Parenting Tips
Parenting Tips  esakal
लाइफस्टाइल

Parenting Tips : उन्हाळ्यात मुलांना स्विमिंग शिकवण्याचा विचार करताय? मग 'या' गोष्टींची घ्या खास काळजी

Monika Lonkar –Kumbhar

Parenting Tips : उन्हाळ्यात लहान मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागतात. एप्रिल महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल लागते. मागील काही दिवसांपासून उष्णतेचा तडाखा देखील वाढताना दिसत आहे. या उष्णतेवर मात करण्यासाठी अनेक जण विविध प्रकारचे प्लॅन्स बनवतात. कुणी मुलांना घेऊन फिरायला जातात तर कुणी मुलांसाठी वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटी करण्यावर भर देतात.

उन्हाळ्यात आणखी एक गोष्ट आवर्जून केली जाते. ती म्हणजे पोहायला जाणे होय. कडक उन्हाच्या झळांपासून शरीराला आराम देण्यासाठी अनेक जण पोहायला जातात. याच दिवसांमध्ये काही पालक आपल्या मुलांना स्विमिंग शिकवतात तर काही जण मुलांना स्विमिंगचा क्लास देखील लावतात. मुलांना स्विमिंग करायला शिकवताना पालकांनी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

आरोग्य तपासणी महत्वाची

मुलांना पाण्यात पोहायला शिकवण्यापूर्वी एकदा त्यांची आरोग्य तपासणी अवश्य करून घ्या. या आरोग्य तपासणीमध्ये मुलांचे वजन आणि आरोग्याची तपासणी करणे गरजेचे आहे. ही सर्व माहिती गोळा केल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला अजिबात विसरू नका. मुलांना पोहायला पाठवताना त्यांच्यासोबत एक प्रथमोपचार पेटी अवश्य ठेवा. (Health checkup important)

स्विमिंग कीट खरेदी करा

लहान मुलांना स्विमिंगला पाठवण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांच्यासाठी फायदेशीर अन् महत्वाचे असणारे स्विमिंग कीट अवश्य खरेदी करा. या स्विमिंग कीटमध्ये स्विमिंग सूट, स्विमिंग ग्लासेस आणि इतर सेफ्टीसाठी महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी असायला हव्यात. त्यामुळे, अशाप्रकारचे कीट खरेदी करताना या गोष्टी त्यात आहेत का? याची काळजी घ्या.जेणेकरून मुलांना स्विमिंग करताना इतर कोणत्या गोष्टींचा त्रास होणार नाही. (Buy a swimming Kit)

स्विमिंग ट्यूब खरेदी करा

जर तुमचा मुलगा किंवा मुलगी वयाने लहान आहे. जसे की, त्यांचे वय ५ वर्षाच्या आतील आहे, तर अशा मुलांसाठी स्विमिंग ट्यूब अवश्य खरेदी करा. या ट्यूबमुळे पाण्यात पोहताना मुले बुडत नाहीत त्यांना एक प्रकारचा आधार मिळतो. शिवाय, या स्विमिंग ट्यूबच्या मदतीने मुले पोहायला चांगल्या प्रकारे शिकतात. त्यामुळे, मुलांना स्विमिंगला पाठवण्यापूर्वी पालकांनी स्विमिंग ट्यूब अवश्य खरेदी करावी. (Buy a swimming tube)

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT