Pickle  esakal
लाइफस्टाइल

Pickle : पावसाळ्यात लोणच्याला बुरशी लागू नये म्हणून हा उपाय करा, लोणचे राहील अगदी फ्रेश

पावसाळ्यात तुम्ही लोणच्याला योग्य प्रकारे स्टोअर करून ठेवले नाहीत तर त्याला बुरशी लागू शकते.

साक्षी राऊत

Pickle Storing Tips : पावसाळ्यात विविध किटक आणि जिवजंतूंचा प्रभाव वाढतो. तेव्हा खाण्याचे पदार्थ आणि भाज्या यांकडे विशेष लक्ष द्यावे लागते. त्याचप्रमाणे लोणच्याचीसुद्धा पावसाळ्यात विशेष काळजी घ्यावी लागते. बहुतांश घरी लोणच्याशिवाय जेवणाला चव नसते. त्यामुळे गृहिणी घरी अनेक प्रकारची लोणची बनवून ठेवतात. मात्र पावसाळ्यात तुम्ही लोणच्याला योग्य प्रकारे स्टोअर करून ठेवले नाहीत तर त्याला बुरशी लागू शकते. चला तर जाणून घेऊया पावसाळ्यात लोणच्याची काळजी कशी घ्यावी ते.

लोणचे साठवण्यासाठी योग्य डबा किंवा बॉक्स निवडणे फार महत्वाचे आहे. डब्याच्या आत ओलावा पोहोचल्यामुळे बुरशी वाढू लागते.

अशावेळी लोणचे साठवण्यासाठी नेहमी एअर टाईट आणि पूर्णपणे कोरडा डबा वापरावा. तुमच्याकडे भरपूर लोणचे असल्यास, ते साठवण्यासाठी लहान लहान डब्यात काढून वापरा. यामुळे लोणचे बुरशी लागले तरी खराब होणार नाही.

तेल आणि मीठ जास्त घाला

पावसाळ्याच्या दिवसात ज्या लोणच्यात तेल, मीठ आणि इतर मसाले समान प्रमाणात मिसळले जात नाहीत किंवा जी तेलात पूर्णपणे मुरलेली नसतील त्यांचा ओलाव्यापासून बचाव करण्यासाठी अतिरिक्त मीठ आणि तेल वेगळे घालावे. (Monsoon)

लोणचे डब्यातून काढताना या गोष्टींची काळजी घ्यावी

लोणचे बाहेर काढण्यासाठी नेहमी कोरडा आणि स्वच्छ चमचा वापरा. पाण्याचा एक थेब जरी त्यात पडला तरी लोणचे खराब होऊ शकते.

लोणच्याला बुरशी लागल्यास हा उपाय करा

लोणच्याला विचित्र वास येत असेल किंवा बुरशी वाढू लागली असेल तर लोणचे आधी नीट बघा. जर बुरशी अजून बरणीवर पसरली नसेल, तर जेवढ्या भागाला बुरशी लागलेली आहे तो भाग काढून टाका आणि उरलेली लोणची वेगळ्या बरणीत भरून ठेवा.

आता त्यात पांढरा व्हिनेगर घाला आणि दोन आठवडे रोज उन्हात ठेवा. व्हिनेगरचा वास त्यामध्ये बुरशीची वाढ होण्यापासून रोखतो. यासोबतच लोणच्याची टेस्टही चांगली होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT