Pollution Asthama sakal
लाइफस्टाइल

Pollution Asthma : दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण थेट फुप्फुसांवर करत आहे आक्रमण

अशा परिस्थितीत आपल्याला ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते अशा लोकांची जास्तीत जास्त काळजी घ्यायला हवी.

नमिता धुरी

मुंबई : मुंबईसह सर्वच ठिकाणची हवेची गुणवत्ता ही अति खराब झालेली आहे, याचे मोठे कारण आहे जागो जागी सुरु असलेले बांधकाम आणि दुसरे रस्त्यावरील वाहनांचे वाढलेले प्रमाण ज्यामुळे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे हवेची गुणवत्ता खालावत आहे.

परिणामी डॉक्टरांना ओपीडी(OPD) मध्ये किमान २-३ रुग्ण असे आढळतात ज्यांना अस्थमाचा त्रास होत आहे ज्यामुळे त्याना अॅडमिट करण्याची वेळ येते. किमान ८-१० रुग्ण असे असतात जे ओपीडी मध्ये उपचार घेऊन घरी जाऊ शकतात. हेही वाचा - भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ... (Pollution Asthama )

आतापर्यंत अशी परिस्थिती कधी उद्भवली नव्हती पण आताच्या अतिप्रदूषणामुळे ही बिकट परिस्थिती उद्भवली आहे. अशा परिस्थितीत आपल्याला ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते अशा लोकांची जास्तीत जास्त काळजी घ्यायला हवी.

वॉक्ख्हार्ट रुग्णालयाचे कन्सल्टन्ट इंटर्नल मेडिसीन डॉ. हनी सावला सांगतात की, “या प्रदूषणामुळे ज्यांना आजपर्यंत कधीही अस्थमाचा त्रास जाणवला नव्हता असे अस्थमाचा अॅटॅक आलेले व अस्थमाची सुरुवात झालेले २०-२५ वयोगटातील रुग्णही आढळून येत आहेत.

या प्रदूषणामुळे आयसीयू मध्ये फुप्फुसाच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे आणि या परिस्थितीवर आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे आणि योग्य ती खबरदारी बाळगली पाहिजे.”

लक्षणे :

खोकला आणि कफ - यामध्ये पांढरा किंवा पिवळ्या रंगाचा कफ व सतत खोकला येणे, चालताना किंवा जिने चढताना धाप लागणे ही लक्षणे आपल्याला सांगतात की या रुग्णाला फुप्फुसाचा आजार उद्भवला आहे.

ज्या व्यक्ती आजारी आहेत, ज्यांची केमोथेरपी सुरु आहे, ज्यांची प्रत्यारोपण शस्त्रकिया झालेली आहे अशा रुग्णांमध्ये ताप आणि निमोनियाचे प्रमाण वाढले आहे.

अशा रुग्णांना त्रास जाणवल्यास त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करून योग्य ते उपचार घेणे गरजेचे आहे. जर योग्य उपचार घेतले नाहीत तर हे धोकादायक होऊ शकते.

हे रोखण्यासाठी आपल्याला कोविडशी लढत असताना घेतली खबरदारी घेणे गरजेचे आहे जसे मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे इत्यादी. जेणेकरून आपण संसर्गजन्य आजारांपासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकू.

जर तुम्हाला ३ दिवसांपेक्षा जास्त दिवस सर्दी, खोकला, ताप असल्यास घरगुती उपाय करून देखील आराम मिळत नसेल तर घाबरून न जाता त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यांनी दिलेले औषोधोपचार सुरु करावेत, जेणेकरून तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज भासणार नाही.

ज्येष्ठ नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव असल्याने त्यांना निमोनिया होण्याची शक्यता अधिक असते अशा वेळी त्यांना निमोनियाचे लसीकरण करणे खूप गरजेचे आहे. याव्यतिरिक्त गरम पाणी पिणे, गुळण्या करणे, हळदीचे दूध पिणे असे घरगुती उपायही गरजेचे आहेत जेणेकरून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते.

या प्रदूषणावरती आळा घालण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येऊन वाढणारे बांधकाम, रस्त्यावरील वाढलेल्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण यावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. यावर जर नियंत्रण ठेवले नाही तर मोठ्या प्रमाणात फुप्फुसाचे आजार वाढण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT