त्यांना फोन देतात, जेणे करून मुलं नीट जेवावीय पण असं करू नये. त्यामुळे लहानपणीच मुलांना अशा सवयी लागू नये याची काळजी घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Women Cricketers Salary: नववर्षाआधी ‘BCCI’कडून महिला खेळाडूंना मोठी भेट; वेतनात केली दुप्पट वाढ

BJP Candidate List : भाजप उमेदवारांच्या यादीला शुक्रवारचा मुहूर्त; शिवसेनेसोबत जागावाटप अजूनही अनिश्चित!

धक्कादायक! पहिल्या पतीला सोडून २८ वर्षीय विवाहिता ४४ वर्षांच्या दुसऱ्यासोबत राहिली, त्याने दारुच्या नशेत केला तीन वर्षांच्या चिमुकल्याचा खून, नातेवाईकांच्या संशयानंतर उलगडली कहाणी

Silent Call Scam Alert : फोन वाजतो, पण आवाजच नाही? सावध राहा, तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं!

Bandu Andekar Arrest : जमिनीवर बेकायदा ताबा घेऊन ५.४० कोटींची खंडणी; आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर अटकेत!

SCROLL FOR NEXT