Pregnancy Tips esakal
लाइफस्टाइल

Pregnancy: 'या महिन्यांत' गर्भधारणा टाळा, तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा

संशोधनात उन्हाळ्याच्या दिवसांत प्रेग्नंसी अधिक घातक ठरू शकते असं निदर्शनात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

'बोस्टन यूनिवर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ' (BSPH) च्या संशोधनकर्त्यांच्या अभ्यासातून हे निदर्शनास आले आहे की, वर्षाच्या काही महिन्यांत प्रेग्नंसी घातक ठरू शकते. या महिन्यांमध्ये महिलांच्या गर्भपाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महिन्यांत गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. संशोधनात उन्हाळ्याच्या दिवसांत प्रेग्नंसी अधिक घातक ठरू शकते असं एका प्रयोगाच्या माध्यमातून निदर्शनात आलं आहे. (Pregnancy Tips)

जर्नल एपिडेमियोलॉजी मध्ये प्रकाशित अध्ययनाअंतर्गत ऋतूनुसार गर्भवती महिलांच्या काही चाचण्या घेण्यात आल्या.त्यातून ४४ टक्के गर्भवती महिलांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत सुरूवातीचे ८ आठवडे घातक सांगण्यात आले आहेत.त्यामुळे जून,जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत महिलांना सावधगिरी बाळण्याची गरज आहे.उत्तर अमेरिकेतील गर्भवती महिलांवर हा प्रयोग करण्यात आलाय.

थंडीच्या या महिन्यांत अधिक धोका

Eurekalert च्या एका रिपोर्टनुसार, गर्भावस्थेतील महिलांमध्ये फेब्रुवारी महिन्यापासून गर्भावस्थेत गर्भधारणेत उद्घवणाऱ्या धोक्याचे प्रमाण जास्त आढळून आले.अन्य महिन्यांपेक्षा फेब्रुवारी महिन्यापासून हे प्रमाण ३१ टक्के जास्त होते.

प्रेग्नंसीच्या पहिल्या आठ महिन्यांत अधिक धोका

संशोधनाचे प्रमुख आणि लेखक डॉ.अमेलिया वेसेलिंक यांच्या मते गर्भपाताचा धोका गर्भधारणेच्या पहिल्या आठ आठवड्यांआधी उन्हाळ्याच्या दिवसांत अधिक होता.आता उन्हाळ्याच्या कोणत्या दिवसांत आणि कोणत्या प्रकारच्या धोक्याची शक्यता आहे ते जाणून घेऊया.

यासाठी महिलांवर केलं गेलं संशोधन

संशोधनासाठी ६१०४ प्रेग्नंट महिलांना उद्भवलेला त्रास,त्रास झालेल्या दिवसाची तारीख आणि गर्भधारणेचा महिना या गोष्टींची माहिती घेतल्या गेली.या माहितीतून बाहेर पडलेलं सत्य धक्कादायक होतं.उन्हाळ्याच्या दिवसांत उन्हाच्या संपर्कात आल्याने महिलांच्या गर्भापाताचा धोका वाढल्याचं या संशोधनातून पुढे आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT