Navjot Singh Sidhu
Navjot Singh Sidhu Sakal
लाइफस्टाइल

Navjot Singh Sidhu : ठोको ताली! जेलमध्ये उतरलं ३४ किलो वजन अन् कारण सांगितलं जातंय ...

सकाळ डिजिटल टीम

Navjot Singh Sidhu : पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू गेल्या सहा महिन्यांपासून पतियाळा जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. जेलमध्ये जाण्यापूर्वी नवज्योतसिंग सिद्धू त्याच्या विविध शैलींमुळे चर्चेत होते.

हेही वाचा: काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

सिद्धूच्या कपिल शर्माच्या शोमधील एखाद्या जोकवरील ठोको ताली वाल्या कमेंटवर अनेक मिम्सदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. नवज्योतसिंग सिद्धू त्याच्या फिटनेससाठीदेखील नेहमी चर्चेत असतो. मात्र, आता नवज्योतसिंग सिद्धू एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आला आहे.

भारदस्त शरीरयष्टी असलेल्या सिद्धूने तुरुंगात राहून चक्क ३४ किलो वजन कमी केले आहे असा दावा त्याच्या एका सहकाऱ्याने केला आहे. सध्या सिद्धू 1988 च्या रोड रेज प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

ध्यान, योगा अन् व्यायामाच्या जोरावर कमी केले वजन

दरम्यान, सिद्धूचे सध्याचे वजन ९९ किलो असून, त्याने वजन कमी करण्यासाठी योगा, ध्यान आणि व्यायाम करण्यावर विशेष भर दिला आहे. सिद्धू तुरुंगात किमान चार तास ध्यान, दोन तास योगा आणि व्यायाम करण्यावर भर देतो. तर, इतरवेळी वाचन आणि केवळ चार तासांची झोप घेतो, असा दावा सिद्धूचे सहकारी आणि माजी आमदार नवतेज सिंग चीमा यांनी केला आहे. चिमा यांनी नुकतीच सिद्धूची भेट घेतली त्यानंतर त्यांनी हा दावा केला आहे.

असा आहे सिद्धूचा डाएट

सिद्धूला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आणि एम्बोलिझमचा त्रास आहे. ज्यासाठी त्याला नारळ पाणी, कॅमोमाइल चहा, बदामाचे दूध आणि रोझमेरी चहा आदींचे सेवन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. आरोग्या दृष्टीने सिद्धू संध्याकाळी सहानंतर आहार घेत नाही.

सध्या तुरुंगात सिद्धूची नियुक्ती “मुन्शी” म्हणून करण्यात आली आहे. तुरूंगात जेल मॅन्युअलनुसार कैद्यांची अकुशल, अर्धकुशल आणि कुशल अशी वर्गवारी करण्यात आली आहे. अकुशल आणि अर्धकुशल कैद्यांना अनुक्रमे ४० आणि ५० रुपये प्रतिदिन मिळतात. तर, कुशल कैद्यांना दिवसाला ६० रुपये मिळतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Exit Poll: सांगलीची पाटीलकी विशाल पाटलांकडे? भाजपला बसणार अँटी इनकबन्सीचा फटका

Mumbai Rain Update : मुंबईत पाऊस कधी येणार? जाणून घ्या हवामान अभ्यासकांचा अंदाज

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Lok Sabha Election Result 2024 : ‘इंडिया’ चेच सरकार येणार 'तेजस्वी यादव' यांचा विश्‍वास: एनडीए हद्दपार होणार

Lok Sabha 7th Phase Voting : देशात सातव्या टप्प्यात ५९ टक्के मतदान! पश्चिम बंगालात सर्वाधिक तर यूपीत सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT