Parenting Tips From Nita Ambani esakal
लाइफस्टाइल

Parenting Tips From Nita Ambani : अंबानी कुटुंबात मुलांसाठी होते हे नियम, खुद्द ईशा अंबानीने सांगितले

नीता अंबानी यांच्या पॅरेंटिंग टिप्स संदर्भातील काही गोष्टी इतर पालकांनी जाणून घेणेही महत्वाचे ठरेल

साक्षी राऊत

Parenting Tips From Nita Ambani : अंबानी कुटुंब कायम कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. नीता अंबानी श्रीमंतीत वाढल्या असल्या तरी मुलांवर संस्कार करताना त्या एक शिस्तबद्ध आईची भूमिका साकारताना दिसतात. श्रीमंत घराण्यात वाढलेल्या त्यांच्या तिन्ही मुलांसाठी त्यांनी काही नियम ठरवून दिले होते. नीता अंबानी यांच्या पॅरेंटिंग टिप्स संदर्भातील काही गोष्टी इतर पालकांनी जाणून घेणेही महत्वाचे ठरेल. तुमच्या मुलांवर संस्कार करताना ते कामी येतील.

नीता अंबानी या शिस्तबद्ध होत्या

नीता अंबानी यांनी कायम मुलांच्या बाबतीत स्ट्रिक मॉमची भूमिका साकारली आहे. ईशा अंबानीने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'नीता यांच्या मते मुलांनी वेळेत जेवावे, वेळेत अभ्यास करावा आणि सोबतच खेळावेसुद्धा. आम्ही एखाद्या दिवशी शाळेत गेलो नाही तर बाबांना हरकत नसायची पण आई ओरडायची." पालकांनी अशाप्रकारे मुलांच्या हितासाठी कधीतरी कठोर भूमिकाही घ्यावी लागते.

कायम मुलांना पुढे जाण्यास बळ दिलं

नीता अंबानी यांच्यावर कुटुंबाचीच नाही तर इतर अनेक जबाबदाऱ्याही होत्या. त्यामुळे त्यांना मुलांना पुरेसा वेळ देता यायचा नाही. मात्र मुलांच्या जबाबदाऱ्यासुद्धा त्यांनी तेवढ्याच अचूकरित्या सांभाळल्या. ईशा अंबानी असेही म्हणाली की, मुलांना जेव्हाही नीता अंबानींची गरज होती तेव्हा त्या खंबीरपणे त्यांच्या मुलांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. अशाप्रकारे तुम्ही तुमचे कुटुंब आणि करियर सांभाळत मुलांसोबत चांगले बाँडिंग ठेवू शकता.

पैशांची जाणीव

भारतातील अत्यंत श्रीमंत घराण्यात वाढलेल्या नीता अंबांनींच्या मुलांना महिन्याच्या खर्चासाठी ठराविक पैसेच मिळायचे. नीता अंबानी त्यांच्या मुलांना महिन्याचे पॉकेट मनी द्यायची. आणि तेवढ्याच पैशात त्यांना संपूर्ण महिन्याचा खर्च चालवावा लागे. मुलांना कधी त्यांनी पैशांचा गर्व भासू दिला नाही. नीता अंबांनींकडून इतर पालकांनी ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. मुलांना हवं ते सहज उपलब्ध करून दिल्यास त्यांना पैशांनी किंमत कळत नाही. तेव्हा त्यांना महिन्याच्या खर्चासाठी ठराविक रक्कम द्यावी. वायफळ खर्च टाळावे. (Parenting Tips)

मुलांवर बारीक लक्ष ठेवायच्या

नीता अंबानींचं त्यांच्या मुलांवर बारीक लक्ष असायचं. ते कुठे जातात, काय करतात यावर त्यात वयक्तिकरित्या लक्ष द्यायच्या. मुलांवर अति बंधने लादू नये पण त्यांच्या आयुष्यात काय चाललंय, ते काय करताय हे जाणून घेण्याचे स्किल प्रत्येक पालकांकडे असायला हवे. (lifestyle)

याशिवाय नीता अंबांनींचा असा नियम होता की कुठलेही पालक कितीही श्रीमंत आणि त्यांच्या व्यवसायात व्यस्त असले तरी त्यांनी मुलांकडे लक्ष द्यायलाच हवे. त्यांच्यासाठी वेळ द्यायलाच हवा. खुद्ध मुकेश अंबानींनासुद्धा हा नियम पाळावा लागे. त्यांच्या व्यस्ततेतून त्यांना थोडा का होईना पण त्यांच्या मुलांना वेळ द्यावा लागे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार; राजस्थान रॉयल्स विजयासह गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर

Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Accident : पुण्यात दत्तवाडीत घराच्या दरवाजावर पडलेल्या विजेच्या तारेचा जबर धक्का; मुलीला वाचवताना आईही जखमी

Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

SCROLL FOR NEXT