National Pollution Control Day 2023 esakal
लाइफस्टाइल

National Pollution Control Day 2023: घरातही असते दुषित हवा, हे उपाय करा अन् घरातही घ्या मोकळा श्वास

तुमच्या घरातही पसरलीय दुषित हवा, कसं ओळखाल?

Pooja Karande-Kadam

National Pollution Control Day 2023:

सध्या वायू प्रदूषण ही लोकांसाठी आणखी एक मोठी समस्या बनत आहे. थंडीच्या ऋतूला सुरूवात झाली असून, दुसरीकडे वायू प्रदुषण मोठ्या प्रमाणात होत आहे. घरापासून बाहेरपर्यंत तुम्हाला या विषारी हवेतच श्वास घ्यायला भाग पाडले जात आहे. आताच दिवाळी झाली त्यामुळे फटाक्यांच्या धुरामुळे हवा मोठ्या प्रमाणात दुषित झाली आहे.

प्रदूषित हवा टाळण्यासाठी आपण घराबाहेर पडणे टाळतो. पण तुमचे घरही सुरक्षित नाही हे तुम्हाला माहीत आहे. हवेची गुणवत्ता सतत खालावत चालली आहे. त्यामुळे हानिकारक रसायने आपल्या श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करत आहेत. या विषारी वायूंमुळे डोळ्यांची जळजळ, श्वास घेण्यास त्रास होणे आणि विशेषत: दम्याच्या रुग्णांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे.

तुमच्या घरातही विषारी वायूंनी भरलेली हवा तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवत आहे. त्यामुळे ही प्रदूषित हवा टाळण्याचे उपाय शोधणे गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला काही नैसर्गिक पद्धती सांगत आहोत ज्याचा अवलंब करून तुम्ही घरातील हवा शुद्ध करू शकता.

घरात दुषित हवा पसरलीय हे यावरून ओळखा

  1. जर तुम्हाला सतत डोकेदुखी होत असेल तर ते प्रदूषणाचे लक्षण असू शकते.

  2. उलट्या होणे किंवा मळमळ होणे ही लक्षणेही प्रदूषणाच्या आसपास असण्याची लक्षणे असू शकतात.

  3. जर श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते प्रदूषणाच्या उपस्थितीचे लक्षण देखील असू शकते.

  4. जर तुम्हाला वारंवार ताप किंवा ऍलर्जी येत असेल तर ही प्रदूषणाची लक्षणे असू शकतात.

  5. डोळ्यात पाणी येणे, शिंका येणे किंवा खोकला हे देखील प्रदूषणाचे लक्षण असू शकते.

व्हेंटिलेशन वाढवा

घरातील व्हेटिलेशन वाढवा जेणेकरून हवा शुद्ध होईल: विषारी वायू घरातही पाठ सोडत नाहीत, त्यामुळे घराची हवा शुद्ध करा. आजकाल लोक फ्लॅटमध्ये राहतात जिथे मोकळी हवा मिळत नाही. तसेच दुषित हवा जायला खिडक्याही नसतात.

व्हेंटिलेशनमुळे घरातील आर्द्रता कमी होते. घरातील सर्वात प्रदूषित हवा स्वयंपाकघरात असते, कारण स्वयंपाक स्वयंपाकघरात सतत केला जातो. त्यामुळे स्वयंपाकघरात वायुवीजनाची व्यवस्था करणे आणि एक्झॉस्ट फॅन बसवणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून हवा सतत शुद्ध राहते.

घराचे व्हेंटिलेशन वाढवण्यासाठी आता बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत

मेणबत्त्या:

मेणबत्त्याही हवा शुद्ध करतात हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही घरात धुराशिवाय जळणाऱ्या मेणबत्त्या निवडाव्यात. जर तुम्हाला घरात सुगंधित मेणबत्त्या वापरायला आवडत असतील तर पॅराफिन मेणबत्त्या टाळा. या मेणबत्त्या पेट्रोलियम तयार करतात आणि बेंझिन, टोल्युइन आणि काजळी हवेत सोडतात.

मेणबत्त्या नैसर्गिक हवा प्युरिफायर म्हणूनही काम करतात. तुम्ही फक्त त्या मेणबत्त्या चांगल्या क्वालिटीच्या निवडल्या पाहिजेत ज्या शुद्ध आहेत. म्हणजेच जे धुराशिवाय जळतात आणि गंधहीन असतात. अशा मेणबत्त्या दम्याच्या रुग्णांसाठी आणि हवेतील धुळीसारख्या ऍलर्जी दूर करण्यासाठी उपयुक्त आहेत.

मिठाचा दिवा

घरातील हवा शुद्ध करण्यासाठी मीठाचा दिवा देखील सर्वोत्तम पर्याय आहे. मिठात असलेले क्रिस्टल्स हवेतून ओलावा काढून हवेतील दूषित घटक कमी करतात. गुलाबी मीठ हे नैसर्गिक आयनिक एअर प्युरिफायर आहे जे वातावरणातील विषारी वायू कमी करते. तुम्ही रात्रीच्या वेळी देखील हा दिवा वापरू शकता. हा दिवा रात्रीच्या झोपेत अडथळा आणत नाही.

कोळसा

नैसर्गिक हवा शुद्धीकरण म्हणून कोळशाचा वापर केला जाऊ शकतो. घरातील हवा शुद्ध करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे कोळसा, ज्याला ऍक्टिव्ह कार्बन देखील म्हणतात.

कोळसा गंधहीन आहे, तरी देखील तो हवेतील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी आश्चर्यकारक काम करतो. घरातील हवा नैसर्गिकरीत्या शुद्ध करण्याचा आणखी एक उत्तम मार्ग म्हणजे लाकूड आणि शेणीचा कोळसा वापरा.

हा कोळसा पेटवून तुम्ही त्यावर उदी घालू शकता. तसेच, त्यावर निलगिरी तेलही शिंपडू शकता. यामुळे घरातील दुषित हवा तर जाईलच सोबत किटकही नाहिसे होतील.

घरातील दुषित हवा शुद्ध करतात झाडे

हवा शुद्ध करणारी झाडे

घरात तुम्ही लावलेली झाडेही हवा शुद्ध करतात. यासाठी काही विशिष्ट प्रकारची झाडे तुम्ही घरात, बाल्कनीत लावू शकता. तुळशीचे विविध प्रकार (राम तुळस, कृष्ण तुळस, कापूर तुळस), हळद, ओवा, गवती चहा, कोरफड, लिंबू, जास्वंद, गुलाब, मोगरा, गुळवेल, खाद्य उपयोगी भाज्या या लावू शकता.

तर बाहेरील बागेत अथवा कंपाऊंडमध्ये लावण्यासाठी वड, पिंपळ, बाहावा, कडुनिंब, अडुळसा, आयरन, बेडकीचा पाला, समुद्र अशोक, शिकेकाई यांचा वापर करता येऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT