Parenting Tips esakal
लाइफस्टाइल

Parenting Tips : पालकांच्या 'या' ६ सवयींनी संपते मुलांचे 'फ्यूचर'

मुलांच्या जगात त्यांते सर्व काही त्यांचे पालकच असतात. त्यामुळे मुलांच्या योग्य भविष्यासाठी त्यांच्या पालकांनी नेहमी योग्य पॅरंटिंग टिप्स फॉलो करायला हवे.

सकाळ डिजिटल टीम

मुल मोठे करणे ही सर्वात मोठी आणि नाजूक जबाबदारी असते. कधी कधी एक लहानशी चुकपण महागात पडू शकते. त्यातच जर तुम्ही चुकीच्या पॅरंटिंगला फॉलो करत असाल तर याचा दूरोगामी परिणाम भोगावे लागतात. बऱ्याचदा आपण जसे मोठे झालो तसेच लोक आपल्या मुलांनाही वाढवतात. पण समाज, वातावरण सगळेच बदलत असल्याने काळानुसार पॅरंटिंगपण बदलणे आवश्यक आहे.

त्यामुळे बॅड पॅरंटिंगचे काही लक्षणे सांगत आहोत जर ते तुमच्यात दिसत असतील तर लगेच बदला.

गरजेपेक्षा जास्त रागवणे

जर तुम्ही मुलाल आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा सारखे रागवत असाल त्याचा मुलांवर नकारात्मक परिणाम होतो. जर मुलांनी प्रामाणिकपणे चुक स्वीकारली आणि तरीही तुम्ही त्यांना रागवलात तर त्याचा त्यांच्यावर वाईट परिणाम पडतो.

सगळ्यांसमोर मुलांना शिक्षा करणे

काही पालक आपल्या मुलांना पाहुण्यांसमोर रागवतात, मारतात. याचे मुलांच्या मनावर गंभीर परिणाम होतात. यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. अती शिस्तीने न्यूनगंड वाढतो.

फक्त सल्ले प्रोत्साहन नाही

तुम्ही मुलांना लहानसहान गोष्टींपासून ते मोठ्या गोष्टींपर्यंत फक्त सल्ले देत असाल आणि कौतुक करत नसाल तर ही बाब योग्य नाही.

प्रेम व्यक्त न करणे

जर तुम्ही मुलांना जवळ घेत नसाल, तुमचे प्रेम व्यक्त करत नसाल तर मुले स्वतःला तुमच्यापासून वेगळे फिल करतात. पालक आणि मुलांच्या नात्यासाठी हे चांगले नाही.

नियम नसणे

एक चांगला माणूस होण्यासाठी मुलांसमोर काही नियम असायला हवेत. जर मुलांना शिस्त लावली नाही तर बाहेरच्या जगात ॲडजस्ट करणे त्यांना कठिण होते.

मुलांच्या भावनांचा सन्मान न करणे

मुलांशी संवाद साधण्यासाठी, त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी वेळ काढत नसाल, मुलांची मते घात नसाल तर तुमच्यात आणि मुलांमध्ये हेल्दी नाते विकसित होऊ शकणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT