Parenting Tips For Childrens esakal
लाइफस्टाइल

Children Self Care : मुलांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांना लहानपणीच शिकवा या 'Self Care Tips'

भारतातील बहुतेक पालक दीर्घ काळापर्यंत मुलांमध्ये स्वत: ची काळजी घेण्याच्या सवयी विकसित करण्याचा विचार करत नाहीत

साक्षी राऊत

Parenting Tips For Childrens : जी मूलं लहानपणापासूनच स्वत:ची आणि स्वत:च्या वस्तूंची काळजी घ्यायला लागतात ती मोठी होऊन तेवढीच समजुतदार बनतात . शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासोबतच स्वत:ची काळजी घेण्याची ही सवय मुलांना तणावापासून दूर ठेवण्याचे काम करते.

मुलांमध्ये स्वत:ची काळजी घेण्याच्या या सवयी लावण्याची जबाबदारी सामान्यतः पालकांची असते. जेणेकरून मूल लहानपणापासूनच स्वत:चे उज्वल भविष्य घडवण्याचा पाया मजबूत करू शकेल. परंतु भारतातील बहुतेक पालक दीर्घ काळापर्यंत मुलांमध्ये स्वत: ची काळजी घेण्याच्या सवयी विकसित करण्याचा विचार करत नाहीत. मात्र असे केल्याने तुमची मुले आळशी बनू शकतात. तेव्हा लहान वयातच मुलांमध्ये तुम्ही स्वत:ची काळजी घेण्याच्या सवयी विकसित करण्याचा विचार करत असाल, तर या सोप्या टिप्स फॉलो करा.

मूलभूत गोष्टींनी सुरूवात करा -

मुलांमध्ये स्वत: ची काळजी घेण्याच्या सवयी विकसित करण्यासाठी, सर्वप्रथम त्याला लहान सहान गोष्टी स्वतः करण्याची सवय लावा. उदाहरणार्थ- त्याला स्वतःची आंघोळ करायला सांगा, दात घासायला सांगा, स्वतःचे अन्न स्वतः खायला सांगा, खाण्यापूर्वी हात धुण्याचीही सवय लावा.

स्क्रीनवरून ब्रेक द्या

मुलांच्या बुद्धीचा चांगला विकास करण्यासाठी, सर्वप्रथम त्यांचे लक्ष स्क्रीनवरून इतर गोष्टींकडे वळवा. मुलांना त्यांच्या अंतर्मनाशी जोडण्यासाठी योग, ध्यान यांसारख्या क्रियाकलापांमध्ये सामील करा. त्यामुळे मुलांमध्ये जागरूकता वाढण्यास मदत होते. (Children)

पुस्तकांची मदत घ्या

तुमच्या मुलाला कथा किंवा पुस्तके वाचायला आवडत असल्यास, तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना मुलाच्या वाढदिवसाला किंवा इतर कोणत्याही प्रसंगी खेळण्यांऐवजी सेल्फ-केअर पुस्तके भेट देण्याची विनंती करा. तुम्ही ही पुस्तके तुमच्या मुलांसोबत वाचा आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून त्यांच्यामध्ये स्वत:ची काळजी घेण्याची सवय लावता येईल. (Parenting Tips)

अॅक्टिव्हिटीज

मुलांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी अॅक्टिव्हिटी करणे खूप महत्वाचे आहे. पालकांनी मुलांमध्ये शारीरिक हालचालींना प्रोत्साहन दिले पाहिजे. यासाठी, मुलाला त्याच्या आवडत्या अॅक्टिव्हिटीत गुंतवून ठेवा. या कामासाठी त्याला नेहमी प्रोत्साहन द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT