Pradhanmantri Matru Vandana Yojna: PMMVY  Sakal
लाइफस्टाइल

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना मातांसाठी ठरतीये संजीवनी; जाणून घ्या फायदे

केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात लागू केली आहे.

दिपाली सुसर

Pradhanmantri Matru Vandana Yojna (PMMVY) : माता मृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन ती नियंत्रित रहावी, देशातील माता व बालकांचे आरोग्य सुदृढ राखून माता व बालमृत्यू थांबावेत, यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने (Ministry of Women and Child Development) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात लागू केली आहे.

ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तसेच प्रसुतीनंतर शारीर‍िक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते. यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टिने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे या हेतूने मातृ वंदना योजनेची राज्यात 8 डिसेंबर 2017 पासुन सुरु केली आहे.

मातृ वंदना योजना केंद्र व राज्य शासन यांच्या सहभागाने आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असून या योजनेत केंद्र शासनाचा 60 टक्के तर राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग आहे.

योजनेची काही वैशिष्ट्ये-

1) राज्यातील 1 जानेवारी 2017 नंतर कुटुंबातील पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या सर्व पात्र गर्भवती महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र असणार आहेत.

2) ही योजना एकवेळ आर्थिक लाभाची असून पहिल्या जिवीत अपत्यापुरतीच मर्यादित असून या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल.

3) नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्मल्यास त्या टप्प्यापुरताच लाभ ग्राह्य राहील.

4) या योजनेत दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील लाभार्थ्यांचा समावेश असला तरी वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

असा करा अर्ज-

मातृ वंदना योजनेसाठी अर्ज करण्यासाठी गर्भवती महिलांना आपल्याजवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन तीन फॉर्म (पहिला फॉर्म, दुसरा फॉर्म, तिसरा फॉर्म) भरावा लागेल.

त्यानंतर नोंदणीसाठी आणि पहिल्या हप्त्याचा दावा करण्यासाठी, मदर चाइल्ड प्रोटेक्शन कार्ड किंवा MCP कार्ड, गर्भवती महिला आणि तिचा पती यांच्या बँक किंवा पोस्ट ऑफिस खात्याच्या तपशिलांसह रीतसर भरलेला फॉर्म 1A यांच्या ओळखीच्या पुराव्याची प्रत सबमिट करावी लागेल.

दुसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी, लाभार्थ्याने गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी दर्शविलेल्या MCP कार्डच्या प्रतीसह रीतसर भरलेला फॉर्म 1B सादर करावा लागेल.

तिसर्‍या हप्त्याचा दावा करण्यासाठी, लाभार्थ्याने मुलाच्या जन्म नोंदणीची एक प्रत आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिलांकडून रीतसर भरलेला फॉर्म 1C सह मुलाने लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण केल्याचे स्पष्टपणे दर्शवणारे MCP कार्ड सादर करावे लागेल.

मातृ वंदना योजनेत गरोदर मातांना किती आर्थिक लाभ मिळतो?

या योजनेतून पहिल्या अपत्यासाठी गरोदर मातांना 5000 रुपयांची मदत तीन टप्प्यात दिली जाते.

पहिल्या टप्यात गरोदरपणाची 150 दिवसांच्या आत नोंदणी केल्यास 1 हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात सहा महिन्यानंतर 2 हजार रुपये मिळतात .

तिसऱ्या टप्प्यात बाळाच्या जन्माची नोंद झाल्यानंतर बाळाला 14 आठवड्यापर्यंतच प्राथमिक लसीकरण पुर्ण झाल्यानंतर 2 हजार रुपयांचा अखेरचा टप्पा दिला जातो. या योजने अंतर्गत सर्व पात्र लाभार्थींना लाभ हा थेट हस्तांतरण पध्दतीने (Direct Beneficiary Tranfer मार्फत) त्यांच्या वैयक्तिक बँक, पोस्ट ऑफिस खात्यावर जमा करण्यात येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: अजित पवारांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली... नको ते बोलले... थेट पाकिस्तानशी उल्लेख

Tecno Pova Slim : सेम टू सेम आयफोन! चक्क 20 हजारात iPhone Air? नेमकी काय आहे ऑफर, पाहा एका क्लिकवर

Pune Traffic : सवलतीत दंड भरण्यास नागरिकांची झुंबड, फक्त ४००-५०० जणांनाच टोकन; तासन्‌तास रांगेत थांबलेल्यांची नाराजी

Latest Marathi News Updates: भारत -पाकिस्तान मॅचसाठी दीड लाख कोटींचं गॅम्बलिंग : संजय राऊत

ITI Admissions : ‘आयटीआय’चे ८३ टक्के प्रवेश पूर्ण; उर्वरित जागांवरील प्रवेशासाठी येत्या शनिवारपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT