esakal
लाइफस्टाइल

Parenting Tips : या सवयींमुळे तुमच्या मुलाचे बनतील अनेक चाहते

अनेकदा त्या मुलांची आठवण काढली जाते, जी एकतर जास्त खोडकर किंवा अधिक शांत असतात.

सकाळ डिजिटल टीम

अनेकदा त्या मुलांची आठवण काढली जाते, जी एकतर जास्त खोडकर किंवा अधिक शांत असतात.

मस्ती आणि खोडकर असणारी मुले कोणालाही आवडत नाहीत. त्यांच्यात अधिक चांगलं कौशल्य असणं गरजेचं आहे, पण या कौशल्यांचा वापर चुकीच्या ठिकाणी करणं योग्य नाही. अनेकदा त्या मुलांची आठवण काढली जाते, जी एकतर जास्त खोडकर किंवा अधिक शांत असतात. जर तुमचं मूल शांत असेल आणि चांगल्या सवयींमध्ये गुंतलेलं असेल, तर प्रत्येकाला त्याची आठवण येते. ज्याप्रमाणे तुमच्या मधील सामाजिक कौशल्ये मित्र-मैत्रिणींशी, सहकाऱ्यांशी चांगले बंध निर्माण करण्यासाठी उपयोगी पडतात, त्याचप्रमाणे मुलांमध्ये सोशल स्किल्स असणे अत्यंत गरजेचे आहे. लहान वयातच मुलं ही गोष्ट शिकली तर नंतर त्याचा फायदा त्यांना होतो. अशावेळी प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला शिकवावे, अशी काही महत्त्वाची सोशल स्किल्स असतात.

मदत करणे किंवा सहकार्य करणे-

कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी एकमेकांचे सहकार्य आवश्यक असते. इतरांशी चांगले संबंध निर्माण करण्यासाठी हे कौशल्य असणे आवश्यक आहे. असे केल्याने तुम्ही इतरांच्या भावना आणि विचार जाणून घ्यायलाही शिकता. अशावेळी मुलांना लहानपणापासून इतरांना सहकार्य करण्याविषयी सांगा.

गोष्टी ऐकणे -

अनेक जणांकडे हे कौशल्य नसते. अनेकदा लोक फक्त समोरच्या व्यक्तीला शांत ठेवून ऐकतात. पण आपल्या मुलाला हे शिकवू नका, तर त्यांना सांगा की समोरून जर कोणी तुम्हाला काही बोलत असेल तर त्याचं नुसतं ऐकण्यापेक्षा त्या व्यक्तीला समजून घ्या आणि त्याचा विचार करा.

शेअरिंग -

अभ्यासानुसार, जेव्हा मुले एखादी गोष्ट जास्त शिकतात तेव्हा ते इतरांशी शेअर करतात. त्याचबरोबर तीन आणि सहा वर्षांची मुले थोडी स्वार्थी असतात आणि सात ते आठ वर्षांची मुले इतरांशी शेअर करतात. शेअरिंग म्हणजे काळजी घेणं आणि अशा परिस्थितीत मुलांना ही गोष्ट शिकवणं खूप गरजेचं आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. असे केल्याने मुलेही तडजोड करून त्यांना तसं वागावं लागतं. यामुळे मुलांना हेही शिकायला मिळतं की, त्यांनी इतरांसाठी थोडं जरी केलं तर त्या बदल्यात काहीतरी मिळू शकतं.

वैयक्तिक वेळ आवश्यक आहे-

आपल्या मुलास हे शिकवा की प्रत्येकाच्या आत शारीरिक आणि इमोशनल बॉर्डर आहे. कित्येकदा मुलं इतकी फ्रेंडली होतात की समोरच्या व्यक्तीला आपली पर्सनल स्पेस देत नाहीत. तुमच्या मुलास हे शिकवा आणि त्याला काही सीमा तयार करण्यास सांगा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaghcha Raja Look: लालबागचा राजा २०२५ चा पहिला लूक समोर, प्रथम दर्शनातून दिसली पहिली झलक, पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Nagpur Fraud;'बेटिंग ॲप’द्वारे किराणा व्यापाऱ्याची २६ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT