Parenting Tips  esakal
लाइफस्टाइल

Parenting Tips :  एका मुलीच्या आईला चुकूनही अशा गोष्टी बोलू नका; नाहीतर...

ती भेदभाव करत नाही मग तुम्ही आम्ही कोण तिला बोलणारे

Pooja Karande-Kadam

 Parenting Tips : एखाद्या घरात मुलगा जन्माला आला तर पेढे, फटाके यांनी त्याचे स्वागत केले जाते. पण, मुलगीच्या जन्मावर आजह नाकं मुरडली जातात. एकीकडे असा समाज आहे जो मुलींना प्रोत्साहन देतोय. तर, दुसरीकडे खेडेगावात आजही मुलींना दुय्यम स्थान आहे.

मुलगा मुलगी असा भेदभाव करू नका, यासाठी सरकार प्रयत्नशील आहेच. पण, तरीही मुलगी घरात आल्याने तिने काहीतरी घोर पाप केले आहे, अशीच वागणूक तिला दिली जाते. घरात पहिली मुलगी आली की शेजारचे लोकही होईल पुढील वेळेस मुलगा, असे म्हणतात. पण, जन्मलेल्या मुलीचं कौतुक होत नाही.  

काही परिस्थितीत मुलगा असणं नक्कीच फायद्याचं असतं. मुलगा सांभाळ करतो. पण, मुलगीलाही त्या सुविधा, सूट देऊन बघा. तीही काही कमी नाहीय. मुलगी झाल्याची सल मनात ठेऊन तिच्याशी वागत असाल तर ते तिच्यासाठी चांगल नाही.

विचार करून बोलणं

एखाद्या स्त्रीला एकच मुलगी आहे, असे जेव्हा कोणाच्या लक्षात येते. तेव्हा त्या लहानग्या मुलीसमोरच आईला विचारलं जातं की, तु मुलासाठी प्रयत्न करणार आहेस का, एखादा तरी मुलगा असावाच. ति लहान पोरं बिचारी ऐकून घेते. पण, त्या आईचा आणि मुलीच्या मनाचा कोणी विचार करत नाहीत.

दुसऱ्या पाल्याबद्दल विचारणं

पहिली मुलगी झाली की लोक सांत्वन करतात. होईल दुसरा मुलगा, आणि दुसऱ्यांदाही मुलगीच झाली तर मग हिरमोड होतो कुटुंबातील सगळ्यांचा.पण, असं करू नका. मुलीचे स्वागत आनंदाने करा, माता लक्ष्मी तुमचं घर सुखाने भरून टाकतील.

भेदभाव करू नका

प्रत्येक पालकांसाठी त्यांचे मूल खास असते आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल वाईट अथवा लाज वाटण्याची गरज नाही. पालक मुलगा आणि मुलगी दोघांवरही सारखेच प्रेम करतात. त्यामुळे यात दुजाभाव करू नका.

बऱ्याच लोकांना असे वाटते की मुलींचे पालनपोषण करणे आणि त्यांची काळजी घेणे कठीण आहे. मुलगी असलेल्या व्यक्तीला जेव्हा कोणी भेटायला जाते. तेव्हा सांगितले जाते की, मुलगी आहे, सावध राहा. मुलीची एक छोटीशी चूकही तुम्हाला महागात पडू शकते. तसेच, मुलगी सांभाळणं खूप अवघड असतं.

प्रत्येक मुल सारखेच

एखाद्या स्त्रीला दुसऱ्या किंवा तिसऱ्यांदा मुलगी झाली तर लोक तिच्याकडे दयेने पाहू लागतात. त्यांना वाटतं की त्यांच्या घरात एकच माणूस उरला आहे आणि आता उरलेले आयुष्य गरीब राहून काढावे लागेल, पण प्रत्यक्षात तसे नाही. प्रत्येक मूल त्यांच्या पालकांसाठी समान असते.

कामासाठी हवी मुलगी

मुलगी झाल्यावर लोकांनाही म्हणायची संधी मिळते की मुलगी झाली तर ती घरच्या कामात मदत करेल. मुलीचा जन्म झाला म्हणजे आईला घरातील कामात मदत मिळते. जर तुम्ही मुलीच्या आईला भेटत असाल किंवा भेटणार असाल तर तिच्याशी असं अजिबात बोलू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: ब्रेकअप ही सामान्य बाब; प्रेमसंबंध तुटणे म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणे नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Thane News: मलंगगड फ्युनिक्युलरवरून नवा वाद! ‘ऑपरेटिंग सिस्टीम’ बेजबाबदार व्यक्तीकडे? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार

Palus Municipal Council : पलूस पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; पाणी योजनेला मुदतवाढ, स्मशानभूमी दुरुस्तीला हिरवा कंदील

Jalgaon Smart Meter : जळगावकरांना महावितरणचा डिजिटल 'शॉक'! थकबाकीदारांची वीज आता परस्पर होणार खंडित

BMC Budget: मोफत स्टेशनरी, पदवीपर्यंत फी भरण्याची तरतूद अन्...; बीएमसीचा ₹४,२४८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर, योजना काय आहेत?

SCROLL FOR NEXT