Non Veg Restaurant In Mumbai
Non Veg Restaurant In Mumbai  esakal
लाइफस्टाइल

Non Veg Restaurant In Mumbai : मुंबईमध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीचे चविष्ट मांसाहारी जेवण कुठे खाण्यास मिळेल?

Pooja Karande-Kadam

Non Veg Restaurant In Mumbai : जन्माला येऊन मासांहारी पदार्थावर ताव नाही मारला तर काय जगला. नादखुळा रस्सा, मटणाची उकड, तांबडा पांढरा रस्सा, चमचमीत मटणाचं सुक्क, पापलेट फ्राय, वडा कोंबडा असल्या पदार्थांची नाव ऐकली तर नुसतं तोंडाला पाणी सुटतंय. म्हणूनच प्रत्येक हौशी व्यक्ती उत्तम दर्जाच्या मांसाहारी पदार्थाच्या शोधात असतोय.

 आपल्या विविधतेने नटलेल्या देशात प्रत्येक प्रांतात काहीतरी निराळं पाहायला मिळेल. ज्यात खाद्यसंस्कृतीचा मोठा वाटा आहे. देशाच्या प्रत्येक भागात अगदी निराळे पदार्थ पाहायला मिळतील. अशाच अस्सल मराठी पारंपरिक पदार्थाचे जेवण मुंबईतील अनेक हॉटेलमध्ये मिळतं. याठिकाणी फक्त महाराष्ट्रीयन पदार्थ मिळतात.

  तुम्हाला महाराष्ट्रीयन पद्धतीच मासांहारी जेवण करायचं असेल तर मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातही अनेक अस्सल चविचे आणि मराठमोळ्या पद्धतीचे पदार्थ उपलब्ध आहेत. त्याच हॉटेल्सबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

दिवा महाराष्ट्राचा, माहिम

हे रेस्टॉरंट माहिममध्ये आहे. दक्षिण मुंबईतील एक पॉश लोकल, आणि महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट आहे.

या रेस्टॉरंटमध्ये दिल्या जाणार्‍या काही ठराविक महाराष्ट्रीय पदार्थांमध्ये कोलंबी खिचडी, प्रॉन लाचाओ कॉम्बो आणि फ्राइड प्रॉन्स यांचा समावेश होतो, जे सर्व स्टाईलमध्ये तयार केले जातात. तुम्ही त्यांची कोथिंबीर वडी देखील करून पहा. खरबूज आणि काकडी कूलर सारख्या शीतपेयेवर चुसणी घेताना या अस्सल पदार्थांचा आनंद घ्या.

राजमार्ग गोमंतक, वांद्रे पूर्व

३० वर्षांहून अधिक काळ अस्तित्वात असलेल्या या वांद्रे रेस्टॉरंटमध्ये आरामदायक वातावरण आहे. मासे खाण्याची इच्छा असल्यास या ठिकाणी अवश्य भेट द्यावी.

कोलंबी करी थाळी, मालवणी मसाला आणि तळलेली कोळंबी हे येथे दिले जाणारे काही लोकप्रिय पदार्थ आहेत.

एमएच-09 शेतकरी, ठाणे

ठाण्यातील सेंट्रल लाईनवर असलेले हे रेस्टॉरंट तुम्हाला अस्सल कोल्हापुरी पदार्थ चाखायचे असल्यास उत्तम पर्याय आहे. मसालेदार जेवणाचा आस्वाद घेणाऱ्यांना हे रेस्टॉरंट आवडेल. त्यांची भाकरी विथ करी हा येथे दिला जाणारा सर्वोत्तम पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे.

कोकणी हाऊस रेस्टॉरंट, ठाणे

ठाणे येथील रेस्टॉरंट महाराष्ट्रीयन आणि कोकणी पदार्थांचे अनोखे रेस्टॉरंट आहे. आरामदायी वातावरणासोबतच आनंददायी संगीतही इथे वाजवले जाते.

इथले पदार्थ किनाऱ्यावरील आहेत आणि काही उत्तम सी फूड येथे दिले जाते. जर तुम्हाला गोड खायचे असेल तर, स्वादिष्ट, मऊ पुरण पोळीने जेवण संपवा.

