Olympian Neeraj Chopra
Olympian Neeraj Chopra esakal
लाइफस्टाइल

VIDEO : कोलकत्यात गोल्डनमॅन नीरजनं मटण, बंगाली थाळीवर मारला यथेच्छ ताव

बाळकृष्ण मधाळे

भारतानं अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकत 121 वर्षांचा दुष्काळ संपवला. भारताला अ‍ॅथलेटिक्स प्रकारात पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळालं. नीरजनं अंतिम फेरीत ८७.५८ मीटर लांब भाला फेकत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं. या सुवर्ण पदकाचा आनंद लुटत असतानाच नीरज चोप्राला (Olympian Neeraj Chopra) खायला नेमकं आवडतं तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडलाय. टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) देशासाठी सुवर्णपदक (Gold Medal) पटकावणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राचं (Javelin Thrower Neeraj Chopra) 'खाद्यप्रेम' कोणापासूनही लपलेलं नाही. त्याचं देसी खाद्यपदार्थावरील प्रेम पुन्हा एकदा चाहत्यांसमोर आलंय. नीरज चोप्रा सध्या कोलकाता (Kolkata) दौऱ्यावर असून त्यानं तिथं पारंपरिक बंगाल थालीचा आस्वाद घेतला. जो विविध प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांनी भरलेला होता.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात नीरजला बंगाली थाळीमध्ये (Bengali Thali) दिल्या जाणाऱ्या गोष्टींबद्दल सांगितलं जातंय.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात नीरजला बंगाली थाळीमध्ये (Bengali Thali) दिल्या जाणाऱ्या गोष्टींबद्दल सांगितलं जातंय. ऑलिम्पियन नीरज चोप्रा हा राजकुटीर (कोलकाता) येथे 'ईस्ट इंडिया रूम' नावाच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचला होता, जिथं त्याला पारंपरिक बंगाली थाली दिली गेली. केळीच्या पानांनी सुशोभित केलेल्या या पारंपरिक थाळीत विविध प्रकारच्या पदार्थांचा समावेश करण्यात आला होता. राइस, लुची, डाळ, दम आलू, मटण, कोळंबी मलाई आणि फ्राईज सारखे चवदार पदार्थ देण्यात आले होते. ह्या सर्व पदार्थांचा आस्वाद घेतल्यानंतर नीरजनं बंगाली रसगुल्ला आणि मिष्टी दोईही खाणं पसंद केलं. राजकुटीरचे कॉर्पोरेट शेफ सुमंता चक्रवर्ती म्हणाले, नीरजनं त्यांना सांगितलं की, 'मी बंगाली पाककृतींबद्दल खूप ऐकलं होतं, पण त्याचा आस्वाद घेण्याची संधी मला कधी मिळाली नव्हती, असं त्यांनी सांगितलं.

ऑलिम्पिकदरम्यान नीरज चोप्रानं सांगितलं होतं, की त्याला त्याच्या आईच्या हाताचे चुरमा खूप आवडतात, ज्यामध्ये तूप आणि साखरेचं प्रमाण अधिक असतं, जे खायला खूपच स्वादिष्ट आणि रुचकर लागतं. नीरजला व्हेज पुलाव, ब्रेड आमलेट आणि गोलगप्पेही खायला आवडतात, असं तो म्हणाला होता. प्रशिक्षणादरम्यान त्याच्या आहाराचे वर्णन करताना नीरज चोप्रा म्हणाला, तो नियमितपणे अंडी, चिकन ब्रेस्ट, साल्मन फिश आणि ताज्या फळांचा रस पितो. ज्यामुळे त्याच्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळते, असं त्यानं सांगितलं होतं. नीरजला गोड पदार्थही खायला आवडतात. शिवाय, नीरजला भाताची खिचडी तयार करायला आवडते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

SCROLL FOR NEXT