Pimple Remedy esakal
लाइफस्टाइल

Pimple Remedy : पिंपल्सपासून सुटका हवी असेल तर कडूलिंबाचं पाणी फायद्याचं, असा करा उपयोग

कडुलिंबात रक्त नैसर्गिकरित्या शुद्ध करण्याची क्षणता असते आणि शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास देखील ते मदत करते

साक्षी राऊत

Pimple Remedy : त्वचेची बाहेरून निगा राखणे जेवढे महत्वाचे असते तेवढीच त्वचेची अंतर्गत निगा राखणेही महत्वाचे आहे. रक्तात टॉक्झिन्सची मात्रा वाढल्याने त्वचेशी संबंधित विविध समस्या उद्भवतात. यामध्ये त्वचेवर अॅलर्जी किंवा पिंपल्स येणे या फार सामान्य समस्या आहेत.

यासाठी तुम्ही अनेकदा लोकांना ब्लड प्युरिफायर किंवा डिटॉक्स ड्रिंक्सचे सेवन करताना पाहिले असेल. पण यातून क्वचितच कोणाला फायदा होऊ शकतो. मात्र जर तुम्ही रोज कडुलिंबाचे पाणी प्यायले तर मुरुमांच्या समस्येपासून लवकर सुटका मिळू शकते. कडुलिंबात रक्त नैसर्गिकरित्या शुद्ध करण्याची क्षणता असते आणि शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास देखील ते मदत करते. आता कडुलिंबाच्या पाण्याचे सेवन कसे करावे असा प्रश्न तुम्हाला पडत असेल? फिटनेस कोच, न्यूट्रिशनिस्ट आणि सप्लिमेंट्स स्पेशालिस्ट विनीत यांच्याकडून याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

न्यूट्रिशनिस्ट विनीत यांच्या मते, कडुलिंबाची पाने, साल या सर्वांमध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे शरीरातील फ्री-रॅडिकल्स आणि इतर हानिकारक कणांना बाहेर काढण्यात मदत करतात. याशिवाय कडुलिंबात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म देखील असतात. त्यामुळे अॅलर्जेटिक बॅक्टेरिया नष्ट करण्यातही ते खूप प्रभावी आहे. कडुलिंबाचे पाणी बनवून प्यायल्याने शरीरातील घाण निघून जाते. (Pimples)

यामुळे मूत्रपिंडाचे कार्य सुधारते आणि रक्त तसेच संपूर्ण शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते. याशिवाय अनेकदा असे मानले जाते की पोटातील उष्णतेमुळे चेहऱ्यावर पिंपल्सही येतात. ही समस्या दूर करण्यासाठीही कडुलिंबाचे पाणी फायदेशीर आहे. केवळ मुरुमच नाही तर कडुनिंबाचे पाणी नियमित प्यायल्यास इतरही अनेक समस्यांपासून सुटका मिळेल,

कडुलिंबाचे पाणी प्यायल्याने होतात हे फायदे

चेहऱ्यावरील डाग दूर होतील

उष्णता कमी होईल

त्वचेला नैसर्गिक चमक मिळेल

पचन व्यवस्थित होईल (Lifestyle)

कडुलिंबाचे फायदे

पिंपल्सपासून बचाव करण्यासाठी असा करा कडुलिंबाच्या पाण्याचा वापर

कडुलिंबाचे पाणी तुम्ही अनेक प्रकारे बनवू शकता. यासाठी 5-6 कडुलिंबाची पाने किंवा निंबोळी घ्या. त्यांना चांगले धुवा. त्यांना बारीक करून घ्या. एका भांड्यात एक लिटर पाणी आणि कडुलिंब उकळवा. पाण्याला चांगली उकळी आल्यावर गॅस बंद करून पाणी गाळून एका भांड्यात काढा.

ते थोडे थंड होऊ द्या आणि मधासह प्या. तुम्ही हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास प्यावे आणि नंतर उरलेले पाणी दिवसभरात कधीही प्यावे. दररोज अशा प्रकारे सेवन करा, यामुळे त्वचेला जबरदस्त फायदे होतील. (Skin Care)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT