Matrimonial Site photo ideas
Matrimonial Site photo ideas esakal
लाइफस्टाइल

Photo Ideas : Matrimonial Site वर फोटो अपलोड करताना या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होतील गैरसमज

सकाळ डिजिटल टीम

Photo Ideas :

आजही भारतात लग्ने कुटुंबियांच्या पसंतीने केली जाता. पूर्वीचे नातेवाईक, घरातील वडीलधारी मंडळी आणि पंडितजी स्थळ आणायचे. काही वृत्तपत्रातील जाहीराती, तर काह विवाह वधू-वर मेळाव्यात ठरायचे. पण सध्या ऑनलाईन पद्धतीने जोडीदार  शोधले जातात. पण सुयोग्य वधू-वर निवडण्यातही अडचण आहे.

कारण ऑनलाईन पद्धतीने होणारे फसवणुकीचे प्रकार सर्वच क्षेत्रात वाढले आहेत. तसेच ते या लग्न जुळवण्याच्या संस्थेतही फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. कारण, यात फोटो चुकीच्या पद्धतीने वापरून फसवणूक केली जाऊ शकते. फोटोत असलेली व्यक्ती आणि प्रत्यक्षात भेटणार व्यक्ती काहीवेळा एकच असेल असे नाही.  

अशा प्रकारांमुळे लोकांना खूप नुकसान सहन करावे लागते. कारण यामध्ये लोक चुकीची माहिती तसेच चुकीचे फोटो टाकतात. मॅट्रोमोनी वेबसाइटवर कोणत्या प्रकारचे फोटो पोस्ट केले जावेत आणि तुमच्या प्रोफाईलवर कोणत्या प्रकारचे फोटो पोस्ट केले जाऊ नयेत ज्यामुळे तुम्ही फसवणूक करताय असं कोणालाही वाटू नये.   (Matrimonial Site photo ideas)

Blur फोटो वापरू नका

तुम्ही जोडीदार शोधत असाल तर स्वत:चा प्रोफाईल फोटो व्यवस्थित असेल याची काळजी घ्या. तुम्ही What’s app, Facebook प्रोफाईलसाठी चांगल्या फोटोची निवड करता तसेच हे फोटो लावा. फक्त फोटो ब्लर नसावा याची खात्री करावी. कारण, फोटो ब्लर असेल तर चेहरा स्पष्ट दिसणार नाही, आणि तुम्हाला पसंत केलेल्या मुलीला उगीच फसवणूक होतेय असे वाटू नये.

Filter फोटो

जसे लोक त्यांचे फिल्टर केलेले फोटो सोशल मीडिया प्रोफाइलवर अपलोड करत असतात, तसेच ते मॅट्रिमोनिअल साइटवरही अपलोड करतात, जे अजिबात योग्य नाही. यामुळे तुम्हाला नंतर समस्या निर्माण होतील.

जर नातं वाढतं आणि तुमची भेट झाली, तर तुम्हाला समोरून बघून आणि फोटो बघून तो समजेल की तुम्ही तो फोटो फिल्टर केला होता, आणि शक्य आहे की तो तिथून नातं संपुष्टात येईल. कारण त्यांच्यासोबत काहीही खोटे घडू नये असे कोणालाच वाटत असते.

नेहमी फक्त तेच फोटो अपलोड करा ज्यात तुम्ही चांगले दिसता. एकमेकांच्या खूप जवळून काढलेले फोटो अपलोड करू नका.

सेल्फी नकोच

तुम्ही सेल्फी फोटो शेअर करू नका. कारण यात फक्त तुमचा चेहरा मोठा दिसेल बाकी तुमची अंगकाठी कशी आहे याचा अंदाज येणार नाही. त्यामुळे, सेल्फी असलेला फोटो लावू नका.

मित्रासोबतचा फोटो नको

काहीवेळा लहान भाऊ किंवा मित्रासोबतचा फोटो प्रोफाईलला लावला जातो. पुर्वी मुलगी पहायला गेल्यावर मित्रांना सोबत न्यायची प्रथा होती. तेव्हा नवरी मुलीला कळतच नव्हतं की मुलगा कोण अन् त्याचा मित्र कोण त्यामुळे गोंधळ उडायचा.असे तुमच्या फोटोवरून होऊ शकते. त्यामुळे ज्यात तुम्ही एकटेच असाल असा फोटो लावा. तुम्ही असे फोटो लावू शकता, ज्यामुळे मुली लगेच इप्रेस होतील.

असे फोटो ठेऊ शकता

Side Angel फोटो

तुम्ही तुमचा Side Angel फोटो टाकू शकता. मॅट्रोमोनी वेबसाइटवर तुम्ही ज्या बाजूने तुमचे फोटो चांगले येतात ते शेअर करा. कारण तुम्ही तुमची चुकीची प्रतिमा समोरच्या व्यक्तीसमोर मांडू शकत नाही. त्यामुळे तुमचेच नुकसान होईल. बनवताना गोष्टी बिघडू शकतात.

तुमच्या बाईकसोबतचा फोटो

तुम्ही तुमच्या आवडत्या बाईकसोबत असलेला फोटो प्रोफाईलला ठेऊ शकता. कारण, आजकालच्या मुलींना बाईकची आवड आहे. आपल्या जोडादाराकडे ट्रेंडींग बाईक असावी असे त्यांना वाटू शकते. तुम्ही असा फोटो लावला तर तो लगेचच क्लिक केला जाईल.

तुमचा आवडता छंद

तुम्हाला ट्रेंकींग, पुस्तक वाचणं, कार राईड करणं, गार्डनिंग आवडत असेल. तर, तुम्ही त्यासोबत फोटो काढू शकता. लायब्ररीत तुम्ही एखादं पुस्तक वाचताना, ट्रेकींगवर असताना काढलेले फोटो मुलींना आवडतात. त्यामुळे तुम्ही असे फोटो नक्कीच शेअर करण्याचा विचार करू शकता. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT