Navratri 2023  esakal
लाइफस्टाइल

Navratri 2023 : आठवी माळ, भगवान महादेवांनी चेष्टा केली म्हणून देवी पार्वतीला मिळालं महागौरी रूप

सौंदर्यांच वरदान देईल माता महागौरी, अशी करा पूजा

Pooja Karande-Kadam

Navratri 2023 : नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. आदिशक्ती श्री दुर्गेचे आठवे रूप म्हणजे श्री महागौरी. महागौरी मातेचा रंग अतिशय गोरा आहे, म्हणून तिला महागौरी म्हणून ओळखले जाते.

महागौरी मातेच्या कठोर तपश्चर्येने तिने गोऱ्या वर्णाची प्राप्ती केली होती. तेव्हापासून तिला तेजस्वी रूप महागौरी, संपत्ती आणि समृद्धी देणारी, चैतन्यमयी त्रैलोक्य, पूज्य मंगला, शारीरिक, मानसिक संकटे दूर करणारी माता महागौरी अशी नावे देण्यात आली.

देवीचे रूप कसे आहे

देवी महागौरी नंदीवर विराजमान आहे.  तिच्या डोक्यावर चंद्रमुकुट आहे. माता महागौरी ही ती आहे जिच्या चार हातांमध्ये डमरू,त्रिशूळ धारण केलेले आहेत.

देवीच्या निर्मितीची पौराणिक कथा

काली रूपातील मातेचे काळे पडलेले शरीर पाहून भगवान शंकरांनी तिची चेष्टा केली. ती चेष्टा मातेला सहन झाली नाही.तेव्हा पार्वती माता तपश्चर्या करू लागली. अनेक वर्ष लोटली तरी पार्वती माता परतली नाही. मातेच्या तपश्चर्येमुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले. तेव्हा त्यांनी मातेला हिमालयातील सरोवरात स्नान करावे. मातेने तसे केले अन् मातेची कांती चंद्रापेक्षाही अधिक सुंदर झाली.

दुसऱ्या एका कथेनुसार, भगवान शिवाला तिचा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी, देवीने कठोर तपश्चर्या केली होती. ज्यामुळे त्यांचे शरीर काळे पडले होते. देवीच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देव तिचा स्वीकार करतात आणि भगवान शिव तिचे शरीर गंगाजलाने अभिषेक घातला, त्यानंतर देवी तेजस्वी बनले. आणि तेव्हापासून तिचे नाव महागौरी पडले. (Navratri 2023)

देवीची पूजा कशी करावी

सर्वप्रथम महागौरीची मूर्ती पाटावर किंवा मंदिरात स्थापित करा. यानंतर पाटावर पांढरे कापड पसरून त्यावर महागौरी यंत्र ठेवून यंत्राची स्थापना करावी. हातात पांढरे फूल घेऊन मातेचे ध्यान करा. आता मातेच्या मूर्तीसमोर दिवा लावा. देवीला फळे, फुले, नैवेद्य वगैरे अर्पण करा. यानंतर देवीची आरती करा. अष्टमीच्या दिवशी कन्येची पूजा करणे श्रेष्ठ मानले जाते.

देवीच्या पूजेची फलप्राप्ती व्हावी म्हणून काय करावं?

या दिवशी अन्नकूट पूजेची म्हणजेच कन्यापूजेचीही परंपरा आहे. काही लोक नवमीच्या दिवशी कन्या पूजा देखील करतात परंतु अष्टमीच्या दिवशी कन्या पूजा करणे चांगले. या पूजेत 9 मुलींना अन्नदान केले जाते , जर 9 मुली उपलब्ध नसतील तर दोन सुद्धा पुरतील. भोजन दिल्यानंतर मुलींना दक्षिणा द्यावी. अशा प्रकारे महामाया भगवती आपल्या मनोकामना आनंदाने पूर्ण करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT