Parenting Tips esakal
लाइफस्टाइल

Parenting Tips : मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वयाच्या १०व्या वर्षापासून शिकवा 'या' गोष्टी

आजच्या धावपळीच्या जीवनात मुलांकडे लक्ष द्यायला पालकांकडे फारसा वेळ नसतो. पण काही गोष्टी मुलांना शिकवणं आवश्यक असतं.

सकाळ डिजिटल टीम

Parenting Tips : आजच्या धावपळीच्या जीवनात मुलांकडे लक्ष द्यायला पालकांकडे फारसा वेळ नसतो. पण काही गोष्टी मुलांना शिकवणं आवश्यक असतं. लहान मुले जसजशी मोठी होत जातात तसतशी पालकांची जबाबदारी वाढत असते. तुम्ही शिकवलेल्या गोष्टी त्यांना चांगली व्यक्ती बनवण्यास मदत करतात.

काही पालकांना तर आपल्या मुलांना लहान वयातच सर्व काही शिकवायचे असते. लक्षणीय बाब म्हणजे तुमची देखील पध्दत सारखीच असेल तर लगेचच त्याला आळा घाला. मुलांना नेहमी वयानुसार काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करा.

Parenting Tips

1) प्रत्येकाचा आदर करणे

लहानपणापासूनच आपल्याला मुलींचा सन्मान करायला शिकवले जाते. जर तुम्हीही तुमच्या मुलांना हेच शिकवत असाल तर त्यांना मुलासोबत मुलीचाही आदर करायला शिकवा. असे केल्याने तुमच्या मुलांमध्ये मुलगा-मुलगी असा भेदभाव निर्माण होणार नाही.

Parenting Tips

2) मुलांना त्यांच्या शरीराच्या अवयवांबद्दल शिकवा

वयाच्या १० व्या वर्षी मुलगा असो किंवा मुलगी पालकांनी त्यांना त्यांच्या शारीरिक स्वरूपाबद्दल मूलभूत माहिती दिली पाहिजे. या वयात मुलांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबद्दल शिकवले पाहिजे. अशा वयात मुलांनी वैयक्तिक स्वच्छतेची संबंधित काही माहिती पालकांनाही द्यायला हवी.

3) ग्रेडपेक्षा ज्ञानाला महत्त्व द्या

आजकाल बहुतांश पालक आपल्या मुलांचे शाळेतील मार्क्स पाहून खुश नसतात. जर त्यांच्या मुलाला त्यांच्या अपेक्षेनुसार गुण मिळाले नाही तर ते त्याला ओरडतात किंवा मारतात. मुलांना हे शिकवा की शाळेतील गुणांपेक्षा ज्ञान असणे गरजेचे आहे.

4) मुलांना असे काम करू देऊ नका, जे त्यांच्या मनाविरूध्द असेल

या वयात मुले अनेकदा त्यांचे एक विशेष स्थान तयार करण्यासाठी इच्छुक असतात. कधी कधी मित्रांमध्ये लोकप्रियता वाढवण्यासाठी ते अशा गोष्टी करतात, ज्या त्यांच्या मनाविरूध्द असतात. असे करण्यापासून तुम्ही तुमच्या मुलांना वाचवले पाहिजे. त्यांना सांगा की मनाविरूध्द काम केल्याने त्रास होण्याची शक्यता असते.

5) त्यांना सांगा की पालक त्यांचे मित्र आहेत, शत्रू नाहीत

तुम्ही तुमच्या मुलाला हे पटवून दिले की पालक हे मुलाचे मित्र आहेत शत्रू नाहीत आणि तुम्ही त्यांच्या ओरडण्याऐवजी त्यांच्याशी प्रेमाने बोलला तर तुमची मुले कदाचित त्यांच्या मनातील तुम्हाला सांगतील. असे झाल्यास तुमचे आणि तुमच्या मुलांमधील नाते अधिक चांगले होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray targets Mumbai Mayor : बांगलादेशी घुसखोरांवरून आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या महापौरांना टोला अन् भाजपला सवाल, म्हणाले...

Valentine Day 2026 Marathi Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तुमच्या प्रेमळ व्यक्तीला पाठवा हृदयस्पर्शी शुभेच्छा, प्रेमाचा दिवस बनेल स्पेशल

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

SCROLL FOR NEXT