Physical Relation
Physical Relation google
लाइफस्टाइल

Physical Relation : बाळाच्या जन्मानंतर जोडप्यांमधील शारीरिक संबंध कमी का होतात ?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : लग्नानंतर तुमचे नाते नवीन असताना तुमच्यात जेवढे शारीरिक संबंध येऊ शकतात तेवढे ते पहिल्या बाळाच्या जन्मानंतर येतीलच असे नाही.

बहुतेक जोडपी त्यांचे मूल एक वर्षाचे होण्याआधीच त्याकडे परत येतात, परंतु इतरांना, यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो. कधीकधी कमी सेक्स ड्राइव्ह किंवा जवळीकतेची इच्छा नसण्याचे कारण म्हणजे त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ऊर्जेचा अभाव.

बाळानंतरचे लैंगिक जीवन एक अवघड गोष्ट असू शकते. एक वर्षापूर्वी जे तुम्हाला जमत होते ते आता जमेलच असे नाही आणि तुमच्या जोडीदाराला जे जमते ते तुम्हाला जमेलच असे नाही. हेही वाचा - पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

स्तनपान

जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला स्तनपान करत असता तेव्हा तुमच्या प्रोलॅक्टिनची पातळी लक्षणीय वाढते. हे प्रमाण पितृत्व रजेवर असलेल्या पुरुषांमध्ये देखील जास्त असल्याचे मोजले गेले आहे.

तसेच, ही गोष्ट पुरुषांमध्ये भावनोत्कटता आल्यानंतर जाणवते. त्यामुळे संबंधांचा पुढील टप्पा गाठण्यासाठी त्यांना थोडी विश्रांती घ्यावी लागते. प्रोलॅक्टिन आपोआप सेक्सची लालसा कमी करते, त्यामुळे तुमच्या पतीमध्ये लैंगिक इच्छा कमी होते.

झोप आणि जबाबदाऱ्या

बाळाच्या संगोपनादरम्यान अनेकदा झोप अपुरी राहाते. ही गोष्ट दोघांसाठीही त्रासदायक ठरू शकते. सेक्सची इच्छा असली तरी त्यासाठी आवश्यक असणारी एकाग्रता नसते.

मूल उठण्यापूर्वी तुम्हाला शक्य तेवढी झोप घेण्याचे बंधन असते. मुलांच्या संगोपनासाठी आवश्यक असणारा पैसा कमवण्याचा ताणही मनावर असतो. त्यामुळे साहजिकपणे तुमचे मन कार्यालयीन कामात अधिक गुंतलेले असते.

मतभेद आणि नात्यातील दुरावा

मूल वाढवणे ही खूप कठीण गोष्ट असते. त्यामुळे जबाबदाऱ्यांचे नियोजन आवश्यक असते. या जबाबदाऱ्या दोघांनीही नीट पार पाडल्या नाहीत तर मतभेद आणि त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो.

आव्हाने

मूल जन्माला आल्यानंतर नात्यातील आव्हाने वाढतात. मुलाची आजारपणे, शैक्षणिक प्रगती, त्याच्याशी आवश्यक असलेला संवाद याच नकळत ताण पालकांच्या मनावर येत जातो.

मूल जन्मल्यानंतरही तुमचे लैंगिक जीवन कायम कसे ठेवाल ?

मूल जन्माला येण्यापूर्वीच जबाबदाऱ्यांचे नियोजन करून घ्या. त्यानुसारच आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. परिस्थितीत बदल झाल्यास एकमेकांना सांभाळून घ्या.

मुलासोबत एकत्र वेळ घालवा. मूल थोडे मोठे झाल्यानंतर दिवसातून काही वेळ तरी फक्त दोघांसाठी राखीव ठेवा.

शारीरिक सुदृढता आणि आहाराकडे लक्ष द्या. मुलासह एकत्र फिरायला जा. यामुळे मन आनंदी राहील आणि तुमची जवळीक वाढेल. मुलासमोरील तुमचे वर्तन अतिशय सहज असू द्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून केली निवृत्तीची घोषणा

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

SCROLL FOR NEXT