नव चैतन्य, वर्सोवा

या वर्सोवा रेस्टॉरंटमध्ये उबदार वातावरण राखले जाते. हे एक कौटुंबिक रेस्टॉरंट आहे. हे नारळाचे दूध आणि कोकम यापासून तयार केले जाते. एक ग्लास सोल कढीने तुमचा ब्रंच सुरू करा आणि नंतर तुमच्या प्लेटमध्ये काही मसालेदार आणि चवदार अन्न घ्या.

समर्थ भोजनालय

१९७२ साली रामचंद्र प्रभू उर्फ रामभाऊ प्रभू यांनी पत्नीच्या मदतीनं घरगुती स्वरूपाची खानावळ सुरू केली. त्यावेळी जेवायला येणारी गिऱ्हाईकं म्हणजे आजुबाजूचे सर्व मध्यमवर्गीय मराठी गिरगावकर चाकरमानी! बरीचशी कनिष्ठ मध्यमवर्गीयच मंडळी.

अप्रतिम अशी घरगुती चव, वातावरणही घरगुती आणि दरही वाजवी असल्यानं खवय्यांची गर्दी असते.

 आज या खाणावळची जबाबदारी रामभाऊ यांची मुलं संजय आणि विश्वनाथ सांभाळतात. सुरमई, बांगडा, पापलेट, बोंबिल, कोलंबी, मांदेली, मुडदुशा, गाबोळी, कुर्ल्या.

फक्त ऐवढंच नाही तर मटण वडे, कोंबडी, सुकं मटण, कोकम कढी असा बेत या खानावळीत शिजतो. हे रेस्टॉरंट गिरगावमधील मंगळ वाडी येथे आहे.

हॉटेल गावकरी

प्रभादेवी इथलं हे हॉटेल महाराष्ट्रीयन पद्धतीच्या जेवणासाठी आणि साधेपणासाठी अधिक ओळखले जाते. त्यांच्याकडे अंडा थाळी, चिकन, मटण आणि सीफूड थाळी उपलब्ध आहे.

याशिवाय तुम्ही जर कधी तांबडा-पांढरा रस्सा खाल्ला नसेल तर इथं तुम्ही त्याचाही आस्वाद घेऊ शकता. दोन जणांसाठी ७०० रुपये पुरेसे आहेत. सामना प्रेसच्या पुढे प्रभादेवी येथे हे हॉटेल आहे.

 पुरेपुर कोल्हापुर

तांबडा आणि पांढरा रस्सा ही कोल्हापुरची खासियत. आता हे खाण्यासाठी तुम्हाला कोल्हापुरला जाण्याची आवश्यक्ता नाही. तुम्हाला मुंबईत सुद्धा कोल्हापुर पद्धतीच्या जेवणाची चव चाखता येईल. विले पार्ले इथलं पुरेपुर कोल्हापुर हे हॉटेल खवय्यांसाठी पर्वणीच आहे.

चिकन, मटण आणि सीफूड असे पर्याय तिकडे उपलब्ध आहेत. इथला तांबडा आणि पांढरा रस्सा हा झणझणीत असतो. नक्की तुम्हाला घाम फुटेल. विले पार्ले येथे पार्लेशवर रोडाल हे हॉटेल मिळेल.

सत्कार हॉटेल

मांसाहर खाणाऱ्यांसाठी आणखी एक पर्याय म्हणजे सत्कार. चिकन, मटण, खेकडा मासळी अशा अनेक थाळी इथं उपलब्ध आहेत. पण सध्या चिकन आणि वडे याला अधिक पसंती दिली जाते.गोरेगाव पूर्व मधील जय प्रकाश नगर येथे हे हॉटेल सापडेल.

स्वाद घरचा

याठिकाणी चिकन थाळी, मटण थाळी, मासे थाळी, मांदेली फ्राय, बांगडा फ्राय, बोंबील फ्राय, सुरमई फ्राय, पापलेट फ्राय, कोळंबी फ्राय, हलवा फ्राय इथं मिळतात. मासे थाळीतील प्रमुख प्रकार पापलेट फ्राय.

पापलेटच्या डोक्याचा आणि शेपटीच्या भागाचा रस्सा बनविला जातो. मधला भाग तळतात. ब्रम्हांड हिरानंदानी लिक रोड, घोडबंदर मार्ग, ठाणे हा या हॉटेलचा पत्ता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT